Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी अचानक घेतली CM फडणवीसांची भेट... शिंदेंना शह?
Uddhav Thackeray vs CM Devendra Fadnavis: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतली. या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली अचानक भेट
ठाकरेंनी अचानक घेतलेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण
उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकरांची देखील घेतली भेट
Uddhav Thackeray: नागपूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. नागपुरात सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अचानक उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र आणि पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब आणि वरुण देसाई हेही उपस्थित होते.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्यांनी राजकारण तापले असतानाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्याबद्दल फडणवीस यांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेते समोरासमोर आले.
हे ही वाचा>> Ajit Pawar: अजितदादा अस्वस्थ... अधिवेशन सोडून तडकाफडकी गेले दिल्लीला, घडलं तरी काय?
फडणवीसांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, 'ही केवळ सदिच्छा भेट होती, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुतीने निवडणुका जिंकल्या. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हिताचे काम होईल, अशी अपेक्षा आहे. आता आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत.'
हे वाचलं का?
आमचेही ऐकले पाहिजे - आदित्य ठाकरे
दुसरीकडे शिवसेना नेते आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे म्हणाले की, 'आज आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि ते सत्ताधारी पक्षात आहेत. मात्र, आम्ही सगळेच जनतेने निवडून आलेलो आहोत. त्यामुळे त्यांनी आमचेही म्हणणे ऐकून विकासकामे पुढे नेली पाहिजेत, हीच आमची अपेक्षा आहे, हे आमचे ध्येय आहे."
हे ही वाचा>> भाजपने खासदारांना बजावला व्हीप, काँग्रेसनेही... लोकसभेत काय घडतंय?
दरम्यान, या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतर या भेटीतून भविष्यात तयार होणाऱ्या नव्या राजकीय समीकरणांचे संकेत तर नाही ना?, अशीही चर्चा आता रंगली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT