Karnataka Election Result : भाजपला ‘या’ चुका भोवल्या, पराभवाची 6 कारणे

मुंबई तक

ADVERTISEMENT

six factors thats why bjp defeated in karnataka assembly election
six factors thats why bjp defeated in karnataka assembly election
social share
google news

Karnataka Assembly election Result 2023 : आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकालाचा दिवस आहे. कर्नाटकातील 36 मतमोजणी केंद्रांवर 224 विधानसभा मतांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या कलामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा (BJP) पराभव करून काँग्रेस पूर्ण बहुमताने सत्तेवर येताना दिसत आहे. आतापर्यंतच्या समोर आलेल्या कलानुसार भाजप 70 पेक्षा कमी जागांवर आघाडीवर आहे.

ADVERTISEMENT

कर्नाटक निवडणुकीच्या निकालात काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. काँग्रेसने 3 जागांवर विजय मिळवला असून, 128 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या विजय-पराजयाच्या कारणांचीही चर्चा सुरू झाली आहे. कर्नाटकात भाजपच्या लाजिरवाण्या पराभवामागे मजबूत चेहऱ्याचा अभाव आणि राजकीय समीकरणे सांभाळण्यात आलेले अपयश ही प्रमुख कारणे आहेत.

कर्नाटकात मजबूत चेहऱ्याचा उणीव

कर्नाटकमध्ये भाजपच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे मजबूत चेहऱ्याची अनुपस्थिती. येडियुरप्पा यांच्या जागी भाजपने बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री बनवले, पण मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर असतानाही बोम्मई यांचा विशेष प्रभाव पडला नाही. तर काँग्रेसकडे डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्यासारखे मजबूत चेहरे होते. बोम्मई यांना पुढे करणे भाजपला महागात पडले.

हे वाचलं का?

हेही वाचा >> Karnataka election results live : काँग्रेस ‘किंग’! कर्नाटक भाजपच्या हातून निसटलं

कर्नाटक निवडणुकीत भ्रष्टाचार ठरला कळीचा मुद्दा

भ्रष्टाचार हा मुद्दाही भाजपच्या पराभवामागे मुख्य कारण ठरला. काँग्रेसने सुरुवातीपासूनच भाजपच्या विरोधात ’40 टक्के वेतन-मुख्यमंत्री भ्रष्टाचार’ हा अजेंडा ठरवला आणि तो हळूहळू मोठा मुद्दा बनला. एस ईश्वरप्पा यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि भाजपच्या एका आमदाराला तुरुंगात जावे लागले. राज्य कंत्राटदार संघटनेने पंतप्रधानांकडे तक्रारही केली होती. निवडणुकीतही हा मुद्दा भाजपच्या गळ्यातला बनल्याचं दिसलं आणि त्यावर पक्षाला तोडगा काढता आला नाही.

भाजपला राजकीय समीकरण राखता आले नाही

कर्नाटकचे राजकीय समीकरणही भाजपला राखता आले नाही. भाजपला आपली मूळ मतपेढी लिंगायत समाजासोबत ठेवता आली नाही किंवा दलित, आदिवासी, ओबीसी आणि वोक्कलिंगा समाजाची मने जिंकता आली नाहीत. दुसरीकडे, मुस्लिम, दलित आणि ओबीसींना घट्ट बांधून ठेवण्यात, तसेच लिंगायत समाजाच्या व्होट बँकमध्ये प्रवेश करण्यात काँग्रेसला यश आले आहे.

ADVERTISEMENT

ध्रुवीकरणाचा डाव चालला नाही

कर्नाटकातील भाजप नेते वर्षभरापासून हलाल, हिजाबपासून अजानपर्यंतचे मुद्दे मांडत राहिले. गेल्या निवडणुकीच्या वेळी बजरंगबलीचाही प्रवेश झाला होता, पण धार्मिक ध्रुवीकरणाचे हे प्रयत्न भाजपच्या कामी आले नाहीत. काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले असताना, भाजपने थेट बजरंग दलाला बजरंगबलीशी जोडले आणि हा सारा मुद्दा देवाचा अपमान ठरविला. भाजपने जोरदारपणे हिंदुत्वाचे कार्ड खेळले, पण ही खेळी अपयशीच ठरली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> कर्नाटकात पराभव झाला, तर 2024 मध्ये भाजपच्या विजयाचा मार्ग कठीण! कारण…

येडियुरप्पांसारख्या दिग्गज नेत्यांना बाजूला करणे महागात पडले

कर्नाटकात भाजपच्या बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा या निवडणुकीत बाजूला राहिले. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना भाजपने तिकीट नाकारले. नंतर दोन्ही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरले. येडियुरप्पा, शेट्टर, सावडी हे तिघेही लिंगायत समाजाचे मोठे नेते मानले जातात. ज्यांच्याकडे दुर्लक्ष करणे भाजपला महागात पडले.

सत्ताविरोधी लाटेला रोखण्यात भाजप ठरले अपयशी

कर्नाटकात भाजपच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे सत्ताविरोधी लाटेला रोखण्यात आलेले अपयश. भाजपची सत्ता असल्याने त्याविरोधात लोकांमध्ये नाराजी होती. भाजपच्या विरोधात सत्ताविरोधी लाट उसळली होती, ज्यात भाजपला सामोरे जाण्यात पूर्णपणे अपयश आले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT