Manoj Jarange: ‘ते वाया गेलेले लोक, जे सांगतील त्याच्या उलटं धरायचं’; पाटलांनी कोणाला हाणला टोला?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Maratha Reservation Criticism of Manoj Jaranage Patil On Government of Maharashtra
Maratha Reservation Criticism of Manoj Jaranage Patil On Government of Maharashtra
social share
google news

Maratha Reservation : मराठा समाजाच्या (Maratha) सर्व मागण्या शनिवारी (27 जानेवारी) राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. यावेळी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलन मागे घेतले. नवी मुंबईतून मराठा आंदोलक माघारी परतले. मध्यरात्री जालन्यातील अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) गावात पोहचल्यानंतर गावातील मराठा बांधवांनी जरांगेंचं जंगी स्वागत केलं. डीजेवर मनोज जरांगे पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली. तसेच गुलाल उधळून पेढे देखील वाटण्यात आले. मध्यरात्रीपर्यंत अंतरवाली सराटीत मराठ्यांचा जल्लोष सुरू होता. (When Manoj Jarange Patil Reached at antarwali sarati village he Warns to Chhagan Bhujbal and gunratna sadavarte)

ADVERTISEMENT

…मराठ्यांचं किती हित आहे हे मी आधीच हेरलं होतं

मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी समाज बांधवांशी आणि माध्यमांशीही संवाद साधला. ‘विश्वास बसत नाही एवढं मोठा कायदा पारित झाला. कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारला अधिवेशन घ्यावे लागणार आहे. घटनातज्ञानी जे मत मांडलं आहे त्यानुसार हे समजून घेणे गरजेचे आहे. हा कायदा आयुष्यभरासाठी झाला.

वाचा : Lok Sabha Election 2024: ‘महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती…’; प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा

नोंदी मिळाल्या त्यांना आरक्षण मिळालं आहे. ज्याच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांचं काय? हा मोठा चॅलेंज माझ्यासमोर होता, कारण मी शब्द देऊन बसलो होतो. सगेसोयरे या शब्दात मराठ्यांचं किती हित आहे हे मी आधीच हेरलं होतं. अंतरवालितून सुरू झालेली ही लढाई एवढी लांब जाईल वाटलं न्हवतं,’ असं जरांगे म्हणाले.

हे वाचलं का?

कायद्यातून मराठ्यांच्या पोरांचं भविष्य कोणीही थांबवू शकत नाही

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, ‘फेब्रुवारीत अधिवेशन आहे, त्यावेळी कायदा पारित करू असा शब्द त्यांनी दिला आहे. मी आणखीन एक गोष्ट बांधून घेतली. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या. या कायद्याविषयी कितीही गैरसमज झाले तरी कुणीही चॅलेंज करू शकत नाही. मी सर्व अभ्यासक, तज्ञ, वकील बोलावले व सर्वांनी शब्दाचा किस पाडला व याला काहीच होऊ शकत नाही असे म्हटले. समाजासाठी हा कायदा खूप मोठा झाला आहे. या कायद्यातून मराठ्यांच्या पोरांचं भविष्य कोणीही थांबवी शकत नाही.’ असा विश्वास त्यांनी मराठा बांधवांना दिला.

वाचा : ‘जरांगे-पाटील.. तुम्हाला फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे..’, राज ठाकरेंना नेमकं म्हणायचं तरी काय?

‘तो त्यांचा धंदाच आहे’ – जरांगेंची घणाघाती टीका

‘मंत्री छगन भुजबळ आणि सदावर्ते यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. तो त्यांचा धंदाच आहे. त्यांनी सांगितलेलं सर्व खोटं आहे. घटनातज्ज्ञ काय सांगतात हे महत्वाचं आहे. ते वाया गेलेले लोक आहेत. ते जे सांगितील त्याच्या नेमकं उलटं धरायचं. कायदा पारित झाला तो मराठ्यांच्या हिताचा आहे. मराठ्यांचा सात बारा पक्का झाला, आता वळवळ करायची गरज नाही.’ असं म्हणत जरांगे पाटील यांनी टीकास्त्र सोडले.

ADVERTISEMENT

वाचा : Nitish Kumar : ठाकरेंनंतर आता बिहारचं सरकार कोसळणार

यादरम्यान मनोज जरांगे पाटील आज (28 जानेवारी) दुपारी १२ वाजता मराठा समाजाची बैठक घेणार आहेत. या बैठकीला तब्बल 123 गावातील मराठा बांधव हजर राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील या बैठकीत काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT