Ladka Bhau Yojana: तुम्हाला माहितीए 'माझा लाडका भाऊ' योजनेचं खरं नाव काय?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

Ladka Bhau Yojana: 'त्या' योजनेचं खरंच नाव 'माझा लाडका भाऊ' आहे का?
Ladka Bhau Yojana: 'त्या' योजनेचं खरंच नाव 'माझा लाडका भाऊ' आहे का?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माझा लाडका भाऊ योजनेचं खरं नाव काय?

point

लाडका भाऊ योजनेचं खरं नाव वेगळंच

point

मुख्यमंत्री शिंदेंमुळे चर्चेत आलं लाडका भाऊ योजना हे नाव!

What is real name of ladka bhau yojana: मुंबई: 'माझा लाडका भाऊ' या योजनेबाबत सध्या बरीच चर्चा सुरू आहे. माझी लाडकी बहीण ही योजना सरकारने महिलांसाठी सुरू केल्यानंतर मुलांसाठी कोणती योजना सुरू करणार अशी विचारणा विरोधकांकडून केली जात होती. ज्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून लाडका भाऊ या योजनेची घोषणा करण्यात आली. बेरोजगार तरुणांना दरमहा 10 हजार रुपयांपर्यंतचं आर्थिक सहाय्य करणारी योजना शिंदे सरकारने जाहीर केली. जी सध्या 'माझा लाडका भाऊ योजना' नावाने चर्चेत आली आहे. पण या योजनेचं खरंच नाव 'माझा लाडका भाऊ' असं आहे का? असा सवाल अनेक जण उपस्थित करत आहे. (what is real name of maza ladka bhau yojana is that scheme mentioned by cm eknath shinde know the exact information mukhyamantri yuva karya prashikshan yojana)

ADVERTISEMENT

'माझा लाडका भाऊ योजना' अशी योजना सरकारने जाहीर केलीए?

'माझा लाडका भाऊ योजना' अशा नावाची कोणतीही योजना सरकारने जाहीर केलेली नाही. राज्य सरकारच्या वतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी जो अंतरिम अर्थसंकल्प सादर केला त्यात बरोजगार तरुणांसाठी एका योजनेची घोषणा करण्यात आली होती. ज्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. 

मात्र असं असताना अचानक माझा लाडका भाऊ योजना हे नाव चर्चेत कसं आलं? हेच आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Ladka Bhau Yojana GR: लाडका भाऊ योजनेचा जीआर लागू, पाहा तरुणांना नेमके कसे मिळणार पैसे?

माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर तरुणांसाठी देखील तशाच स्वरुपाची योजना सुरू करण्याचा शिंदे सरकारने निर्णय घेतला. ज्याचा शासन आदेश (GR) हा 9 जुलै 2024 रोजी जारी करण्यात आला. ज्यामध्ये देखील 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' असं नाव देण्यात आलं आहे. याच जीआरमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात माहिती देण्यात आली होती.

मात्र, 16 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये एका कार्यक्रमात जे भाषण केलं त्यात त्यांनी माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देतानाच लाडका भाऊ असं म्हणत तरुणांसाठी त्यांच्या सरकारने कोणती योजना सुरू केली आहे याबाबत भाष्य केलं. 

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'लाडका भाऊ' अन्...   

पंढरपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते की, 'आपल्या सरकारने यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. 1500 रुपये महिन्याला, 18 हजार रुपये वर्षाला महिलांच्या खात्यात जमा होणार. वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत आपण त्यांना देणार. अशाप्रकारची योजना सुरू केली आहे. लवकरच महिला-भगिनींच्या खात्यांमध्ये पैसा जमा केले जातील.' 
 
'काही लोकं म्हणाले की, लाडकी बहीण तर केलं.. लाडक्या भावाचं काय? मग लाडक्या भावाचं पण केलं.. आता जो 12 वी झालाय त्याला 6000, डिप्लोमा झालाय त्याला 8000, डिग्री झालाय त्याला 10 हजार रुपये महिन्याला.' 

ADVERTISEMENT

'यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अॅप्रेटेन्शिप करेल त्याला तिथे नोकरी लागेल आणि अतिशय प्रशिक्षित मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल. म्हणून ते पैसे जे आहे ते सरकार भरणार आहे अॅप्रेटेन्शिपचे.' 

'इतिहासात पहिल्यांदा आपण अशी सुरू केली आहे. लोकं म्हणाले काय बरोजगारी, बरोजगारी.. मग त्यावर आपण हा उपाय काढला. की, उद्योग, कारखाने जे आहेत त्याचं स्टायपेंड जे आहे ते सरकार भरेल.' असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

हे ही वाचा>> Maza Ladka Bhau Yojana Apply: लाडका भाऊ योजनेसाठी 'असा' भरा अर्ज अन् मिळवा 10 हजार रुपये!

मुख्यमंत्र्यांच्या याच भाषणानंतर लाडका भाऊ योजना हे नाव अचानक चर्चेत आलं. पण मुळात जी योजना लाडका भाऊ म्हणून ओळखली जात आहे खरं त्याचं नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं आहे. 

1974 पासून योजना... पण आता बदललं नाव 

दरम्यान, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही सरकारने नव्याने सुरू केलेली योजना नाही. मुळात ही योजना 1974 पासून सुरू होती. ज्याचं मूळ नाव हे 'रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम' हे होतं. जी 3 डिसेंबर 1974 रोजी सुरू करण्यात आली होती. 

पण याच योजनेत काही सुधारणा करून सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या नावाने राज्यात योजना रिलाँच केली. पण या योजनेला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. पण 16 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री शिंदेंनी लाडक्या भावासाठी देखील सरकारने योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये तरुणांना 6 हजार ते 10 हजार रुपये आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे. असं सांगण्यात आलं. त्यानंतर लाडका भाऊ योजना म्हणून या योजनेची चर्चा सुरू झाली. 

  • माझा लाडका भाऊ योजना.. व्हाया रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम!

महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या जीआरमध्ये 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' याबाबत काही गोष्टी स्षष्ट करण्यात आल्या आहेत. 

महाराष्ट्र शासनामार्फत “रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम” ही योजना दि. ३ डिसेंबर, १९७४ पासून राबविण्यात येत होती. सदर योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते. त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाअधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरीता सदर योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय -:

राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता (Employability) वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

असं जीआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे 'माझा लाडका भाऊ' असं नाव असलेली कोणतीही योजना शासन दरबारी नाही. केवळ मुख्यमंत्री शिंदे यांनी युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा त्यांच्या भाषणात उल्लेख लाडका भाऊ असा उल्लेख केला. ज्यामुळे आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना लाडका भाऊ या नावाने प्रसिद्ध झाली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT