नरेंद्र मोदींचा ‘क्लास’, देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीचा अर्थ काय?
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis meets Mns chief Raj Thackeray : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला. भाजपला कर्नाटकात सत्तेतून पायउतार व्हावं लागलं, तर दुसरीकडे काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. या निकालावर महाराष्ट्रातूनही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या. यात एक महत्त्वाची प्रतिक्रिया होती, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची. राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेवरून मनसे भाजपपासून दूर जात आहेत का अशी चर्चा सुरू झाली. त्यातच उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज यांची रात्री उशिरा भेट घेतली. त्यामुळे पुन्हा नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चा का सुरू झाल्या, हेच समजून घेऊयात… (Politics of Maharashtra)
ADVERTISEMENT
कधी देवेंद्र फडणवीस, कधी चंद्रशेखर बावनकुळे, कधी आशिष शेलार आणि इतरही भाजप नेत्यांच्या राज ठाकरे यांच्या घरी वाढलेल्या भेटीगाठींनी चर्चा सुरू झाली की दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांच्या पक्षावर टीका करण्याचं टाळत असल्याचे दिसून आलं.
हेही वाचा >> MNS: राज ठाकरेचं भाजपसोबतचं लव्ह-हेट रिलेशन, आतापर्यंत किती वेळा बदलली भूमिका?
पण, कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सूर बदललेला दिसला. राज ठाकरे यांनी निवडणुकीत झालेल्या पराभवावरून चांगलंच सुनावलं. “मला वाटतं हा पराभव स्वभावाचा आहे, वागणुकीचा पराभव आहे. आपलं कुणी वाकडं करू शकतो, अशा विचाराचा जो असतो त्याचा हा पराभव आहे. जनतेला, लोकांना कधीही गृहित धरू नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा”, असं राज ठाकरे म्हणाले.
हे वाचलं का?
हेही वाचा >> Shiv Sena: ‘शिंदेंचे 22 आमदार, 9 खासदार ठाकरेंच्या संपर्कात’, पुन्हा भूकंप होणार?
राज ठाकरेंनी त्र्यंबकेश्वरमध्ये उद्भवलेला वाद आणि नोटंबदीच्या निर्णयावरूनही थेट हल्ला केला. राज यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांनी लागलीच उत्तर दिलं. मोठ्या काळानंतर राज ठाकरे आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करताना दिसले, त्यामुळे मनसे पुन्हा भाजपपासून दूर जातेय का? अशी चर्चा सुरू झाली.
Political News in Maharashtra : देवेंद्र फडणवीस राज ठाकरे भेट
सोमवारी (29 मे) रात्री उशिरा दिल्लीहून परतलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. अचानक दोन्ही नेत्यांची तासभर भेट झाल्याने चर्चांना तोंड फुटलं. कारण, फडणवीसांनी घेतलेल्या भेटीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत भाजप शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी काही सूचना केल्या, यात एक महत्त्वाची सूचना होती राज्यातील प्रादेशिक पक्षांशी जुळवून घेण्याबद्दलची.
ADVERTISEMENT
कर्नाटकच्या निवडणुकीतून धडा घ्या असं म्हणत मोदींनी काही सूचना केल्या होत्या. यात
-भाजप शासित राज्यात लोकसभेच्या 100 टक्के जागा जिंकण्याचे लक्ष्य.
-स्थानिक पातळीवर जाऊन काम करा, लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हा.
-केंद्र व राज्य सरकारच्या योजना लोकापर्यंत घेऊन जा.
-देशव्यापी जनसंपर्क अभियानाचे लक्ष्य, प्रसिद्ध खेळाडू, चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Balu Dhanorkar : …अन् त्या व्हायरल कॉलने काँग्रेसला महाराष्ट्रात दिला एकमेव खासदार
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून धडा घेत भाजपने आगामी काही राज्यातील विधानसभा आणि 2024 मधील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यानुषंगानेच भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रात भाजपसमोर महाविकास आघाडीचं आव्हान आहे. भाजपसोबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना असली, तरी अलिकडेच करण्यात आलेल्या सर्व्हेमधून शिंदेंचा भाजपला फारसा फायदा होत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच भाजपकडून मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असं म्हटलं जात आहे.
मनसे-भाजपतील दरी कमी झाली?
दुसरीकडे, राज ठाकरेंना सोबत घेण्याबद्दल भाजपच्या नेत्यांनी वारंवार काही भूमिका मांडल्या आहेत. यात हिंदुत्व आणि परप्रांतीयांबद्दलचा मुद्दा अधोरेखित करण्यात आलेला आहे. दुसरीकडे मनसेचीही परप्रांतीय विरोधाची भूमिका मवाळ झाल्याचं दिसत असून, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जोर दिला जात असल्याचं काही प्रमुख घटनांवरून पुढे आले आहे. त्यामुळे भाजप आणि मनसे एकत्र येण्यात असलेली दरी कमी होतानाच दिसलं.
पण, कर्नाटक निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकांना 2019 च्या भूमिकेची आठवण झाली. इतकंच काय तर राज ठाकरे यांनीही काही पत्रकार परिषदांमध्ये त्यांच्या जुन्या विधानाची आठवण करून दिली. आणि इथूनच सुरूवात झाली ती राज ठाकरे भाजप पुन्हा भाजपविरोधात आक्रमक झालेत का? गेल्या आठवडाभरापासून याबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट बोललं जात असतानाच आता देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या भेटीने चर्चेचा सूर पुन्हा बदलला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT