New Parliament building : नेहरू ते मोदी अन् राजदंड; इतिहास काय, इतकं महत्त्व का?
नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, यावेळी राजदंडही बसवण्यात येणार आहे. काय आहे त्याचा इतिहास?
ADVERTISEMENT
what is Sengol : भारताच्या नव्या संसद भवनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी उद्घाटन करतील. त्यावेळी सत्ता आणि न्यायाचं प्रतिक असलेल्या एका ऐतिहासिक वस्तूंचा उल्लेख होईल. 75 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा धागा याला जोडलेला असेल, तो म्हणजे राजदंडाचा! 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हाती राजदंड सोपवला अन् भारतीयांनी मोकळा श्वास घेतला. राजदंडाबद्दल आता सांगण्याचं कारण म्हणजे नव्या संसद भवनात खास राजदंड बसवला जाणार आहे. त्याचाच इतिहास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितला.
ADVERTISEMENT
अमित शाह म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात निश्चित केलेल्या उद्दिष्टांपैकी आपल्या ऐतिहासिक परंपरांचा आदर करणे आणि त्यांचे पुनर्जागरण हे एक ध्येय होते.’ राजदंडाशी संबंधित गोष्ट सांगताना अमित शाह म्हणाले की, ही घटना स्वातंत्र्याच्या क्षणाशी संबंधित आहे. ते म्हणाले की, ’14 ऑगस्ट 1947 च्या रात्री एक महत्त्वाची ऐतिहासिक घटना घडली. आज 75 वर्षांनंतरही देशातील बहुतांश नागरिकांना याची माहिती नाही. राजदंडाने आपल्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हा राजदंड ब्रिटिशांकडून भारतीयांना सत्ता सुपूर्द केल्याचं प्रतीक आहे.
शाहांनी हाच धागा धरून पुढे सांगितल की, ‘या घटनेचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतल्यानंतर तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटेल की, ही माहिती आजपर्यंत देशासमोर का आली नाही? यानंतर हा गौरव सोहळा देशासमोर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
14 ऑगस्ट 1947 च्या रात्री काय घडलं होतं, अमित शाहांनी सांगितला इतिहास
’14 ऑगस्ट 1947 च्या रात्री 10.45 मिनिटांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तामिळनाडूहून आलेल्या विद्वानांकडून हा राजदंड स्वीकारला होता. इंग्रजांकडून सत्ता मिळवल्याचे प्रतीक म्हणून त्यांनी ते संपूर्ण विधींसह स्वीकारला होता. पंडित नेहरूंनी 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री अनेक नेत्यांच्या उपस्थितीत हा राजदंड स्वीकारून स्वीकारून सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती’, असं शाह यांनी सांगितलं.
तामिळनाडूतून आला होता राजदंड
राजदंडांची गोष्ट सांगताना शाह म्हणाले, ’14 ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमाला राजेंद्र प्रसाद देखील उपस्थित होते, जे देशाचे पहिले राष्ट्रपती बनलेले. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय झाला तेव्हा ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लॉर्ड माउंटबॅटन यांना भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून पाठवण्यात आले होते. माउंटबॅटन यांना भारतीय संस्कृती आणि चालीरीतींची माहिती नव्हती, म्हणून त्यांनी नेहरूंना विचारले की सत्ता हस्तांतरणासाठी कोणता समारंभ आयोजित करावा. नेहरूंना प्रश्न पडला. त्यांनी थोडा वेळ मागून घेतला. जवाहरलाल नेहरूंनी त्यानंतर स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक सी. राजगोपालाचारी यांना या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावून घेतले.’
ADVERTISEMENT
हेही वाचा >> MNS: राज ठाकरेचं भाजपसोबतचं लव्ह-हेट रिलेशन, आतापर्यंत किती वेळा बदलली भूमिका?
‘यासाठी सी. राजगोपालाचारी यांनी अनेक पुस्तके वाचली, ऐतिहासिक परंपरा जाणून घेतल्या आणि समजून घेतल्या. त्यांनी अनेक राज्यांच्या कथा वाचल्या आणि राजदंडच्या माध्यमातून सत्तांतराच्या प्रक्रियेची माहिती घेतली. त्यांनी नेहरूंना सांगितले की भारतात राजदंडाद्वारे सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया अधिकृत करण्यात आलेली आहे. पंडित नेहरूंनी तामिळनाडूतील विद्वानांकडून राजदंड स्वीकारून सत्ता हस्तांतरण पूर्ण केले”, असं शाहांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
भारताच्या ‘राजदंडा’चे होणार अनावरण
‘हा विधी पूर्ण करण्यासाठी पंडित नेहरूंनी दक्षिणेतील मठाधिपतींना बोलावले होते. कारण त्यांना भारताची आध्यात्मिक एकता आणि एकात्मता हवी होती. सेन्गोल हा शब्द तमिळ शब्द सेम्माई या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ नैतिकता आहे. हे सेंगोल विद्वानांनी पूजलेलं आहे आणि गंगेच्या पाण्याने पवित्र केले गेले आहे. त्यावर पवित्र नंदी विराजमान आहे. सेंगोलची ही परंपरा 8 व्या शतकापासून चौल साम्राज्याच्या काळापासून आहे, असंही शाहांनी सांगितलं.
हेही वाचा >> Jayant Patil, IL&FS scam : नऊ तास चौकशी, पण ईडीने पाटलांना कोणते प्रश्न विचारले?
‘हा पवित्र राजदंड संग्रहालयात ठेवणे अयोग्य आहे अशी सरकारची भूमिका आहे. राजदंड ठेवण्यासाठी संसद भवनापेक्षा पवित्र आणि योग्य जागा दुसरी असूच शकत नाही. त्यामुळे ज्या दिवशी संसद भवन राष्ट्राला समर्पित केले जाईल, त्याच दिवशी पंतप्रधान मोदी तामिळनाडूतील अधीनम मधून आलेला हा राजदंड विनम्रपणे स्वीकारतील आणि लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ बसवतील. राजदंडांच्या स्थापनेचा क्षण म्हणजे म्हणजे एकप्रकार स्वातंत्र्याची भावना पुन्हा जिवंत करण्यासारखे असेल’, असं शाहांनी सांगितलं.
राजदंडाचा अर्थ काय?
प्राणिमात्रांच्या संरक्षणासाठी ईश्वराने धर्मस्वरूपी तेजोमय दंड निर्माण केला, अशी समजूत आहे. साम, दाम, भेद, दंड या उपायांपैकी दंड हा शेवटचा उपाय. त्या दंडाचे म्हणजेच शासनाचे प्रतीक म्हणून काष्ठनिर्मित (लाकडाचा) राजदंड स्वीकारला गेला. हा दंड वस्तुतः राजा, अशी संकल्पना आढळते. हा दंड प्रजेचे शासन व रक्षण करतो. त्यामुळे दंडाच्या भयाने जगत हे उपभोगास उपयुक्त ठरते.
… तर सभागृहाचं काम करावं लागतं बंद
भारतात संसदेत आणि विधी मंडळातील सभागृहात सभेच्या वेळी पीठासीन अधिकाऱ्यांसमोर हा राजदंड ठेवण्यात येतो म्हणजे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद अध्यक्ष. ही पद्धत ब्रिटीश संसदेकडून प्रेरणा घेऊन सुरु झालेली आहे. विधानसभेमध्ये अधिवेशनादरम्यान अध्यक्षांच्या आसनासमोर राजदंड ठेवला जातो. राजदंड हा सभागृहाचा सर्वोच्च सन्मान म्हणून ठेवण्यात येतो. विधानसभेप्रमाणे महानगरपालिकांच्या सभागृहाच्या बैठकींच्या वेळीही राजदंड ठेवला जातो.
हेही वाचा >> MVAचा जागा वाटपाचा तिढा सुटला? नाना पटोलेंनी ‘मुंबई Tak’वर सांगितला फॉर्म्युला
सभागृहामध्ये सर्वाधिक अधिकार हे अध्यक्षांकडे असतात. सभागृह सुरळीत सुरु ठेवण्याची जबाबदारी अध्यक्षांवर असते. पारंपारिक पद्धतीनुसार अध्यक्षांच्या आसनासमोर राजदंड ठेवला जातो. सभा संपेपर्यंत राजदंड तिथेच ठेवला जातो. राजदंड हा सभागृहातील सर्वोच्च सन्मानाचे प्रतिक असल्याने तो उचलून सभागृहाबाहेर नेल्यास सभागृहाचं कामकाज थांबवावं लागतं.
ADVERTISEMENT