Sharad Pawar: दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात पवारांचा ‘हा’ शिलेदार उभं करणार आव्हान?

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

sharad pawar started tour in maharashtra after split in ncp.
sharad pawar started tour in maharashtra after split in ncp.
social share
google news

Politics of Maharashatra : दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांसोबत मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या समर्थकांसोबत शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी निकम मुंबईला निघाले होते. निकम खरं तर वळसे पाटलांचे कार्यकर्ते पण आता राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर निकमांनी शरद पवारांना साथ दिलीये. देवदत्त निकम नेमके कोण आहेत आणि ते वळसे पाटलांना कशी टक्कर देऊ शकतात, हेच पाहुयात… (Who is Devdatta Nikam)

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर घडलेल्या घडामोडी देखील तुम्ही पाहिल्या आहेत. शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे दिलीप वळसे पाटील अजितदादांच्या सोबत गेल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं. पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार स्वतः आता मैदानात उतरले आहेत. शरद पवार आंबेगावमध्ये सभा घेणार होते, परंतु त्यांनी त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघातून केली.

शरद पवारांचे पीए ते मंत्री राहिलेल्या वळसे पाटलांनी सोडली साथ

शरद पवारांचे पीए आणि त्यानंतर सात वेळा आमदार , मंत्री राहिलेल्या दिलीप वळसे पाटलांनी पवारांचीच साथ सोडली. राष्ट्रवादीच्या ज्या ज्या नेत्यांनी साथ सोडली त्या त्या नेत्यांसमोर सक्षम पर्याय उभं करण्यास पवारांनी सुरुवात केली आहे. जुन्या, इच्छुक कार्यकर्त्यांना पवारांनी आता ताकद देण्यास सुरुवात केली आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे देवदत्त निकम.

हे वाचलं का?

कोण आहेत देवदत्त निकम?

देवदत्त निकम हे सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते आहेत. सध्या ते मंचरच्या सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील ते संचालक म्हणून काम पाहत आहेत. देवदत्त निकम खरं तर दिलीप वळसे पाटलांचे खंदे कार्यकर्ते.

2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत वळसे पाटलांनी त्यांना शिरुर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे तिकीट देखील मिळवून दिलं. 2014 च्या निवडणुकीत देवदत्त यांचा शिवसेनेच्या आढळराव पाटील यांनी पराभव केला. परंतु या निवडणुकीत निकम यांना 3 लाख 41 हजार 601 इतकी मतं देखील मिळाली होती.

ADVERTISEMENT

वाचा >> शरद पवारांची साथ सोडलेल्या ‘या’ मातब्बर नेत्यांचं काय झालं?, ‘या’ दिग्गजांनी गमावलीय आमदारकी

त्यातच साखर कारखाना देखील त्यांनी ताब्यात ठेवला आहे. बीएस्सी अँग्री असलेल्या निकमांची द्राक्षाची बाग आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वळसे पाटलांच्या विरोधात जाऊन निकम यांनी त्यांचं पॅनल उभं केलं होतं. निकमांनी थेट वळसे पाटलांना आव्हान उभं केलं. बाजार समितीच्या निवडणुकीत निकम यांच्या पॅनलचा पराभव झाला, पण निकम मात्र एकटे निवडून आले. त्यामुळे निकम यांच्या महत्त्वकांक्षा चांगल्याच वाढल्या.

ADVERTISEMENT

वळसे-पाटलांमुळे निकम यांना संधी

आता वळसे पाटलांनी पवारांची साथ सोडल्यानंतर निकमांना नामी संधी चालून आलीये. निकमांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं नेटवर्क देखील त्यांनी उभं करण्यास सुरुवात केली आहे. 7 वेळा आमदार, अनेकदा मंत्री राहून देखील वळसे पाटील यांनी मतदारसंघाचा हवा तेवढा विकास केलेला नाही असं इथल्या अनेकांचं मत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या संघर्षाचा निकम यांना फायदा होत आहे.

निकम मंचर साखर कारखान्याचे संचालक आहेत. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे देखील ते संचालक आहेत. त्यामुळे त्यांची मतदारसंघात मोठी ताकद आहे. त्यातच शरद पवारांचं पाठबळ मिळत असल्याने निकम यांची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे.

वाचा >> “भाजपवाले कुठेय… ते सतरंजीखाली गेलेत”, उद्धव ठाकरे भाजपच्या निष्ठावंतांबद्दल काय बोलले?

सदैव उपलब्ध असणारा नेता म्हणून निकम यांची मतदारसंघात ओळख आहे. त्याचबरोबर कधीकाळी वळसे पाटलांचा उत्तराधिकारी म्हणून देखील निकम यांचं नाव घेतलं जात होतं. वळसे पाटील यांच्या पुतण्यांमुळे निकम यांना डावलले जात असल्याची कुरबुर देखील मतदारसंघात होती. त्यातून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निकमांना वळसेंनी स्थान दिलं नव्हतं अशा देखील चर्चा होत्या.

त्यात बाजार समितीमध्ये थेट वळसे पाटलांना आव्हान उभं करत निवडूण आल्याने निकमांनी आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे. त्यात आंबेगावमध्ये घेतलेल्या सभेमध्ये वळसे पाटलांनी देखील निकमांना आव्हान दिलं. त्यामुळे येत्या काळात निकम आंबेगावमध्ये काही करिष्मा करु शकतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT