मोदी, शाह, फडणवीस; उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात फुंकले रणशिंग, शिवसैनिकांना काय दिला मेसेज?

मुंबई तक

ADVERTISEMENT

uddhav thackeray criticize devendra fadnavis pm narendra modi amit shah on thackeray group statewide meeting worli
uddhav thackeray criticize devendra fadnavis pm narendra modi amit shah on thackeray group statewide meeting worli
social share
google news

Maharashtra Political News : कितीही शहा आणि अफजलखान येऊ द्यात, तुम्ही सोबत आहात मला चिंता नाही, असा विश्वास आज शिवसेना ”उद्धव बाळासाहेब ठाकरे” गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. वरळीत आयोजित राज्यव्यापी पदाधिकारी शिबीरात ते बोलत होते. तसेच मणिपूरला जाऊन या. मोदी अमेरिकेत जातायत मग मणिपूरला का जात नाही. मोदींनी जाऊन दाखवावे मणिपूरला, असे थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. यासह अनेक मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात काय काय मुद्दे मांडलेत ? हे जाणून घेऊयात. (uddhav thackeray criticize devendra fadnavis pm narendra modi amit shah on thackeray group statewide meeting worli)

ADVERTISEMENT

हल्ली बरेचदा असं होतं तुमचा उत्साह बघितला की भारावल्यासारखे होते. शिवसेनाप्रमुखांनी तुमच्या सारखे लढवय्ये मला दिले, हे माझे किती जन्माचे भाग्य आहे, जिवाला जीव देणारे सोबती मला लाभले. कागदावर माझ्याकडे काहीच नाही, ना चिन्ह, ना नाव. तुम्ही रक्ताची पाणी केले ते लाचार ”मिंधे” पलिकडे गेले तरी देखील तुम्ही सोबत आहात. तुमची साथ महत्वाची. उद्या आपला वर्धापनदिन आणि परवा जागतिक गद्दार दिन. मराठी, अमराठी, मुस्लमान, ख्रिश्चन आहेत.

‘हेच ते ठिकाण इथे कोविड सेंटर”, ”लोक म्हणतात जे गेले त्यांना जाऊ द्या”, ”सुखात सोबत असणारे रिश्ते आणि दुखात सोबत असतात ते फरिश्ते”. ”कितीही शहा आणि अफजलखान येऊ द्यात तुम्ही सोबत आहात मला चिंता नाही”. आपल्या घरात येऊन फोडाफोडी करताहेत. सत्तेची मस्ती आहे तुमचा फुगा फोडायला आम्हाला वेळ लागणार नाही. जा मणिपूर मध्ये जाऊ या. अमित शहांनी जाऊन काय केले? मोदी अमेरिकेत जातायत मग मणिपूरला का जात नाही. युक्रेन युध्द थांबवले ही भाकड कथा. मोदींनी जाऊन दाखवावे मणिपूरला. मुद्दाम अयोध्येला व्यासपीठावर बोलावले. यापुढे माता भगिनीवर हात उचलला तर तो हात जागेवर ठेवू नका. आणीबाणीचा काळ मला आठवतो. जनता पक्षाचा काळ मला आठवतो. शिवसेनाप्रमुख म्हणाले मला आठ दहा असलेले असतील तरी मला चालतील. युध्द निष्ठेवर लढल्या जाते. पानिपतच्या युद्धाचा संदर्भ. तिथे पण कुणी शहा होता. मराठ्यामध्ये फुट पाडा ही आजची निती नाही. तुमच्या डोळ्यादेखत लुट सुरु आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु होती आता हे मुंबईचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही ते होऊ देणार नाही.

हे वाचलं का?

मी २३ तारखेला पाटण्याला जातोय. पूर्वी भाजपचे लोक यायचे आता भाजप सोडून सगळे येताहेत. भाजपेत्तर एकत्र येणार आहे ती देशप्रेमींची एकजूट होणार आहे. काल परवा फडणवीसांनी प्रश्न विचारला पूर्वी एक जाहीरात यायची सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. सावरकरांनी हालपेष्टा मोदी शहा फडणवीसांसाठी भोगल्या नव्हत्या. आमचा एकच बाप तुमचे किती? तुम्ही सावरकर प्रेमी असाल तर देश बुडाखाली घेणाऱ्या तुमच्या नेत्याचा करा.

स्मृती इराणींना प्रश्न विचारला तर त्याला नौकरी वरुन काढून टाकला. ”हिटलर पण असाच माजला होता”. याची सुरुवात कशी झाली. ”अगोदर मिडियावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली. विरोधकांचा छळ सुरु केला, सत्य दडपून टाकला आम्ही म्हणू तेच सत्य तेव्हा हिटलर माजला”. हिंदू आहोतच आम्ही, तुम्ही ढकलले म्हणून आम्ही गेलो. अमित शहांना प्रश्न विचारले तर बोबडी वळते. ३७० ला आमचा पाठिंबाच पण अजूनही निवडणुका घेऊ शकत नाही याचे उत्तर द्यावे तिथला ”हिंदू सुरक्षित नाही, अजूनही काश्मिरी पंडित परतलेला नाही”. मणिपूरला काय गोमूत्र शिंपडणार आहात? आम्ही मोदींचा चेहरा लावला तुम्ही बाळासाहेबांचा चेहरा लावला. कर्नाटकात तर मोदींचाच चेहरा लावला होता ते होणार नाही म्हणून बजरंगबलीचे नाव घेतले.

ADVERTISEMENT

”शिवसेना उत्तमपणे सरकार चालवू शकते हे लोकांना दाखवून दिले आहे”. ”लोकांना पटवून द्या”. ”अरविंद सावंतांनी दिलेल्या राजीनाम्याचा उल्लेख”. ”अनेकांना वाटले हा उडणार पण मी सगळ्यांना झोपवून दिले होते तुमच्या ताकदीवर पुन्हा उभा आहे”. प्रशासन तेच होत मला आज जो मान मिळतोय कुटुंबातील सदस्य लोकांना वाटतो. हा मान तुम्हाला मिळणार नाही. देश मजबूत असायला हवा असेल तर मग सरकार अस्थिर असायला हवे का? वाजपेयीजी, नरसिंह राव यांनी चांगले सरकार चालवले नंतर हे टिकोजीराव आले.

ADVERTISEMENT

”आज यांचे दिल्लीत मुजरे मारणे सुरु आहे”. ”असा लेचापेचा ”मिंधा” महाराष्ट्र हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता”. शिवसेनेची स्थापना झाली ते बघण्याचे माझे भाग्य. आजोबांची आठवण शिवसेना नावाची. सहदेव नाईक यांची पण आठवण. हे काय सांगतात मला विचारांची स्थापना हे आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार. एका मंत्र्याला महिला अत्याचार केला म्हणून हाकलला. आपण महाराजांचे नाव घेतो. हे मांडीला मांडी लावून बसता. मोहनजी भागवतांना म्हणतोय तुमचे हिंदुत्व स्पष्ट करा. मनकी बात आता ऊर्दूत भागवत मशिदीत जातायत. समान नागरी कायद्याला आमचा पाठिंबा. त्याचा हिंदूंना किती त्रास होणार हे पण सांगा, गोवंश हत्या बंदी तुम्ही देशभरात लावू शकत नाही. समान वागणूक कायदा अगोदर आणा.

”आम्ही आरोप केले तर झाकून ठेवायचे”. ”मुंबई मनपाची कुत्रा पकडण्याची गाडी तस भाजपचे सध्या झालय”. ”जनसंघ जनता पक्षात घुसला मग भाजप म्हणून बाहेर आला, मग युती केली”. ”उद्या मी कमळाबाई म्हणालो, म्हणजे मी बाळासाहेबांचे विचार पुढे नेतो आहे”. नुसते आरोप करायचे आणि भ्रष्ट पक्षात घ्यायचे. ”मला अस कळलंय मिध्यांना काही हजार कोटी निवडणुकीपर्यंत द्यायला सांगतले आहे”. आपला दवाखाना आपले वचन होते, त्यावर यांचे फोटो. ”तुम्ही मातब्बर असूनही हिंदू कसा खतरे मे?” ”तुम्ही आल्यावर कश्या दंगली सुरु झाला. मणिपूरला हिंदूच मारले जाताहेत. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व तोच वारसा आम्ही समोर नेतोय.” गोमूत्र, शेंडी जानवे, केवळ देवळात घंटा बडवणारा हिंदू आम्हाला मान्य नाही. देशासाठी लढणारे सगळे हिंदू.

गद्दार आईच्या कुशीवर वार करुन गेले आहेत. कुणीही देशापेक्षा मोठा होऊ शकत नाही देश सर्वोच्च. मोदींचा देश मग इतरांचा देश नाहीए. आमची ओळख भारतमातेचा पुत्र म्हणून व्हायला हवी. हिंदुस्थान ही ओळख मोठी पंतप्रधान उद्याही होतील अगोदर ही होते. पाठ्यपुस्तक मंडळाने राजीनामे दिले कारण त्यांनी मान्य केलेली पुस्तके नाहीत. इतिहास बिघडवणारे तुम्ही आम्ही इतिहास घडविणारे. निवडणुकीचे वर्ष सुरु झालेले आहे. पैसा येईल. बेळगावचा प्रश्न आहेच पण कर्नाटकच्या जनतेचे धन्यवाद. त्यावेळचा गॅसचा भाव आताचा भाव सगळ्यांना विचारा जनतेला. महागाई बेरोजगारी किती वाढली. अनेक योजनांचे फोटो, आपण एकमेकात बोलत नाही आता झाडाझडती घ्या’. दहा वर्षे हा काळ मोठा आहे. माझा उलटा प्रश्न जी देशाची वाट लागली आहे त्यापेक्षा अधिक कोण वाट लावू शकतो? ”भाजपची वाटचाल हुकूमशाही कडे सुरु आहे”. ”हिटलरच्या वाटेवर भाजप”. आपले काम आहे क्रांतिकारकांची शपथ घेऊन पुढे जायचे आहे. इंग्रजांना सुध्दा जावे लागले. इंग्रज पण गुर्मीत होते. भाजप आव्हान नाही पण जे पायंडे पाडताहेत ते आव्हान आहे. केवळ एक बोट व्यवस्थित मतदान करुन देश स्वच्छ ठेवू शकतो. आपल्यावर देशाचे लक्ष आहे अशी वाटचाल महाराष्ट्रात करा.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT