Baba Siddiqui Security: बाबा सिद्दीकींकडे कोणत्या दर्जाची सेक्युरिटी होती? Y की Z? 

मुंबई तक

ADVERTISEMENT

बाबा सिद्दीकी
बाबा सिद्दीकी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाबा सिद्दींकींना कोणत्या दर्जाची सुरक्षा होती?

point

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक

point

बाबा सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी दिली होती का?

Baba Siddiqui Murder Latest News Update : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या झाल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. सिद्द्दीकी यांच्यावर वांद्रे येथे बेछूट गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी हरियाणाचा असून दुसरा आरोपी उत्तर प्रदेशचा आहे. तर तिसरा आरोपी फरार असून त्याने सिद्दीकींची हत्या करण्याची सुपारी घेतली असल्याची माहिती समोर आलीय. सिद्दीकी त्यांच्या वांद्रे येथील कार्यलातून बाहेर निघाल्यावर काल शनिवारी (12 ऑक्टोबर) त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. परंतु, बाबा सिद्दीकी यांच्याकडे कोणती सेक्युरिटी होती? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकींच्या हत्येची सुपारी कुणी दिली होती, याबाबत पोलिसांना अधिकृत माहिती मिळाली नाही. बाबा सिद्दीकींना जीवे मारण्याची कोणत्याही प्रकारची धमकीही देण्यात आली नव्हती. बाबा सिद्दीकींकडे कोणत्याही प्रकारची एक्स आणि वाय दर्जाची सेक्युरिटी नव्हती. मुंबई पोलिसांनी सिद्दीकींना दोन पोलिसांची सुरक्षा दिली होती. (The killing of NCP leader and former minister Baba Siddiqui has created a sensation everywhere. Siddiqui was shot indiscriminately in Bandra. Police have arrested two accused in this case)

हे ही वाचा >> Baba Siddique Death : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा मुख्य सूत्रधार कोण? धक्कादायक माहिती आली समोर 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली मोठी प्रतिक्रिया

सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. यावेळी शिंदे म्हणाले, "ही अत्यंत दुर्दैवी घटना असून मी डॉक्टर आणि पोलिसांशी बोललो आहे. दोघांना अटक करण्यात आली असून, आरोपी उत्तर प्रदेश आणि हरियाणाचे आहेत. तिसरा आरोपी फरार आहे. कायदा आणि सुव्यवस्था आपल्या हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आम्ही मुंबई पोलिसांना दिल्या आहेत. मला खात्री आहे की मुंबई पोलीस लवकरच तिसऱ्या आरोपीला अटक करतील. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल". 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Gangster Lawrence Bishnoi: बॉलिवूडचा 'तो' दिग्गज अभिनेता लॉरेन बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये पहिल्या नंबरवर

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी काँग्रेस सोडण्यापूर्वी मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. सुरुवातीच्या काळात ते विद्यार्थी चळवळीत होते. 1980 मध्ये त्यांना वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस बनवण्यात आले आणि चार वर्षांनी ते अध्यक्ष झाले. 1988 मध्ये ते मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT