Supriya Sule : पाटलांवरून सुळे लोकसभेत भाजपवर बरसल्या, काय म्हणाल्या?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

supriya sule slams bjp over his mindset about women. she support women reservation bill in lok sabha
supriya sule slams bjp over his mindset about women. she support women reservation bill in lok sabha
social share
google news

Supriya sule speech in Parliament on women’s reservation bill : महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाला पाठिंबा दिला. विधेयकावर भूमिका मांडताना सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटील आणि अब्दुल सत्तारांनी केलेल्या विधानाचा उल्लेख करत भाजपवर हल्ला चढवला. भाजपची महिलांबद्दल हीच मानसिकता आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे भाजपवर बरसल्या.

ADVERTISEMENT

महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेत सुप्रिया सुळेंनी भूमिका मांडली. या विधेयकाला पाठिंबा देत त्यांनी काही मुद्दे अधोरेखित केले.

हेही वाचा >> Ajit Pawar : ‘सुप्रिया सुळेंना नैराश्य आलं’, अजित पवार गटाची टीका

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “वर्तमानपत्र वाचले. त्यात दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले आहेत. पण, मला विधेयक आणण्याच्या इच्छाशक्तीबद्दल बोलायचं नाहीये, पण काही मुद्दे मांडायचे आहेत, जे गंभीर आहेत. कॅनडामुद्दावर सरकारने चर्चा घ्यावी. महाराष्ट्रात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण आणि मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. त्यावरही चर्चा घ्यावी. कांदा प्रश्न, दुष्काळावरही चर्चा घ्यावी. आम्ही सरकारला पाठिंबा देऊ.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्र पहिले राज्य…

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. महात्मा फुलेंनी शिक्षण दिले. त्यामुळे माझ्यासारखी महिला इथे उभी आहे. महिला धोरणाची सुरूवात राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने केली. पंचायत राज मध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. माझे वडील शरद पवारांनी हे लागू केलं”, असे सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या.

माझ्या वडिलांनी फॅमिली प्लॅनिंग केलं -सुप्रिया सुळे

“मी खूप खुल्या विचारांच्या घरात जन्मले. माझ्या वडिलांनी माझ्या आईला एक अट घातली होती की, आपल्याला एकच मुल हवंय मग तो मुलगा असो वा मुलगी. माझ्या वडिलांनी फॅमिली प्लॅनिंग केली आईने नाही. म्हणजे पाच दशकांपूर्वी जेव्हा कुणीही बेटी पढाओ, बेटी बचाओ असं बोलत नव्हतं”, असा अप्रत्यक्ष टोला सुप्रिया सुळेंनी भाजपला लगावला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Narendra Modi Net Worth : मोदींकडे किती आहे संपत्ती? कुठे केलीये गुंतवणूक?

निशिकांत दुबे असं म्हणाले की, ‘हे आता एसटी/ओबीसीबद्दलही मागणी करणार.’ आता विरोधक मागणी करणार नाही, तर कोण करणार? यावर सरकारने खुलासा करावा, असं सुप्रिया सुळे म्हणाले.

ADVERTISEMENT

चंद्रकांत पाटलांवरून भाजपवर प्रहार

सुप्रिया सुळेंनी यावेळी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावरून भाजपला घेरलं. त्या म्हणाल्या की, “भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी टिव्हीवरून मला सांगितलं की, सुप्रिया सुळे घरी जा आणि जेवण बनवा. देश दुसरं कुणी चालवेल. आम्ही लोक चालवू. ही भाजपची मानसिकता आहे”, असा हल्ला त्यांनी चढवला.

सुप्रिया सुळेंनी अब्दुल सत्तारांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचाही उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने (अब्दुल सत्तार) माझ्याविरुद्ध अपमानास्पद शब्द वापरला. त्यामुळे भाजपने उत्तर द्यावं. जेव्हा आमचं कुणी बोलत असेल, तर इंडिया खराब आहे. आणि तुमचे मंत्री व्यक्तिगत टिप्पणी करतात. निवडडून आलेल्या लोकप्रतिनिधींबद्दल बोलतात. मी त्यावर काही प्रतिक्रिया देत नाही, कारण प्रतिक्रिया द्यावी इतक्या योग्यतेचं नाहीये. मी ते उपस्थित केले नाहीये. पण त्यांनी मुद्दा मांडला म्हणून मी बोललो.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT