“पोरं सांभाळायला गेलं, तर टोप पडतो”, उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचलं
महाड येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यावर टीका केली.
ADVERTISEMENT

बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये सभा झाली. काँग्रेसच्या स्नेहलता जगताप यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. यावेळी ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांना लक्ष्य केलं. (uddhav thackeray attacks on union minister narayan rane in mahad rally)
उद्धव ठाकरे म्हणाले, “मोदींना माझा सवाल आहे की, काँग्रेसने दिलेल्या शिव्या तुम्ही दररोज मोजताहेत. पण, तुमची भोकं पडलेली टीनपाटं, हा बराच शब्द आहे. त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. हे जे रोज माझ्यावर बोलताहेत. आज सुद्धा बोलले आहेत. विनायक राऊत मघाशी सांगत होते की, साहेब आमच्याकडे एक तो आहे ना एकाबरोबर दोन फ्री”, अशा शब्दात ठाकरेंनी खिल्ली उडवली.
हेही वाचा >> राज ठाकरेंचं अजित पवारांकडे बोट; पवारांच्या राजीनाम्यावर मोठं विधान
“त्याची म्हणे इतकी पंचाईत झालेली आहे की, त्यांना काय सांभाळावं हे कळत नाही. दोन पोरं सांभाळायला गेलं, तर डोक्यावरचा टोप पडतो. टोप सांभाळायला गेलं, तर पोरं सुटतात. त्याच्यामुळे सुक्ष्म माणसांवर मोठी जबाबदारी आलेली आहे”, असं म्हणत ठाकरेंनी राणेंना डिवचलं.
“उद्धव ठाकरेंना संपवायचं आहे ना, संपवा”
“ते रोज वाटेल ते बोलताहेत. बोलू द्या कारण त्याच्यावर त्यांचं पोट चालतं. उद्धव ठाकरेंचं तुम्ही सगळं काढून घेतलंत, तरी सुद्धा तुम्हाला उद्धव ठाकरेंची का भीती वाटते. का भीती वाटते?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.
“उद्धव ठाकरेलाच संपवायचं आहे ना? संपवा, हे उपस्थित माझे कुटुंबीय आहेत. तिकडे बारसूमध्ये त्यांनी सगळा तमाशा केला. बारसूमध्ये म्हणे उद्धव ठाकरेंच्या नातेवाईकांच्या जमिनी आहेत. लोक सांगताहेत नाहीये. हे खोटं आहेत. मी म्हटलं हो आहे. कारण तुम्ही सगळे माझे नातेवाईक आहात”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा >> uddhav Thackeray Speech : उद्धव ठाकरेंनी काढली ‘भाकरी’, शिंदेंवर बरसले!
“आता जरा लढायला बळ आलं आहे. कारण आता मी माझ्या नातेवाईकांसाठी लढतोय. त्यांना सुद्धा बळ आलं की उद्धव ठाकरे त्यांचे नातेवाईक आहे. मी तर माझ्या नातेवाईकांसाठी लढतोय, तुम्ही तर उपऱ्यांसाठी लढताहेत. ज्याचं तुमचं काहीच घेणं देणं नाहीये. माझा महाराष्ट्र तुम्ही मारता आहात”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.