”बिचारा देवेंद्र, मला दया येते”, ठाकरे फडणवीसांना असं का म्हणाले?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाकरी तोफ शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त मेळाव्यात चांगलीच धडाडली आहे. उद्धव ठाकरे यांनी तिखट शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. राज्य़ात उंट देखील आहेत आणि दुसऱ्यांची ओझी वाहणारी गाढव देखील आहेत. बिचाऱ्या देवेंद्रची मला दया येते. किती ओझी वाहणार,असा शब्दात ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. तसेच त्यांची पंचायती अशी झाली की सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. (udhhav thackeray criticize devendra fadnavis on hindutwa and opposition india party maharashtra politics)

ADVERTISEMENT

राज्यात उंट देखील आहेत आणि दुसऱ्यांची ओझी वाहणारी गाढवं देखील आहेत. सामना पिक्चरमध्ये गाणे आहे ना, ”कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे”… बिचाऱ्या देवेंद्रची मला दया येते. किती ओझी वाहणार, पण पंचायती अशी झाली की सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. तसेच यांच्या पक्षात एक चढला, दुसरा चढला आता गोविंदाचे थरच लागतात की काय…किती उप मुख्यमंत्री होणार, तीन-तीन उप मुख्यमंत्री करणार का? मग देवेंद्र फडणवीसांकडे राहणार काय मस्टरमंत्री, अशा शब्दात ठाकरेंनी फडणवीसांची खिल्ली उडवली आहे.

हे ही वाचा : 9 वर्ष सत्तेत असतानाही हिंदूंना…, ठाकरेंचा PM मोदींवर हल्लाबोल

तसेच आमच्या हृद्यातला राम कुणीच काढू शकत नाही आणि तुमचा सगळा आयारामांचा पक्ष झालाय. राम मंदिर बांधा पण आज तुम्ही आयारामांच मंदिर बांधलंय. त्यांच मंदिर बांधुन त्या आयारामांची पुजा करावी लागतेय, असा टोला देखील ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.

हे वाचलं का?

औरंग्याची औलाद म्हणता, मग तुमचं डबल इंजिन सरकार आहे तर शोधून दाखवा ना? असे आव्हानच ठाकरेंनी देवेद्र फडणवीसांना देत ‘माझं सरकार असताना औरंग्याची औलाद गेली कुठे होती’, पळाली कशी होती? असे देखील सांगितले. तसेच राज्यात आज सुद्धा औरंगजेब जीवंत आहे. शिवसेना फोडणारा, राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेब जीवंत आहे, ही औरंग्याची वृत्ती फडणवीसांच्या पक्षात असल्याची टीका ठाकरे यांनी केली.

हे ही वाचा : राहुल गांधी लोकसभेत कधी दिसणार, शिक्षेला स्थगिती पण खासदारकी कुठे अडकलीये?

औरंगजेब तुमच्यात दडलाय आमच्यात नाही, हा भाजपच्या घराणेशाहीचा इतिहास आहे,अशी सडकून टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच निदान आमच्या घराण्याचा इतिहास तरी आहे. आमच्या सहा-सात पिढ्या महाराष्ट्राची चरणी समर्पित होऊन जनसेवा करतायत. आणि म्हणून भाजप अख्खा जरी उभा राहीला तरी तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंना संपवू शकत नाही, असा हल्लाबोलच ठाकरे यांनी केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT