Hardik Pandya, Ind vs Pak: ‘मी स्वत:लाच शिवी दिली’, हार्दिक काय म्हणाला?
पाकिस्तानच्या डावातील 13 वे षटक हार्दिक पांड्याने टाकले. तिसरा चेंडू टाकण्यापूर्वी हार्दिक त्याच्या दोन्ही हातात चेंडू घेऊन काहीतरी बोलताना दिसला. काही बोलल्यावर पांड्याने चेंडूवर फुंकर मारली.
ADVERTISEMENT
Hardik Pandya News, India vs Pakistan, World Cup 2023 : आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धेमध्ये भारतीय संघाचा विजयरथ शनिवारी कायम राहिला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी (१४ ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध तिसरा सामना झाला. भारतीय संघाने अवघ्या 30.3 षटकांत 7 विकेट्स राखून सामना जिंकला. या सामन्यात स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याने 34 धावांत 2 बळी घेतले. पण, त्याचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. गोलंदाजी करत असताना हार्दिक हातात चेंडू धरून मंत्र पठण करताना दिसत आहे. यानंतर तो बॉल टाकतो आणि इमाम उल हकला बाद करतो. (When this video of Pandya went viral, fans were curious to know what Pandya had done?)
ADVERTISEMENT
हार्दिक पांड्याने स्वतःला शिवी दिली
पांड्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर चाहत्यांना उत्सुकता होती की, पांड्याने काय केले? त्यावर सामना संपल्यानंतर अष्टपैलू हार्दिकने खुलासा केला. सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि इरफान पठाण यांच्याशी बोलताना पांड्या गंमतीने म्हणाला की, मी स्वत: ला शिवीगाळ केली.
हेही वाचा >> Ind vs Pak : 36 धावांत झाला ‘गेम’! 31 वर्षांनंतरही पाकचं ‘ते’ स्वप्न अधुरेच
पाकिस्तानच्या डावातील 13 वे षटक हार्दिक पांड्याने टाकले. तिसरा चेंडू टाकण्यापूर्वी हार्दिक त्याच्या दोन्ही हातात चेंडू घेऊन काहीतरी बोलताना दिसला. काही बोलल्यावर पांड्याने चेंडूवर फुंकर मारली. यावेळी इमाम उल हक स्ट्राईकवर होता, तो त्या चेंडूवर विकेटकीपर केएल राहुलकडे झेल देऊन बाद झाला. इमामने 38 चेंडूत 36 धावा केल्या.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
‘मी स्वतःला प्रेरित करत होतो’
सामन्यानंतर हा खुलासा करताना हार्दिकने त्या प्रकाराबद्दल सांगितले की, ‘मी स्वतःशी अगदी साध्या पद्धतीने बोललो. खरंतर मी स्वतःलाच शिवी दिली, असं तो हसत म्हणाला. विशिष्ट टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी मी स्वत:ला प्रेरित करत होतो. वेगळे काही करायला जाऊ नको, असं स्वतःला सांगत होतो, असं तो म्हणाला.
“maine khud ko gali di”😹
Hardik Pandya about what he did before wicket #INDvPAK pic.twitter.com/JPwdNmdQ7W
— Lala (@FabulasGuy) October 14, 2023
ADVERTISEMENT
हे बघा >> छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी, नाशिकमध्ये परिस्थिती काय?
गेम प्लॅनबद्दल हार्दिक म्हणाला, ‘माझ्या मते, सिराज आणि मी बोललो होतो की जर आपण एकाच विकेटवर गोलंदाजी केली, तर आपण जास्त प्रयत्न करावे लागणार नाही. जसे बुमराहने मागील सामन्यांमध्ये केले आहे.’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT