Shiv Sena Vs BJP: चव्हाण आणि कदम का भिडले?, विधानसभेआधी शिवसेना-भाजपमध्ये काय बिनसलं?

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

विधानसभेआधी शिवसेना-भाजपमध्ये काय बिनसलं?
विधानसभेआधी शिवसेना-भाजपमध्ये काय बिनसलं?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई-गोवा महामार्गावरून भाजप आणि शिवसेनेत वाद वाढण्याची शक्यता

point

'देवेंद्र फडणवीस यांनी अशा चमकोगिरी करणाऱ्या कुचकामी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा', रामदास कदमांची रवींद्र चव्हाणांवर टीका

point

'युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण यांचा नाही, जशास तसे उत्तर द्यायला मी समर्थ' चव्हाणांचं प्रत्युत्तर

डोंबिवली: 'प्रभू रामचंद्राचा वनवास 14 वर्षांनी संपला, पण मुंबई-गोवा महामार्गाचा वनवास संपत नाही, याचं दु:ख वाटते. नुसते पाहणी दौरे कशासाठी करता? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा चमकोगिरी करणाऱ्या कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा.' अशी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली. याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. जाणून घ्या नेमका हा सगळा वाद काय आहे. (why did bjp minister ravindra chavan and shiv sena leader ramdas kadam clash what happened in shiv sena bjp before the vidhan sabha election 2024)

'रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील संतापले आणि युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण यांच्या नाही, युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो, जसंच्या तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण समर्थ आहे. परंतु मी जर सौजन्य सोडलं तर मी अत्यंत वाईट पद्धतीने वागायला तयार आहे. मोठं-मोठ्या हुशाऱ्या करत असाल तर चालणार नाही. उद्धवजी होते त्यांनी यांना फार महत्त्व दिलं, आता कोण महत्व देणारे राहिले नाही विसरून जा.' अशा पद्धतीने कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदम यांना खडे बोल सुनावले आहेत.

हे ही वाचा>> Sambhaji Bhide: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांनी भारतात आश्रय का घेतला? संभाजी भिडेंनी उलगडला 'तो' इतिहास

त्यामुळे आता पुन्हा भाजप आणि शिवसेनेत वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून यावर महायुतीचे वरिष्ठ नेते मध्यस्थी करून वाद कसे सोडवणार हे पाहणं महत्त्वाचे आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय म्हणाले होते शिवसेनेचे नेते रामदास कदम

'14 वर्षानंतर प्रभू श्रीरामांचे वनवास संपले, मात्र मुंबई-गोवा महामार्ग चव्हाणवास संपत नाही. एक शिष्टमंडळ घेऊन मी स्वतः गडकरी साहेबांना भेटणार आहोत. हा जो सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्यांनी मागच्या गणपतीच्या आधी जाहीर केलं होतं की पुढच्या गणपतीच्या आधी मुंबई-गोवा महामार्गचा काम पूर्ण होईल. मी काल त्या मार्गावरून आलोय.. अत्यंत वाईट अवस्था आहे. गणपती जाऊ शकत नाहीत.' 

'कोकणाची अत्यंत वाईट अवस्था आहे. 14 वर्ष होऊन गेले आम्ही काय पाप केले आहे असं प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केलेले आहे की आम्ही दोघं लक्ष घालतो आणि शक्यतो लवकर आम्ही रस्ते बनवून देतो. फक्त चमकोगिरी करण्यापेक्षा, शायनिंग मरण्यापेक्षा खऱ्या अर्थाने काम झालं पाहिजे. अनेक पूल नाही, जे रस्ते आहेत ते खड्ड्यामध्ये आहेत.' 

ADVERTISEMENT

'नुसता पाहणी दौरा कशासाठी? खरंतर या मंत्र्याचा राजीनामा देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायला पाहिजे. हा कुचकामी मंत्री आहे, मी आज डायरेक्ट सांगतो. कारण कोकणवासियांच्या हाल मला बघवत नाही. कोकणची माणसं आम्हाला प्रश्न विचारतात रामदास भाई तुम्ही काय करताय. आम्ही किती सहन करायचं.' असं विधान रामदास कदम यांनी केलं होतं.

ADVERTISEMENT

रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदम यांना दिलं प्रत्युत्तर

'हा नॅशनल हायवे आहे.. जे नितीन गडकरी साहेब यांच्या खात्याच्या अंतर्गत येतं. कोकणातील एक सुपुत्र म्हणून त्या ठिकाणी प्रमाणिकपणे तो रस्ता व्हावा यासाठी मी प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करणार यात काही शंका नाही. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्यांनी. सबका साथ सबका विकास या माध्यमातून आम्ही निधी देण्याचे काम केले आहे हे आपण विसरता कामा नये.'

हे ही वाचा>> BJP vs Shiv sena: '30 वर्ष शिवसेनेत होते काय उ$%#?, तोंड फोडल्याशिवाय...', मंत्री रवींद्र चव्हाणांचा तोल ढळला

'दुसरी गोष्ट युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण यांचा नाही, युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो, जशास तसं उत्तर दयायला रवींद्र चव्हाण समर्थ आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे. परंतु मी जर सौजन्य सोडलं तर मी अत्यंत वाईट पद्धतीने वागायला तयार आहे त्यांनी कधी ते सांगावं.'

'कित्येक वर्ष, उद्धव ठाकरेजी यांच्या नेतृत्वात ते मंत्री होते, काय केलं? कधी कोणता काम केलं. एक काम करून दाखवले असं दाखवा न.. एक काम.. 35-40 वर्षांमध्ये  काहीच कोकणासाठी केलं नाही आणि मोठं-मोठ्या हुशाऱ्या करत असाल तर चालणार नाही, ते उद्धवजी होते त्यांनी यांना फार महत्त्व दिलं, आता कोण महत्व देणारे राहिले नाही. विसरून जा सगळे...' अशा पद्धतीने कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदम यांना खडेबोल सुनावले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT