Uddhav Thackeray : ‘मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेची सुरुवात सहकाऱ्यांपासून करावी’, ठाकरेंचा सणसणीत टोला

प्रशांत गोमाणे

उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या न्यायातून तुम्ही नवाब मलिकांना दुर ठेवले, तोच न्याच दुसऱ्यांना लावणार आहात की नाही? एकाला एक न्याय,दुसऱ्याला एक न्याय, पण लोकांना हा निर्णय पटेल का? असा सवाल देखील ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

ADVERTISEMENT

uddhav thackeray criticize cm eknath shinde on beach clean drive mumbai nawab malik praful patel ncp maharashtra politics)
uddhav thackeray criticize cm eknath shinde on beach clean drive mumbai nawab malik praful patel ncp maharashtra politics)
social share
google news

Uddhav Thackeray Criticize CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी मुंबईतील समु्द्र किनारे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.या मोहिमे दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्रक्टर देखील चालवला होता. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीवर आता ठाकरेंनी (Uddhav Thackeray) टीका केली आहे. समुद्रावर ट्रॅक्टर फिरवणारा मुख्यमंत्री मी पहिल्यांदाच पाहिलाय, अशा शब्दात ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या ज्या नेत्यांवर आरोप आहेत, त्या नेत्यांपासून स्वच्छतेची सुरुवात करावी, अशा शब्दात ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांना सुनावले आहे. (uddhav thackeray criticize cm eknath shinde on beach clean drive mumbai nawab malik praful patel ncp maharashtra politics)

उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यासह देशातील अनेक मुद्यावर भाष्य केले. समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी महापालिका समर्थ आहे. त्यामुळे त्यांच्या (मुख्यमंत्र्यांच्या) ज्या नेत्यावर आरोप आहेत, त्या नेत्यांची पहिल्यांदाच स्वच्छता करावी, असा सल्ला ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला आहे. यासोबत धारावीच्या मुद्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘विकास धारावीचा हवा,मोदींच्या मित्राचा नव्हे’, अशा शब्दात भाजपवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : Article 370 Verdict: मोदींचा ‘तो’ निर्णय कोर्टाने कसा ठरवला बरोबर, वाचा Inside Story

दरम्यान काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पत्रक प्रसिद्द करून नवाब मलिकांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा सल्ला राष्ट्रवादीला दिला होता. या घडामोडींवर उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या न्यायातून तुम्ही नवाब मलिकांना दुर ठेवले, तोच न्याच दुसऱ्यांना लावणार आहात की नाही? एकाला एक न्याय,दुसऱ्याला एक न्याय, पण लोकांना हा निर्णय ‘पटेल’ का? नवाब मलिकांना जो न्याय लावणार असाल, तोच न्याय प्रफुल पटेलांना लावून, त्यांच्यापासून तुम्ही अंतर ठेवणार का? असे अनेक सवाल भाजपला केले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसेनेसोबत युतीत असताना पंतप्रधान मोदींनी प्रफुल पटेलांवर आरोप केल्याचा आठवणही सांगितली.’कुछ लोग मिरची का व्यापार करते आहे’, ‘कुछ लोग मिरची से व्यापार करते आहे’, त्यामुळे ज्यांनी मिरचीशी व्यवहार केला आहे, त्यांच्यासोबत तुम्ही हा सत्तेचा व्यापार चालू देणार आहात का? ,असा सवाल देखील ठाकरेंनी भाजपाला केला आहे.

हे ही वाचा : Asaduddin Owaisi : “…मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्यापासून भाजपला कुणीही रोखू शकत नाही”

हे वाचलं का?

    follow whatsapp