Maratha Reservation : ‘भिडे गुरूजी सरकारचा सांगकाम्या…’, विजय वड्डेटीवार भडकले
सरकारमधील शिष्यांना गुरूजींनी काल सर्टीफिकेट दिली आहेत. तुमची फसवणूक करणार नाहीत, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा, पहिला शिष्यांनी गुरूजींवर विश्वास ठेवला, आता गुरूजींनी वकिली करून शिष्यावर विश्वास ठेवायला लावला, असा टोला वड्डेटीवार यांनी भिडेंना लगावला.
ADVERTISEMENT
जालन्यात मराठा आरक्षण आणि मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटलांचे (Manoj Jarange patil) उपोषण सुरू आहे. या उपोषणस्थळी मंगळवारी शिवप्रतिष्ठाण हिंदुस्तान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji bhide) दाखल होत त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती. या भेटीवर आता विरोधी पक्षनेने विजय वड्डेटीवार यांनी टीका केली. संभाजी भिडे हा सरकारचा सांगकाम्या असल्याची टीका विजय वड्डेटीवार यांनी केली आहे. यासोबत वड्डेटीवार यांनी महायुतीचा देखील समाचार घेतला आहे. (vijay waddetiwar criticize sambhaji bhide manoj jarange patil agitation maratha reservation)
ADVERTISEMENT
विजय वड्डेटीवार यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत वड्डेटीवार यांनी संभाजी भिडे आणि सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जरांगे पाटलांची उपोषण स्थळी भेट घेणार आहेत. यावर वड्डेटीवार म्हणाले की, सरकारकडे काहीच काम उरलं नाही, त्यामुळे शासन आपल्या दारी आणि मंडपात जाऊन उपोषण सोडणे इतकंच काम उरल्याची टीका वड्डेटीवार यांनी केली.
हे ही वाचा : Maratha Morcha : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, शिंदे-पवारांचा मोठा निर्णय
विजय वड्डेटीवार यांनी पुढे संभाजी भिडे आणि महायुतीवरही टीका केली. सरकारमधील शिष्यांना गुरूजींनी काल सर्टीफिकेट दिली आहेत. तुमची फसवणूक करणार नाहीत, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा, पहिला शिष्यांनी गुरूजींवर विश्वास ठेवला, आता गुरूजींनी वकिली करून शिष्यावर विश्वास ठेवायला लावला, असा टोला वड्डेटीवार यांनी भिडेंना लगावला. तसेच संभाजी भिडे तर अजित पवारांच्या काळजात घुसून आलेत, सुंदर काळजाचे लोक आहेत असेही सर्टीफिकेट दिल्याची टीका विजय वड्डेटीवार यांनी केली. भिडे गुरूजी सरकारचा सांगकाम्या म्हणून फिरतो का? सांगकाम्याच काम करतो? असा प्रश्न होता त्याचे उत्तर आता मिळाल्याचे देखील विजय वड्डेटीवार यांनी सांगत टीका केली.
हे वाचलं का?
हे ही वाचा : India Alliance : ‘या’ 13 गोष्टी ठरवणार ‘इंडिया’चं भवितव्य, आता खरी कसोटी!
दरम्यान आज सकाळपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मराठा आऱक्षणासाठीची ही पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेआधी मुख्यमंत्री शिंदे ‘आपण बोलून मोकळे होऊ’,असे व्हिडिओत बोलताना कैद झाले होते. या व्हिडिओवरही वड्डेटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.तुम्ही बेजबाबदार आहात, हे सिद्ध झालं ना, असे वड्डेटीवार म्हणाले आहेत. मराठा आंदोलन पेटलं असताना, अस बेजबाबदारपणे कसे बोलू शकता? याचं उत्तर त्यांनी मराठा आंदोलकांना द्यावे, तसेच ही जर भाषा असेल तर मराठा समाजाला तुम्ही दुखावलात, त्यांचे प्रश्न तुम्ही गांभिर्याने घेत नाही, त्यांना तुम्ही गांभिर्याने घेत नाही हेच दिसतेय, अशी टीका देखील विजय वड्डेटीवार यांनी सरकारवर केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT