ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, ‘सेतू उद्धाटनात अटलजींचा फोटो नाहीच, राम मंदिरात तरी…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

udhhav thackeray criticize pm narendra modi on shivadi nhava sheve bridge and ram mandir temple
udhhav thackeray criticize pm narendra modi on shivadi nhava sheve bridge and ram mandir temple
social share
google news

Uddhav Thackeray criticize Narendra Modi : देव कोटक, मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे उद्धाटन पार पडले. या उद्धाटनावरून आता ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला आहे. शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे उद्धाटन झाले पण त्यात अटलजींचा फोटो कुठे होता. आता राम मंदिरात तरी रामाची मुर्ती असेल ना, अशा शब्दात ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. (udhhav thackeray criticize pm narendra modi on shivadi nhava sheve bridge and ram mandir temple)

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यापुर्वी ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसह, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्धाटन होणार आहे. या दिवशी देशात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केले होते. 22 जानेवारीला दिवाळी साजरी करा. पण त्यानंतर देशाचं जे दिवाळं निघणार आहे. त्यावरही चर्चा करा. चाय पे चर्चा करा किंवा कॉफी पे चर्चा करा. बिस्किट ढोकळा कशावरही चर्चा करा पण या मुद्द्यावर चर्चा करा, असा चिमटाही ठाकरेंनी मोदींना काढला आहे.

हे ही वाचा : Beed Accident : ट्रकला धडकून पिकअपचा चक्काचूर, बाप-लेकासह पाच जणांचा जागीच मृत्यू

पत्रकारांनी यावेळी ठाकरेंना अटल सेतू पुलाच्या उद्घाटनाचा प्रश्नही विचारला होता. या प्रश्नावर ते म्हणाले, त्यामध्ये अटलजींचा फोटो कुठे होता? आता सुद्धा मला चिंता आहे. राम मंदिरात रामाची मुर्ती असेल ना, असा हल्लोबोलही ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केला.सांगता येत नाही कुणाचीही मुर्ती लावू शकतात. त्यामुळे राम मंदिराचे निर्माण करताना इतकी कृपा करा की स्वता:ची नव्हे तर प्रभु रामचंद्राची मुर्ती लावा, असा सल्लाही ठाकरेंनी मोदींना दिला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विरोधकांनी तिजोऱ्या भरल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला होता. या आरोपावर ठाकरे म्हणाले, तुमच्या आजूबाजुला 70 हजार कोटीचे घोटाळेबाज होते. त्याच्या चाव्या तुमच्याकडे आल्या वाटतं. मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवीत 5 हजार कोटींची घट, आता या तिजोरीतले पैसै कुणी काढले ? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

हे ही वाचा : सासूला सरप्राईज देणं पडलं महागात, सून थेट गेली तुरुंगात…

येत्या 22 तारखेला आम्ही काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून 22 जानेवारीला नाशिकमधील काळाराम मंदिरात आरतीसाठी आमंत्रित केले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT