Lok Sabha 2024 : नवनीत राणांविरोधात सुषमा अंधारे उतरणार मैदानात?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sushma Andhare will be contested by the Thackeray group against MP Navneet Rana in Amravati Lok Sabha constituency
Sushma Andhare will be contested by the Thackeray group against MP Navneet Rana in Amravati Lok Sabha constituency
social share
google news

शिवसेनेतल्या फाटाफुटीनंतर 40 आमदार आणि 15 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली. अनेक महत्त्वाचे नेते गेल्यामुळे एकाकी पडलेल्या उद्धव ठाकरेंसाठी सुषमा अंधारे धावून आल्या. अंधारेंनीही संधीचं सोनं करत मैदान मारलं. आता त्याच अंधारेंना ठाकरे नवनीत राणांविरोधात मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण, या चर्चेमधली हवा आधीच निघालीये. अंधारे राणांविरोधात अमरावतीतून लढू शकतात का आणि अंधारे-राणा लढतीतली हवा कशी निघालीये? तेच समजून घेऊयात…

ADVERTISEMENT

सुप्रीम कोर्टाच्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेची तयारी सुरू झालीय. उद्धव ठाकरेंनीही पहिल्यांदाच शिवसेना भवनात जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. याच बैठकीच्या पार्श्वभूमीवर एक बातमी व्हायरल झालीय. लोकसभेसाठी ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांची ही यादी आहे. यामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणांविरोधात सुषमा अंधारेंना ठाकरे मैदानात उतरवणार असल्याच्या चर्चेंनं डोकं वर काढलं.

हेही वाचा >> Karnataka : ‘हे’ 5 फॅक्टर अन् सिद्धरामय्या डीके शिवकुमार यांना ठरले वरचढ

हनुमान चालिसा उपक्रम राबवून उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या राणा दाम्पत्याची पाठ लावण्याची ठाकरेंची ही खेळी असल्याचंही म्हटलं जातंय. त्यामुळेच आतापर्यंत राणांवर शाब्दिक हल्ले करणाऱ्या अंधारे आता निवडणुकीच्या मैदानातही आव्हान देणार असल्याची बोललं जातंय. पण खरंच अंधारे राणांविरोधात मैदानात उतरू शकतात का, हा कळीचा प्रश्न आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सुषमा अंधारे नवनीत राणांविरुद्ध निवडणूक लढवू शकतात?

अमरावती लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या पाठिशी राहिलाय. पण गेल्यावेळी नवनीत राणांनी मातब्बर आनंदराव अडसूळांचा मानहानीकारक पराभव केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीनं राणांनी शिवसेना-भाजपच्या खासदाराला हरवलं.

हेही वाचा >> संजय पवार यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, ‘ती’ जाहिरातबाजी भोवली

आता राणांना हरवण्यासाठी ठाकरे अंधारेंना मैदानात उतरवणार असल्याचं म्हटलं जातंय. राणा विरुद्ध अंधारे अशी लढत झाली, तर ती राज्याच्या राजकारणातली एक हायवोल्टेज लढत म्हणून ओळखली जाईल.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> बलात्कार, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पूड.. गर्लफ्रेंडसोबत क्रूरपणाचा कळस

पण मुळात अमरावतीत ही लढतच होणार नाही. अमरावती हा अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघ आहे. सुषमा अंधारे ह्या अनुसचित जाती प्रवर्गातून येत नाहीत. त्यामुळे त्या इथून निवडणूकच लढवू शकत नाहीत. म्हणजेच राणा विरुद्ध अंधारे लढतीची चर्चा म्हणजे निव्वळ वावड्या आहेत. कारण सुषमा अंधारेंना अमरावतीतून तिकीट देणंच कठीण आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT