uddhav Thackeray Speech : उद्धव ठाकरेंनी काढली ‘भाकरी’, शिंदेंवर बरसले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

uddhav thackeray mahad sabha full speech
uddhav thackeray mahad sabha full speech
social share
google news

शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यात एक शब्द प्रामुख्याने चर्चेत आला, तो म्हणजे भाकरी. शरद पवारांनी भाकरी फिरवण्याचा शब्दप्रयोग एका कार्यक्रमात केला होता. भाकरी फिरवलीच्या चर्चेंनं राजकारण ढवळून निघाल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी महाडच्या सभेत भाकरीचा उल्लेख केला. स्नेहल जगताप यांचा शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश झाला. या कार्यक्रमात ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्ला चढवला.

ADVERTISEMENT

महाड येथे स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश आणि उद्धव ठाकरेंची सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “आज जगताप कुटुंब आपल्या शिवसेना कुटुंबात आलेलं आहे. स्नेहलताईंचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं स्वागत करतो. खरं म्हणजे मी असं म्हणत होतो की, मातोश्रीवर प्रवेशाचा कार्यक्रम घेऊयात. नंतर महाडमध्ये सभा घेऊ, पण ऐकतील ते जगताप कुटुंबीय कसले. त्यांनी हट्टच धरला. या ऐतिहासिक मैदानातच सर्वांच्या साक्षीने आम्ही प्रवेश घेणार म्हणून मुद्दामहून आलो.”

हेही वाचा >> राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा एकटे पडले का, कसं फिरलं संपूर्ण राजकारण?

“स्नेहलताई आणि जगताप कुटुंबीय काँग्रेसमधून आलं आणि काहीजणांच्या भुवया उंचावल्या, काही जणांच्या पोटात गोळा आला की, पुढच्या निवडणुकीत डिपॉझिट शंभर नव्हे, एक लाख टक्के जप्त होणार. मग आता कसं होणार? काँग्रेसमधून शिवसेनेत आले, मग शिवसैनिकांचं काय होणार? काय होणार म्हणजे काय, आपल्यातला गद्दार घेऊन भाजपवाल्यांनी नाही डोक्यावर चढवला. आपण तसं काही करत नाहीये, त्यांना काहीही न देता त्या आपल्याकडे आल्या आहेत”, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

नीच डाव भाजपनं केला आणि… ठाकरे काय म्हणाले?

महाडच्या सभेत ठाकरेंनी भाजपलाही लक्ष्य केलं. “मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, नेहमी सत्ता असते, तर सत्तेकडे लोक जातात. आज माझ्याकडे तर सत्ता नाहीये. आपल्या पाठीत आपल्याच लोकांनी केला. गद्दारी केली. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं आणि स्वतः तिथे बसले. मग ज्यांनी त्यांना फूस लावली म्हणजे भाजपने इतका नीच डाव केला की आपलं चिन्ह चोरलं. आपला धनुष्यबाणही चोरला आणि त्यांच्या डोक्यावर मारलं. मी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेऊनच तुमच्यासमोर आलो आहे. बाकी माझ्याजवळ काही नाही. तरीदेखील तुम्ही एवढ्या प्रचंड संख्येनं सोबत आलेला आहात. जगताप कुटुंब आलं आहे.”, असं ठाकरे म्हणाले.

“मैदान आता अपुरी पडताहेत. अनेकांना असं वाटलं होतं की शिवसेना आता संपली. संपवली पाहिजे. काही जणांचा असा गैरसमज झाला होता की, ते स्वतः म्हणजे शिवसेना. तुम्ही निवडून दिलेली, मोठी केलेली माणसं गेली. पण, ज्यांनी मोठी केली, ती माणसं सहस्त्रपटीने माझ्यासोबत आली आहेत”, अशी टीका ठाकरेंनी भाजपवर केली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “शरद पवारांनी अजित पवारांना मामा बनवलं”, निखील वागळेंचं स्फोटक विश्लेषण

“काही जणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय घशाखाली घासच उतरत नाहीये. आता मला असं वाटायला लागलं आहे की, माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना भाकरच मिळत नाही. मला एक समाधान आहे की, माझ्यावर आरोप करणाऱ्यांना सुद्धा भाकरी मिळतेय. दोन घास मिळताहेत. हेही नसे थोडके”, असा टोला ठाकरेंनी शिंदेंना आणि भाजपला लगावला.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT