“फडणवीसांची हरकाम्या करून ‘लायकी’ काढली हे…”; ठाकरे गटाचा वर्मावर ‘बाण’

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Shiv Sena (UBT) : Devendra fadnavis leadership trying to finish by Narendra Modi and amit shah said in Saamana editorial.
Shiv Sena (UBT) : Devendra fadnavis leadership trying to finish by Narendra Modi and amit shah said in Saamana editorial.
social share
google news

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : “शिंदे-पवार प्रकरणात भाजपची पुरती ‘फजीहत’ झाली असून फडणवीस यांच्या नेतृत्वाची चमक साफ उतरली आहे. त्यामुळे त्यांना केंद्रात तरी स्थान मिळेल काय? हा प्रश्नच आहे”, असे म्हणत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या वर्मावर बाण डागला आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यापासून विरोधकांकडून त्यांना डिचवलं जात आहे. त्यातच शिवसेना नेते शिरसाट यांनी केलेल्या विधानावर बोट ठेवत शिवसेनेने पुन्हा एकदा वार केला आहे. (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) Targeted Devendra Fadnavis. Thackeray faction said Delhi needs Fadnavis leadership.)

ADVERTISEMENT

‘फडणवीसांची कपॅसिटी’ या मथळ्याखाली सामनामध्ये अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. या अग्रलेखातून शिवसेनेने (यूबीटी) देवेंद्र फडणवीसांना चिमटे काढले आहेत.

“देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात राहू नये, त्यांनी केंद्रात जावे, अशा सूचना सरकारातील शिंदे गटाने केल्या आहेत. शिंदे मुख्यमंत्री राहावेत, असे या गटाचे म्हणणे आहे. दुसऱ्या बाजूला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे की, फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्याच वेळी अजितदादा गटाचे धर्मराव बाबा अत्राम यांनी घोषणा केली की, ‘अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होत आहेत.’ छगन भुजबळ यांनीही अजितदादा मुख्यमंत्री होतील यास दुजोरा दिला आहे. एकंदरीत महाराष्ट्रात याक्षणी तीन-तीन मुख्यमंत्री घोड्यावर बसले आहेत, पण घोडा काही पुढे सरकायला तयार नाही”, असं भाष्य सामना अग्रलेखात करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

फडणवीसांची लायकी निघाली -शिवसेना (यूबीटी)

शिवसेनेने (यूबीटी) पुढे म्हटलं आहे की, “शिंदे गटाचे प्रवक्ते शिरसाट यांनी सांगितले, ‘फडणवीस यांचे काम उत्कृष्ट आहे, त्यांनी केंद्रात जावे.’ फडणवीसांवर ही काय वेळ आली आहे? महाराष्ट्रातील यत्किंचित लोक त्यांना केंद्रात जाऊन काम करण्याचा सल्ला देत आहेत. फडणवीसांची लायकीच या प्रकरणात निघाली”, अशा शब्दात ठाकरे गटाने फडणवीसांवर प्रहार केला आहे.

हेही वाचा >> शिंदेंना माझा सवाल, ती याचिका कुणाच्या सांगण्यावरून मागे घेतली -राज ठाकरे

“शिंदे हे अलीकडे वारंवार रात्री-अपरात्री दिल्लीत जातात ते फडणवीस यांना केंद्रात स्थान मिळावे यासाठीच की काय? फडणवीस हे अपमानाचा घोट गिळून महाराष्ट्रात दुय्यम स्थानी बसले आहेत. दोन-दोन उपवस्त्र दिल्लीने त्यांच्या उरावर बसविली आहेत. महाराष्ट्राची चारही बाजूंनी लूट सुरू आहे व फडणवीस हतबलतेने हे सर्व सहन करीत आहेत. गेल्या वर्षभरात भारतीय जनता पक्षाची उरलीसुरली पत रसातळाला पोहोचली आहे”, असे ठाकरे गटाने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

‘नागपुरात भाजप पराभवाच्या छायेत’

“कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे खल्लास झाली आहे. विफलता व निराशा फडणवीसांच्या चेहऱ्यावर, वागण्या-बोलण्यात स्पष्ट दिसते. हे वातावरण असे आहे की, नागपुरात लोकसभा आणि विधानसभेत भारतीय जनता पक्ष पराभवाच्या छायेत स्पष्ट दिसतो आहे. लोकांच्या मनात संतापाचा लाव्हा उसळत आहे. शिंदे-पवार प्रकरणात भाजपची पुरती ‘फजीहत’ झाली असून फडणवीस यांच्या नेतृत्वाची चमक साफ उतरली आहे. त्यामुळे त्यांना केंद्रात तरी स्थान मिळेल काय? हा प्रश्नच आहे”, अशी शंका शिवसेनेने (यूबीटी) उपस्थित करत फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> What is Hamas : माणसांच्या कत्तली… इस्रायलला संपवण्यासाठी जन्म; काय आहे हमास?

“देशाची राजधानी आता दिल्ली राहिलेली नसून गुजरातचे महत्त्व वाढवले जात आहे. त्यामुळे फडणवीस, शिंदे, अजित पवारांना यापुढे सुरत-अहमदाबादचेच हेलपाटे घालावे लागतील. 2024 नंतर दिल्ली आणि महाराष्ट्रात उलथापालथी होऊन दोन्हीकडील राज्यशकटे बदललेली असतील. अशा वेळी शिंदे काय व अजित पवार काय, हे सर्वच बाबतीत बिनकामाचे ठरतील याविषयी आमच्या मनात शंका नाही”, असे मोठे भाकित सामना अग्रलेखातून करण्यात आलं आहे.

मोदी-शाहांना कपॅसिटीचा शोध का लागत नाही?

“फडणवीसांची कपॅसिटी आहे व ती कपॅसिटी फक्त दिल्लीतच उपयुक्त असल्याचे शिंदे गटाने ठरवले आहे खरे, पण या कपॅसिटीचा शोध मोदी-शहांना का लागू नये? कपॅसिटी असताना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून खाली आणले व कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून ‘लायकी’ काढली हे बरे नाही”, अशा शब्दात ठाकरे गटाने फडणवीसांना चिमटे काढले आहेत.

हेही वाचा >> NCP Crisis : शरद पवारांची स्ट्रॅटजी ठरली! अजित पवारांचा ‘डाव’ असा पाडणार हाणून

“फडणवीसांची गरज दिल्लीत आहे, असे शिंदे गट म्हणतोय. गाझापट्टीत युद्ध भडकले आहे. जग तिसऱया महायुद्धाच्या उंबरठय़ावर आहे. युद्धाचा हा भडका विझवायचा असेल तर नागपूरचे सोमेश्वरी बंब घेऊन फडणवीसांना दिल्लीत पाठवावे लागेल. मणिपूरपासून कश्मीरपर्यंत बरेच प्रश्न आहेत, चिनी सैन्यही देशाच्या सीमा भागांत घुसले आहे. हे सर्व प्रश्न सोडविण्याची फडणवीसांची कपॅसिटी आहेच. मोदी-शहा पूर्ण अपयशी ठरले आहेत. फक्त फडणवीसांना दिल्लीत पाठविण्याची कपॅसिटी शिंदे-मिंधे गटात आहे काय?”, उलट सवाल करत शिवसेनेने (यूबीटी) एकनाथ शिंदेंनाही लक्ष्य केलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT