Chhagan Bhujbal : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भुजबळांना का दिली नाही उमेदवारी? 'हा' आहे प्लॅन

मुंबई तक

ADVERTISEMENT

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ नाराज असल्याचे म्हटले जात आहे.
अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

छगन भुजबळांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्लॅन काय?

point

सुनेत्रा पवारांना राज्यसभेची खासदारकी

point

भुजबळ यांची इच्छा होती, पण पक्षाने थांबवलं

Chhagan Bhujbal : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ नाराज आहेत. छगन भुजबळ यांना लोकसभेपाठोपाठ राज्यसभेची उमेदवारी देतानाही डावललं गेलं, अशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस काय चाललंय आणि भुजबळांना इच्छा असताना संधी का देण्यात आली नाही, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणूक लागल्यानंतर नाशिक मतदारसंघातील उमेदवारीबद्दल पेच निर्माण झाला होता. भुजबळ निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण, त्यांना संधी मिळाली नाही. नावाची घोषणा न झाल्याने भुजबळांनी तडकाफडकी माघार घेतली. 

राज्यसभेवर जाण्यासाठी होते इच्छुक

प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेसाठी निवडणूक लागली. भुजबळ या जागेवरून राज्यसभेत जाण्यास इच्छुक होते. त्यांच्यासोबत इतरही नेते इच्छुक होते. पण, भुजबळांचा इथेही झाला नाही. त्यामुळे त्यांची नाराजी समोर आली.

हे वाचलं का?

हेही वाचा >> "अहंकारी झाले म्हणूनच 241 जागा मिळाल्या", RSS ची भाजपवर तोफ 

'पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. आपल्याला वाटतं की, असं व्हायला पाहिजे, पण नाही होतं', असं भुजबळ राज्यसभेसाठी उमेदवारी न दिल्याच्या मुद्द्यावर म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसने भुजबळांना का दिली नाही उमेदवारी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांना जेव्हा भुजबळ नाराज असल्याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी काय उत्तर दिले, ते वाचा...

ADVERTISEMENT

"मी त्या बैठकीला स्वतः उपस्थित होतो. छगन भुजबळ नाराज नाहीत. त्यांनी इच्छा व्यक्त केली होती, हे खरं आहे. परंतू त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठी गरज या राज्यामध्ये आहे." 

ADVERTISEMENT

"ते अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत. एक ओबीसींचा चेहरा म्हणून ते राज्यात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत होणार आहे."

"म्हणूनच आम्ही त्यांना विनंती केली की, तुमची राज्यात फोर मोठी गरज आहे. तुम्ही अशा रीतीने राज्यसभेत जाणे... आम्हा लोकांची विनंती आहे की, तुम्ही तो आग्रह टाळावा. त्यांनी अतिशय आनंदाने सुनेत्रा पवारांचं नाव घेतलं. ते स्वतः उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित होते."

ओबीसी नेता म्हणून भुजबळ किती महत्त्वाचे?

लोकसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चारपैकी १ जागाच जिंकता आली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपसोबत गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा कोअर मतदार दूर गेला. याची कबुली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाच्या कार्यक्रमातच दिली.

हेही वाचा >> शिंदेच्या आमदाराचा महायुतीलाच घरचा आहेर 

भाजपच्या प्रचारामुळे अल्पसंख्याक, मागास मतदार लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर गेला. विधानसभा निवडणुकीत कामगिरी सुधारायची असेल, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हा मतदार पुन्हा सोबत आणण्याचे आव्हान आहे. 

भुजबळांचा राष्ट्रवादीला फायदा होणार का?

महाराष्ट्रातील ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ स्वतंत्रपणे कामही करतात. भुजबळ चांगले वक्ते आहेत. ते जनमानसावर प्रभाव टाकू शकतात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रातील राजकारणावर आहे. त्यामुळे ओबीसी, अल्पसंख्याक आणि मागास मतदारांना पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी भुजबळांचा चेहरा प्रभावी ठरू शकतो.

हेही वाचा >> लोकसभेचा निकाल लागताच अजित पवारांच्या अडचणी वाढल्या!

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचारात झोकून द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रचारकांची मोठी फळी मैदानात उतरावावी लागणार आहे. या निवडणुकीत भुजबळ पूर्णपणे राज्याच्या राजकारणात राहिले, तर ओबीसी मतदार राष्ट्रवादीकडे आणण्यासाठी फायदा होऊ शकतो. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT