Vijay Wadettiwar: “महायुती सरकारमध्ये काय चाललंय?” केसरकरांच्या पत्रानंतर शिंदेंना सवाल
जालन्याचे माजी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची सीआयडी विभागात बदली करण्यात आली. या बदलीला एकनाथ शिंदेंचे मंत्री दीपक केसरकर यांनी विरोध केला आहे. यावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारला सुनावलं.
ADVERTISEMENT
Maharashtra Politics : शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या पत्रामुळे अनेक तर्कवितर्क लावण्यास सुरूवात झाली आहे. दीपक केसरकरांचं पत्र शेअर करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सरकारला घेरलं आहे. (Opposition leader Vijay Wadettiwar Slams to Shinde government over miscommunication in three parties)
ADVERTISEMENT
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असताना पोलिसांकडून लाठीमार करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी जालन्याचे तत्कालिन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर कारवाई मागणी मनोज जरांगेंसह मराठा आंदोलकांनी केली होती.
दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. पण, आता त्यांची गुन्हे अन्वेषण विभागात बदली करण्यात आली आहे. यावरूनच महायुती सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. दोषींच्या नियुक्तीवर दीपक केसरकरांनी आक्षेप घेतला असून, मुख्यमंत्री शिंदेंना पत्र दिलं. याच मुद्द्यावर बोट ठेवत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलंय.
हे वाचलं का?
विजय वडेट्टीवारांनी पोस्ट काय म्हटलंय? पोस्ट वाचा जशीच्या तशी
महायुती सरकारमध्ये नेमकं काय चाललंय?
अंतरवाली सराटी येथील वयोवृद्ध नागरिक, महिलांसह निर्दोष आंदोलकांवर अमानुष लाठीमार झाला. या लाठीमाराचे आदेश नेमके कोणी दिले, हा सस्पेन्स अजूनही सुटलेला नाही.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> “किती तो निर्लज्जपणा?”, ठाकरे गट संतापला, शिंदेंना दिला इशारा
त्या पोलिसी अत्याचारासाठी स्वतः गृहमंत्र्यांवर राज्याची माफी मागण्याची नामुष्की ओढवली. लाठीमारानंतर जालनाचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर कठोर कारवाईची अपेक्षा होती. मात्र कारवाईच्या नावाखाली त्यांना पुण्यात ‘क्रिम पोस्ट’वर बदली मिळाली.
मराठा आंदोलकांवर झालेल्या दडपशाहीसाठी त्यांना गृहखात्याने नेमकी शिक्षा दिली की प्रमोशन अशी चर्चा सुरू असताना आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती द्या अशी मागणी करत आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> मुख्यमंत्र्यांनी ‘ती’ चूक केली? छगन भुजबळ म्हणाले, “ते माझे बॉस”
महायुती सरकारमध्ये नेमकं काय चाललंय?
अंतरवाली सराटी येथील वयोवृद्ध नागरिक, महिलांसह निर्दोष आंदोलकांवर अमानुष लाठीमार झाला. या लाठीमाराचे आदेश नेमके कोणी दिले, हा सस्पेन्स अजूनही सुटलेला नाही.
त्या पोलिसी अत्याचारासाठी स्वतः गृहमंत्र्यांवर राज्याची माफी मागण्याची नामुष्की… pic.twitter.com/ECuspkGmpa
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 24, 2023
विशेष म्हणजे राज्य सरकारच्या कामकाजाबाबतची माहिती पत्रांवर पत्रे लिहिल्यानंतर मिळत नाही, केसरकरांचे हे पत्र मात्र लगेच सार्वजनिक होते. हा सारा प्रकार म्हणजे एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसर्याने रडल्यासारखे करायचे, असाच आहे. महायुतीचे सरकार हे जनतेला मूर्ख बनवू पाहणारे हेराफेरी सरकार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT