Devendra Fadnavis : ‘..आम्ही तिघंही स्वस्थ बसणार नाही’; फडणवीसांनी कोणाला ठणकावलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis Parbhani shasan aplya dari
Devendra Fadnavis Parbhani shasan aplya dari
social share
google news

Devendra Fadnavis : जगात जर्मनी आणि भारतात परभणी म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमातून परभणीकरांच्या भावनेला हात घातला. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रमाणे आपलं शासन चालवलं त्याच प्रमाणे जनसामान्यांचे सरकार सेवा करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना योजनांची माहिती देत राज्य सरकार केंद्र सरकारच्या मदतीने कशी पद्धतीने गतीने विकास करत आहे तेही त्यांनी यावेळी सांगितले. (three of us will not rest without transformation maharashtra assures deputy chief minister devendra fadnavis)

ADVERTISEMENT

पुढच्या पिढीनं दुष्काळ पाहू नये

परभणीमध्ये शासन आपल्या दारी ही योजना राबवत असताना जिल्ह्यातील साडे आठ लाख लोकांना या योजनांला लाभ मिळाला आहे. त्यामुळेच हे आमचे सरकार म्हणजे सामान्य माणसांचं परिवर्तन करणारे सरकार असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी आमचे सरकार नेहमीच कटिबद्ध आहे. त्यामुळे गोदावरी खोऱ्यात पाणी आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करुन पाणी प्रश्नही सोडवायचा आहे. मराठवाड्याच्या मागच्या पिढीने दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीने तो पाहू नये यासाठीच मराठवाड्यात 23 हजार हेक्टर जमीन सिंचन योजने खाली आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हे ही वाचा >> Vijay Wadettiwar on Ajit Pawar : ‘अजितदादा इकडेही उपमुख्यमंत्री अन् तिकडेही…’; वडेट्टीवारांचा टोला…

एकही माणूस बेघर राहणार नाही

सरकारच्या ध्येयधोरणांमुळे जिल्ह्यात वॉटर स्ट्रक्चर राबवून परभणी जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. आमचे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून देशातील एकही माणूस बेघर राहणार नाही याची काळजीही आम्ही घेतो असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जेवढी घरं मागाल तेवढी घरं देणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी जिल्ह्याला अश्वासन देताना म्हटले की, परभणीकरांनी जेवढी घरं मागाल तेवढी घरं आम्ही तुम्हाला देणार असं मोठं अश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तसेच महिलांना बळ देण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असून महिलांचा विकास हाही आमच्यासाठी महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा >> Ajit Pawar: फडणवीसांसमोरच अजित पवारांची संभाजी भिडेंवर टीका, म्हणाले, ‘वाचाळवीर…’

विरोधक फक्त बोट करतात

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरही सडकून टीका केली. विरोधक फक्त टीका करतात मात्र ते काय केले पाहिजे आणि काय कमी आहे ते मात्र सांगत नाहीत. त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांना भोंगा म्हणत सकाळी चालू होतो आणि रात्री तो बंद होतो म्हणत नाव न घेता त्यांच्यावर त्यांनी टीका केली.

ADVERTISEMENT

विरोधकांकडून फक्त टीका केली जाते त्यामुळे निंदकाचे घर असावे शेजारी या उक्तीप्रमाणे आमच्यासाठी महत्वाचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता आम्ही तिघंही राज्यात परिवर्तन केल्याशिवाय शांत बसणार नाही अशा शब्दात विरोधकांना त्यांनी ठणकावून सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT