Patna : भाजपविरोधात फुंकणार रणशिंग, पण विरोधी पक्षांची ताकद किती?
नितीशकुमारांनी बोलवलेल्या या बैठकीला हजेरी लावणाऱ्या पक्षांची एवढी ताकद काय आहे की ते भाजपशी लढायचेच नाही तर पराभवही करायचे एवढ्या आत्मविश्वासाने बोलत आहेत?
ADVERTISEMENT
Patna Opposition Meeting : 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बिहारची राजधानी पाटणा येथे आज विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत महत्त्वाची बैठक होत आहे. विरोधी पक्षांच्या या बैठकीत एकूण 17 पक्ष सहभागी होणार होते, परंतु समाजवादी पक्षाचा सहयोगी राष्ट्रीय लोक दल (RLD) सामील होणार नाही. त्यामागे पक्षप्रमुख जयंत चौधरी हे देशाबाहेर असल्याचे कारण सांगितले जात आहे. जयंत चौधरी लंडनमध्ये असून पक्षप्रमुखांनी बैठकीला हजेरी लावणे अपेक्षित आहे, त्यामुळे या बैठकीत आरएलडीचा एकही प्रतिनिधी नसणार आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीला जनता दल युनायटेडचे नितीश कुमार, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) मेहबुबा मुफ्ती, शिवसेनेचे (यूबीटी) उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी हे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
विरोधकांची मोर्चेबांधणी, काय होणार चर्चा?
विरोधकांच्या या महामंथनात 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व पक्ष एकाच व्यासपीठावर कसे येतील? यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सर्व पक्षांनी एकत्र आल्यास भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) पराभव होऊ शकतो, असा दावा विरोधी पक्षांचे नेते वारंवार करत आहेत.
हे वाचलं का?
हेही वाचा >> अजित पवारांचा राष्ट्रवादीमध्येच ‘कार्यक्रम’, शरद पवारांच्या खेळीचा अर्थ काय?
आता प्रश्न असा आहे की, नितीशकुमारांनी बोलवलेल्या या बैठकीला हजेरी लावणाऱ्या पक्षांची एवढी ताकद काय आहे की ते भाजपशी लढायचेच नाही तर पराभवही करायचे एवढ्या आत्मविश्वासाने बोलत आहेत?
कोणत्या पक्षाचे किती संख्याबळ, कोणत्या राज्यात आहे सरकार?
विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याची मोहीम नितीशकुमार यांनी सुरू केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूबद्दल बोलायचे, तर हा पक्ष बिहार तसेच ईशान्येकडील काही राज्यांमध्ये चांगला प्रभावी असल्याचे दिसत आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास बिहारमध्ये लोकसभेच्या 16 जागा जेडीयूच्या ताब्यात आहेत. बिहारमध्ये पक्षाचे 45 आमदार आणि 23 आमदार आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> क्लासमेट, अफेअर आणि MPSC पास झाल्यावर दूर गेली… म्हणून राहुलने केली दर्शनाची हत्या!
लोकसभेत राजदची उपस्थिती शून्य आहे. मात्र, बिहारमध्ये विधानसभेच्या 79 जागांसह हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडीचे महाआघाडीचे सरकार असून त्यात काँग्रेसचाही समावेश आहे. लोकसभेत काँग्रेसचे 49 खासदार आहेत. हिमाचल प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षाची सरकारे आहेत. बिहार तसेच झारखंडमध्ये काँग्रेस सत्ताधारी आघाडीचा भाग आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेसनंतर द्रमुक-टीएमसीचे आहेत सर्वाधिक खासदार
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस (TMC) सत्तेवर आहे. TMC चे लोकसभेत 23 खासदार आहेत. झारखंडमधील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचा 1 खासदार आहे, तर समाजवादी पक्षाचे 3, राष्ट्रवादीचे 5, शिवसेनेचे (यूबीटी) 6, दिल्ली आणि पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाचा लोकसभेत 1 सदस्य आहे.
हेही वाचा >> Exclusive : कोविड सेंटर घोटाळा: IAS संजीय जयस्वाल यांच्या नावे 100 कोटींची मालमत्ता?
लोकसभेत सीपीआय-एमएलची उपस्थिती शून्य आहे, तर सीपीआयचे दोन आणि सीपीआय(एम) लोकसभेत 3 सदस्य आहेत. तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुककडे लोकसभेच्या 24 जागा आहेत. नॅशनल कॉन्फरन्सच्या ताब्यात जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेच्या 3 जागा आहेत, तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पीडीपीला एकही जागा जिंकता आली नाही.
विरोधकांचं लोकसभेतील संख्याबळ किती?
नितीश कुमार यांनी बोलावलेल्या या बैठकीत जे पक्ष सहभागी होत आहेत, त्यांचे लोकसभेतील संख्याबळ दीडशेच्या आसपास आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांचा भक्कम जनाधार आहे. नऊ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात त्यांचे सरकार आहे. लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत त्यांचा जनाधार मजबूत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT