पत्रकार परिषद शरद पवारांची, पण चर्चा सोनिया दुहानांची, त्या कोण आहेत?
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीमधील अनेक तरुण चेहरे त्यांच्या शेजारी आणि मागे बसले होते. पत्रकार परिषद जरी शरद पवारांची असली तरी या पत्रकार परिषदेनंतर चर्चा सुरु आहे, ती पवारांच्या मागे बसलेल्या सोनिया दुहान यांची.
ADVERTISEMENT
तुम्ही शरद पवारांची अलिकडची पत्रकार परिषद पाहिली असेल. या पत्रकार परिषदेमध्ये पवारांनी राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली. पवार पत्रकार परिषद घेत असताना सहसा त्यांच्या मागे कोणी बसत नाही. पण, या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीमधील अनेक तरुण चेहरे त्यांच्या शेजारी आणि मागे बसले होते. पत्रकार परिषद जरी शरद पवारांची असली तरी या पत्रकार परिषदेनंतर चर्चा सुरु आहे, ती पवारांच्या मागे बसलेल्या सोनिया दुहान यांची. शरद पवारांच्या संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनिया दुहान नेमक्या कोण आहेत हेच समजावून घेऊयात… (who is sonia duhan)
ADVERTISEMENT
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेमध्ये पवारांच्या आजूबाजूला रोहित पवार, संदीप क्षीरसागर, सोनिया दुहान, सक्षणा सलगर अशी राष्ट्रवादीची यंग ब्रिगेड होती. त्यामुळे यातून पवार काही वेगळा संदेश देतायेत का अशा देखील चर्चा होत्या. पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर चर्चा सुरु झाली ती म्हणजे पवरांच्या मागे बसलेल्या सोनिया दुहान यांची.
हरियाणाच्या रहिवाशी, पुणे कनेक्शन… सोनिया दुहान कोण?
सोनिया दुहान या शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोनिया या अध्यक्षा आहेत. सोनिया या मूळच्या हरियानाच्या रहिवासी. बीएस्सीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या वैमानिकाचं शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आल्या. त्यावेळी त्या राष्ट्रवादीच्या संपर्कात आल्या. अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादीसोबत काम करण्यास सुरुवात केली. दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचं नेतृत्व देखील केलं आहे.
Only Sharad Pawar Sahab @PawarSpeaks pic.twitter.com/Db6KGoj4Lu
— Sonia Doohan (@DoohanSonia) May 5, 2023
पहाटेचा शपथविधी आणि सोनिया दुहान यांची भूमिका
असं असलं तरी सोनिया दुहान या चर्चेत आल्या त्या राज्याच्या राजकारणातल्या महत्त्वाच्या दोन घटनांमुळे. शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीची चर्चा सुरु होती. त्यातच अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला. या सगळ्या काळात राष्ट्रवादीचे काही आमदार गायब झाले होते. या आमदारांना दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Abhijeet Patil : शरद पवारांनी पंढरपुरात ‘भाकरी’ फिरवली, ‘मविआ’चा उमेदवार ठरला!
पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवारांना एका आमदाराचा मेसेज आला होता. त्यात त्यांना दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये कोंडल्याचा उल्लेख होता. त्यांना परत आणण्याची जबाबदारी पवारांनी सोनिया दुहान यांच्यावर सोपवली होती. सोनिया दुहान यांनी त्यांचे सहकारी धीरज शर्मा यांच्या मदतीने या आमदारांना त्या हॉटेलमधून खुबीनं बाहेर काढलं. त्यावेळी भाजपच्या १०० ते १५० कार्यकर्त्यांचा त्या हॉटेलला पाहारा होता. त्यानंतर त्यांना दिल्लीतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी आणण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही पवारांनी दुहान यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली होती. त्यावेळी बंड केलेले चाळीस आमदार गोव्यातल्या ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते त्या हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न दुहान यांनी केला होता. बनावट ओळखपत्र दाखवून त्यांनी हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. बंडखोर आमदारांशी त्या संपर्क साधण्याच्या प्रयत्नात होत्या. त्यांना त्यावेळी अटक देखील करण्यात आली होती. त्यांचा हा प्रयत्न फसला होता. राष्ट्रवादीच्या संकटाच्या काळात दुहान या संकमोचक म्हणून पुढे आल्या आहेत.
महत्त्वाचं >> शरद पवारांनी हेरलं नवं नेतृत्व! कोण आहेत अभिजीत पाटील?
राष्ट्रवादीतल्या अनेक तरुण कार्यकर्त्यांच्या त्या आयडल देखील आहेत. पवारांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या मागच्याच खुर्चीवर सोनिया बसल्या होत्या. त्याचबरोबर पवारांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर सोनिया यांनी एक फोटो ट्विटरवर शेअर करत ‘ओन्ली शरद पवार साहेब’ असं कॅप्शन देखील दिलं होतं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT