Hardik Pandya IPL 2024 : हार्दिकसाठी मुंबई इंडियन्सने सोडला 17.50 कोटींचा खेळाडू, कारण…

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Hardik Pandya traded to Mumbai Indians
Hardik Pandya traded to Mumbai Indians
social share
google news

Gujarat Titans trade Hardik Pandya to Mumbai Indians, IPL Transfer Window 2024 : आयपीएलच्या 2024 मधील हंगामापूर्वी दुबईत लिलाव होणार आहे. त्यापूर्वीच आयपीएलच्या ट्रेड विंडो माध्यमातून मुंबई इंडियन्सने मोठी खरेदी केली. गुजरात टायटन्सने रिटेन केलेल्या हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने विकत सर्वांना धक्का दिला. हार्दिकसाठी मुंबई इंडियन्सने आपला 17.50 कोटींचा खेळाडू रिलीज केला. त्यामुळे मुंबईला हार्दिक मुंबईला का हवाय, याबद्दल नवी माहिती समोर आलीये. (How did Hardik Pandya reach Mumbai Indians, Know the inside story of the deal with gujarat titans)

ADVERTISEMENT

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यासाठी मुंबई इंडियन्सने टाकलेला डाव यशस्वी ठरला. हार्दिक पांड्या गुजरात टायटन्समधून थेट 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या टीम मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. 2024 च्या हंगामापूर्वी पांड्याने गुजरात टायटन्सचे दोन वेळा कर्णधारपद भूषवले आहे, ज्यामध्ये त्याने एकदा संघाला आयपीएलची ट्रॉफीही जिंकून दिली होती. तर त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरात एकदा उपविजेता राहिला होता.

आयपीएल 2024 च्या हंगामापूर्वी प्रत्येक फ्रँचायझीने राखून ठेवलेली आणि जाहीर केलेली यादी जाहीर केली. दरम्यान, गुजरात टायटन्सने ही यादी जाहीर करताच हार्दिकला रिटेन केल्याचे पाहून सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, त्यानंतर दोन तासांत मोठ्या घडामोडी घडल्या आणि पांड्या मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला. मात्र, हा करार कसा झाला आणि मुंबईने हार्दिकला का घेतलं, याबद्दलची इनसाईड स्टोरी घेऊयात…

हे वाचलं का?

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये… कराराची आतली कहाणी

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला संघात आणण्यासाठी मुंबई इंडियन्सकडे जास्त पैसे नव्हते. त्यामुळे मुंबई इंडियन्स मोठा निर्णय घेतला. त्यांनी कॅमेरून ग्रीनची व्यवहार केला. कॅमेरून ग्रीनचा मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी 17.50 कोटी रुपयांमध्ये व्यवहार केला आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

हेही वाचा >> Lok Sabha : महायुतीचा फॉर्म्युला ठरला! फडणवीसांनी सांगितलं शिंदे-पवारांना किती जागा?

मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये सध्या फक्त 15.25 कोटी रुपये होते. त्यांनी यादी जाहीर करताना हार्दिक पांड्याचा संघात समावेश केला असता, तर लिलावासाठी संघाकडे एक रुपयाही शिल्लक राहिला नसता. त्यामुळे आरसीबीला ग्रीनला देऊन वाचवलेल्या पैशातून त्यांनी पांड्याचा संघात समावेश केला आहे.

ADVERTISEMENT

IPL चा मिनी लिलाव 19 डिसेंबर रोजी UAE मध्ये होणार आहे. हार्दिक पांड्याने 2015 मध्ये मुंबई इंडियन्समधून त्याच्या आयपीएल करिअरची सुरुवात केली होती. या ट्रेडमुळे हार्दिक पांड्या यापूर्वी देखील ट्रेड झालेल्या कर्णधारांच्या यादीत सामील झाला आहे. यामध्ये आर. अश्विन आणि अजिंक्य रहाणे यांच्या नावाचा समावेश आहे. दोघांचा 2020 मध्ये व्यापार झाला होता.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Hardik Pandya IPL: मुंबई इंडियन्सकडे नव्हते पैसे, ‘हा’ खेळाडू देऊन हार्दिकला घेतलं विकत

गुजरात टायटन्सच्या व्यवस्थापनाने हार्दिक पांड्याला या निर्णयाबद्दल विचारले होते आणि त्यानंतरच पांड्याने सांगितले की, त्याला मुंबई इंडियन्समध्ये सामील व्हायचे आहे.

17.50 कोटींचा खेळाडू सोडून मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला का घेतले?

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन झाल्यानं तो संघाची धुरा सांभाळू शकतो, या दृष्टीनेही पाहिलं जात आहे. रोहित शर्मा याआधीच टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. रोहित तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय टी-20 खेळणे थांबवले आहे आणि त्याच्या जागी पांड्या संघाची धुरा सांभाळत आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला संघाचं नेतृत्व पांड्याकडे द्यायचा विचार सुरू असल्याचे समजते. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीला एका कर्णधाराची गरज आहे जो दीर्घकाळ संघाचं नेतृत्व करू शकेल आणि यासाठी हार्दिक योग्य आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT