BJP vs Shiv sena: '30 वर्ष शिवसेनेत होते काय उ$%#?, तोंड फोडल्याशिवाय...', मंत्री रवींद्र चव्हाणांचा तोल ढळला
Ravindra Chavan vs Ramdas Kadam: शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांच्यावर टीका करताना भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांची जीभ घसरली आहे. जाणून घ्या नेमका वाद काय आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये जुंपली
रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यात वाद
कदमांवर टीका करताना रवींद्र चव्हाणांची जीभ घसरली
BJP Minister Ravindra Chavan: मुंबई: भाजपचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचा आपल्याच मित्र पक्षातील नेत्यावर टीका करताना तोल ढळल्याचं पहिल्यांदाच पाहायला मिळालं आहे. रवींद्र चव्हाण हे युती तोडण्याचं काम करत आहेत. त्यांचा राजीनामा घ्या.. तसंच मुंबई-गोवा हायवे हा रस्ता खड्ड्यात आहे... अशी टीका शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी केली होती. ज्याला प्रत्युत्तर देताना रवींद्र चव्हाण यांची जीभ घसरली. (what was doing it 30 years in shiv sena it wont be without breaking your mouth bjp minister ravindra chavan lost his balance while criticizing ramdas kadam.)
ADVERTISEMENT
रामदास कदमांवर टीका करताना रवींद्र चव्हाणांची जीभ घसरली...
रामदास कदम यांनी आतापर्यंत अनेकदा रवींद्र चव्हाण यांच्यावर उघडउघड टीका केली आहे. पण काल (18 ऑगस्ट) केलेल्या टिकेला उत्तर देताना रवींद्र चव्हाण यांचा पारा भलताच चढला.
हे ही वाचा>> Maratha Reservation: 'मराठ्यांनी उभा देश चालवायचा, आरक्षणाचं कुठून काढलं?', संभाजी भिडेंचा यू-टर्न
'बोलायला ना मला सुद्धा येतं.. कधी तरी रस्त्यात समोरा-समोर या.. कशा भाषेत मला बोलता येतं ना.. कोणी वाचवायला राहणार नाही एवढं लक्षात ठेवा.. रवी चव्हाण आहे.. रवी चव्हाणसारखं उत्तर देऊ शकतो. परंतु युती धर्म पाळतोय याचा अर्थ असा नाही की कोणीही काहीही बोलेल आणि ऐकून घेऊ.. होणार नाही असं एवढं लक्षात ठेवा. तोंड सांभाळून बोलायचं तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही..'
हे वाचलं का?
'मला असं वाटतं की, या संदर्भातील जो प्रश्न आहे... तो (रामदास कदम) अडाणी माणूस आहे असं माझं मतं आहे. हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो नितीन गडकरी साहेब यांच्या अखत्यारित येतो. त्यामुळे मला असं वाटतं की, तो अडाण्यासारखा प्रश्न आहे. त्याच्या बाजूला बसणारे, टाळ्या वाजवणारे त्याच पद्धतीचे असावेत. 15 वर्ष स्वत: मंत्री होते. 30 वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते.. काय उ$%#?' अशा शब्दात रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदमांवर टीका केली.
रामदास कदमांच 'हे' विधान रवींद्र चव्हाणांच्या जिव्हारी?
'मी आता पत्रं पाठवली आहेत 2-3 दिल्लीमध्ये.. मोदीसाहेबांना, अमित शाह साहेबांना पत्रं पाठवलीत. सरसंघचालक मोहन भागवत त्यांना मी पत्र पाठवलंय..'
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Sanjay Raut: 'नमक हराम' हा चित्रपट मी काढणार आहे, संजय राऊतांनी कुणावर साधला निशाणा?
'भाजपचा जो सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्याला आवर घाला. युती तोडण्याचं, फोडण्याचं काम तो करतोय. दापोलीमध्ये जी भाजप आहे ती आमच्या मुळावर कशी उठलीय हे मी दिल्लीत पत्र पाठवून कळवलंय.'
ADVERTISEMENT
'चमकेशगिरी करण्यापेक्षा, शायनिंग मारण्यापेक्षा.. खऱ्या अर्थाने काम झालं पाहिजे. अजून अनेक पूल झालेले नाहीत. रस्त्या आहे तो पूर्ण खड्डामय रस्ता आहे. रस्त्याच नाही अशी अवस्था आहे. फक्त पाहणी दौरे कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा हा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला पाहिजे.. खरं तर हा कुचकामी मंत्री आहे.. मी थेट सांगतोय आज युती असताना देखील..'
'कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघवत नाही. कोकणाची माणसं आम्हाला जाब विचारतायेत.. रामदास भाई तुम्ही काय करताय?' असं विधान रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं.
या सगळ्या प्रकारामुळे पुन्हा एकदा शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार जुंपली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT