ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याआधीच मोठा राडा! बॅनर फाडले, नोटीसा बजावल्या, जमावबंदीचे आदेश… काय घडलं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

uddhav thackeray thane mumbra party office banner torn shinde group worker notice jitendra awhad
uddhav thackeray thane mumbra party office banner torn shinde group worker notice jitendra awhad
social share
google news

UBT Uddhav Thackeray Thane Mumbra Demolish Party Office : माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज ठाणे दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे ठाण्यात शिंदे गटाच्या नेत्याने बुलडोझर फिरवलेल्या मुब्र्यातील शिवसेनेच्या शाखेची पाहणी करणार आहेत. या ठाणे दौऱ्यापूर्वीच मोठा राडा झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडण्यात आले आहेत. त्याचसोबत शिंदे गटाच्या नेत्या-कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या दौऱ्याआधीच ठाण्यात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. (uddhav thackeray thane tour banner torn shinde group worker notice jitendra awhad)

ADVERTISEMENT

शिंदे गटाच्या नेत्यांना नोटीसा

शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन कीने यांनी बुलडोजर फिरवलेल्या शाखेला आज सायंकाळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे स्वतः भेट देणार आहेत. ठाकरेंच्या या दोऱ्यापूर्वीच शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन किने यांना 149 ची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसीअंतर्गत त्यांना सार्वजनिक ठिकाणी रॅली न काढणे, सभा न घेणे, आंदोलन न करणे अशा सर्वच गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच शिंदे गटाच्या कार्यर्त्यकांना देखील नोटीस बजावण्यात आली असून जमावबंदीचे आदेश देखील लागू करण्यात आले आहेत. यामध्ये पाचपेक्षा अधिक कार्यकर्त्यांना एका ठिकाणी भेटण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

हे ही वाचा : NCP : शरद पवारांच्या भेटीनंतर ‘दादा’ दिल्लीत! पवारांची पहिली प्रतिक्रिया आली समोर

स्वागताचे बॅनर फाडले

उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यावर कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर ठीक ठिकाणी लावले होते. हे बॅनर मध्यरात्री एका अज्ञात इसमानी फाडले आहेत.या घटनेनंतर आव्हाड यांनी ट्विट करत चांगलाच रोष व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) आधीच मुब्रा पोलिसांना होर्डिंग्ज फाडण्यात येतील,अशी शंका व्यक्त केली होती. यावर त्यांनी,”असे काहीही होणार नाही,आपण निश्चिंत रहा,आमची सर्वत्र नजर आहे”,अस मला मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले होते. पण शहरातील 90% होर्डिंग्ज आता फाडण्यात आले आहेत. एक होर्डिंग फाडायला किमान 15 मिनिट तरी लागतात.आणि “सर्वत्र नजर असणाऱ्या” पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही.आता पोलीस मला म्हणत आहेत की,”उद्धव साहेबांना आम्ही मुंब्र्यात येऊच देणार नाहीत..!” असो, तरीदेखील मी मुंब्रा पोलिसांचे आभार मानतो.ते “त्यांची ड्युटी” मोठ्या निष्ठेने करत आहेत, असा टोला त्यांनी पोलिसांना लगावला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : चार पाय, तीन हात… जन्माला आलं असं बाळ की बघून डॉक्टरांनाही बसला धक्का

दरम्यान आता उद्धव ठाकरे हे मुंब्र्यातील शाखेला भेट देऊन तेथील घटनेचा आढावा घेणार आहेत. यावेळी ते काय बोलतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT