Shiv Sena : "ठाकरेंनी रॅण्ड घोटाळ्यातील गुप्ताची घेतली भेट", शिंदेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी खळबळजनक दावे केले आहेत.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार नरेश म्हस्के.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट

point

निवडणूक फंडासाठी भेट घेतल्याचा संशय

point

भेटीची चौकशीची करण्याची केली मागणी

Naresh Mhaske on Uddhav Thackeray : 'दक्षिण अफ्रिकेत अब्जावधींचा रॅण्ड घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधूंपैकी एक जण दिल्लीत आला होता. या गुप्ताची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली", असा स्फोटक दावा शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही म्हस्के यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. ठाकरे दिल्लीतून मुंबईत परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. 

नरेश म्हस्के यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. "दक्षिण आफ्रिकेत गुप्ता बंधू यांनी अब्जावधी रुपयांचा रॅण्ड घोटाळा केला आहे. याप्रकरणातील एक आरोपी गुप्ता दिल्लीत आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्याची अर्धा तास भेट घेतली असल्याची माहिती माझ्याकडे आहे", असा दावा खासदार म्हस्के यांनी केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

"संजय राऊतांच्या घरातील सीसीटीव्ही बंद असतील"

खासदार नरेश म्हस्के यांनी असाही दावा केला आहे की, "गुप्ता आणि उद्धव ठाकरे यांची भेट उघड होऊ नये यासाठी दिल्लीतील संजय राऊत यांच्या घराच्या परिसरातले सीसीटीव्ही कदाचीत बंद ठेवले असतील. पण, या भागातल्या रस्त्यांवर सीसीटीव्ही आहेत यात हा प्रकार उघड होईलच; तपास यंत्रणांनी याची दखल घेऊन चौकशी करावी", अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे.

हेही वाचा >> ''माझ्या नादी लागू नका, नाहीतर...'', ठाकरे, पवारांना राज ठाकरेंचा इशारा 

"सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे कट आणि कमिशनचे कंटेनर येणं बंद झालं आहे. आता इलेक्शन फंड जमा करण्यासाठी ठाकरेंनी गुप्ता बंधूंची भेट घेतली नसेल ना?", असा संशय खासदार म्हस्के यांनी यावेळी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

ठाकरेंना काळ्या गाडीतून भेटायला कोण आले होतं?

"राऊतांच्या बंगल्यात ७ तारखेला संध्याकाळी काळ्या काचेच्या गाडीतून कोण आलं होतं? वादग्रस्त गुप्ता बंधूना उद्धव ठाकरे नक्की कशासाठी भेटले, याचा उलगडा जनतेसमोर झाला पाहिजे", असे म्हस्के यांनी म्हटले आहे. 

ADVERTISEMENT

"मला मुख्यमंत्री पद द्या, अशी भीक उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस हायकामांडकडे मागितली. यासाठीच त्यांचा तीन दिवसीय लोटांगण दिल्ली दौरा पार पडला. पण, काँग्रेसने त्यांना हुसकावून लावले आहे. दिल्लीत त्यांना कुणी भाव दिला नाही", असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला.

हेही वाचा >> बच्चू कडू महाविकास आघाडीच्या वाटेवर? पवारांची घेतली भेट

राष्ट्रवादीच्या एका नेत्यालाही मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यात उध्दव ठाकरे यांचा अडसर ठरू नये म्हणून त्यांना अडकवण्यासाठी संजय राऊतांनीच गुप्ता बंधूंची भेट घडवून आणलेली नाही ना? असा सवाल उपस्थित करून म्हस्के यांनी आघाडीतील बिघाडी दाखवून दिली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT