‘मी शपथ घेतो तेव्हा ती पूर्ण करतोच.. दीड वर्षांपूर्वी…’, CM शिंदेंचा विधानसभेत मोठा गौप्यस्फोट
CM Eknath Shinde: हे सगळं करायला धाडस लागतं.. घाबरून, घाबरून करता येत नाही.. अरे करो अथवा मरो.. जे लोकांच्या मनात होतं.. ते मी केलं. असं विधान मुख्यमंत्री शिंदेंनी विधानसभेत केलं आहे.
ADVERTISEMENT
CM Eknath Shinde revolt in shiv sena: नागपूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज (19 डिसेंबर) नागपूर अधिवेशनात विधानसभेत मराठा आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली. मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलविण्यात येणार आहे. असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. पण याचवेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी एक राजकीय गौप्यस्फोट देखील केला. (when i take an oath i complete it i did it one and a half years ago cm eknath shinde made a big secret explosion in vidhansabha regarding revolt in shiv sena)
ADVERTISEMENT
‘मी जेव्हा शपथ घेतो तेव्हा ती पूर्ण करतो.. हे दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्राने पाहिलं आहे. हे सगळं करायला धाडस लागतं.. घाबरून, घाबरून करता येत नाही.. अरे करो अथवा मरो..’ असं विधान मुख्यमंत्री शिंदेंनी विधानसभेत बोलताना केलं.
हे ही वाचा>> Salim Kutta: ‘अशी तडफड तेव्हा का नाही दाखवली तुम्ही?’, देवेंद्र फडणवीस का संतापले?
यावेळी शिंदेंचा सगळा रोख हा त्यांनी केलेल्या बंडाबाबत होता. दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेत बंड करून ठाकरे सरकार पाडलं होतं. यावेळीच आपण मोठ्या धाडसाने हे कृत्य केल्याचं आज मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं.
हे वाचलं का?
‘हे सगळं करायला धाडस लागतं.. घाबरून, घाबरून करता येत नाही..’
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत.. काही लोकं म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. हो मी शपथ घेतली.. कारण महाराज हे आपल्यासाठी आराध्य दैवत आहेत, ते आपले आदर्श आहेत. त्यांची शपथ घेतलेली आहे..
मराठा समाजावर ही वेळ आली आहे.. समजा, ही वेळ ओबीसीवर आली असती किंवा इतर कोणत्या समाजावर आली असती तरी सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली असती.
आपल्याला माहीत आहे की, मी जेव्हा शपथ घेतो किंवा संकल्प करतो तेव्हा तो मी पूर्ण करतो. हे दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्राने पाहिलं आहे. म्हणून सरकार पूर्ण सकारात्मक आहे.
नाना भाऊ.. हे सगळं करायला धाडस लागतं.. घाबरून, घाबरून करता येत नाही.. अरे करो अथवा मरो.. जे लोकांच्या मनात होतं, या राज्यातील जनतेच्या मनात होतं. आमच्या बाळासाहेबांना जे अभिप्रेत होतं ते एकनाथ शिंदेंने केलं. दीड वर्षात या सरकारने केलेली कामगिरी तुमच्या समोर आहे.
त्यामुळे नाना भाऊ.. अजितदादांनी काय सांगितलं की, मोदीजी या देशाच नेतृत्व करत आहेत. म्हणून विकासाबरोबर अजितदादा आले आहेत. मी सांगू इच्छितो की, कोणाच्याही मनात संभ्रम राहू नये. असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
हे ही वाचा>> Maratha Reservation: सरकारने डेडलाईन धुडकावली?, CM शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
दरम्यान, एकीकडे आमदार अपात्रतेवर सुनावणी सध्या सुरू आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केलेलं हे विधान आता चर्चेत आलं आहे. अशावेळी आता विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रतेवर नेमका काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT