औरंगजेबाच्या कबरीवर ‘आंबेडकर’ नतमस्तक, भाजप नेत्याने ठाकरेंनाच केलं टार्गेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

uddhav thackeray agree to prakash ambedkar bowing at the grave of Aurangzeb chandrashekhar bawankule criticize
uddhav thackeray agree to prakash ambedkar bowing at the grave of Aurangzeb chandrashekhar bawankule criticize
social share
google news

राज्यात औरंगजेबाचा स्टेटस ठेवल्या प्रकरणावरून ठिकठिकाणी वाद सुरु असतानाच आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आहे. या भेटीनंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होणारे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मान्य आहेत का? असा सतंप्त सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच ठाकरेंनी यावर तातडीने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी देखील बावनकुळे यांनी केली आहे. (uddhav thackeray agree to prakash ambedkar bowing at the grave of Aurangzeb chandrashekhar bawankule criticize)

ADVERTISEMENT

चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या औरंगजेबाच्या कबरीच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी त्य़ांच्यातील युती अनेकवेळा जाहिर केली आहे. दोघांची युती झाली की नाही, यापेक्षा प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र आहेत. हे उद्धव ठाकरेंच्या बोलण्यावरून वारंवार समोर आले आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

हे ही वाचा : ‘शिंदेंना मुख्यमंत्री करायचं ठरलेलं, फडणवीसांना माहितीही नव्हतं’, कोणी केला गौप्यस्फोट?

प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर गेले आहेत. त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होणारे नेते उद्धव ठाकरेंना मान्य आहेत का? आता प्रकाश आंबेडकरांसोबत युती करणार आहात का? की आंबेडकरांसोबत युती झाली आहे? असे अनेक सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केले. याबाबत उद्धव ठाकरे यांनी लंडनमध्ये असतील तर लंडनमधून, मुंबईत असतील तर मुंबईतून, तातडीने त्यांनी प्रतिक्रिया देऊन स्पष्ट केले पाहिजे अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

हे वाचलं का?

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

औरंगजेब 50 वर्ष राज्य करून गेला. ते तुम्ही पुसणार आहात का? औरंगजेबाचं राज्य का आलं, हे बाबासाहेबांनी सांगितलं आहे. जयचंद इथे आणि राज्या-राज्यात झाले. त्यामुळे जयचंदांना शिव्या घाला. औरंगजेबाला शिव्या कशाला घालता, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला होता. तसेच पत्रकारांनी त्यांना औरंगजेबाच्या कबरीच्या भेटीने शिवसेनेची कोंडी होऊ शकते? असा सवाल केला होता. यावर शिवसेनेची कोंडी होणार नाही असे स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

दरम्यान आता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या स्पष्टीकरणानंतर देखील ठाकरेंना भाजपमधून टार्गेट करण्यात येत आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा :  Ayodhya Poul Thane: अयोध्या पौळ यांनी सांगितलेली ‘ती’ धक्कादायक घटना जशीच्या तशी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT