Video : रिंकू सिंहची वादळी खेळी, मीडिया बॉक्सची फोडली काच
रिंकू सिंहने 39 बॉलमध्ये 68 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकार लावले आहेत. या षटकारांपैकी रिंकूने एक षटकार इतक्या जोराचा मारला होता की, थेट मीडिया बॉक्सची काचच फुटली होती.
ADVERTISEMENT
Rinku Singh Six Break media Box Glass : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध (south africa) दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. त्यामुळे या टी20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली. या सामन्यात भारताचा जरी पराभव झाला असला तरी युवा फलंदाज रिंकू सिंहची (Rinku Singh) फार चर्चा सुरु आहे. कारण रिकूने या सामन्यात वादळी खेळी केली आहे. या खेळीत त्याने एक षटकार इतक्या जोरात मारला होता की मीडिया बॉक्सची काचच फोडली होती. या काचेचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (ind vs sa t20 rinku singh six break media box glass video viral Team india south africa)
ADVERTISEMENT
दुसऱ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून टीम इंडियाला (Team India) फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. यावेळी टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल मैदानात उतरले होते. मात्र हे दोन्ही खेळाडू एक ही धावा न करता माघारी परतले होते. त्यामुळे 6 धावावर 2 बाद अशी टीम इंडियाची बिकट अवस्था होती. यावेळी सुर्यकुमार यादवने मैदानात उतरुन भारताचा डाव सावरला. तर तिलक वर्मा 29 धावा करून बाद झाला होता.
हे ही वाचा : Article 370: …तर मुंबईही बनू शकतो केंद्रशासित प्रदेश!
Rinku Singh has broken the glass of media box with a six. 🔥
– The future is here. pic.twitter.com/4hKhhfjnOr
— Johns. (@CricCrazyJohns) December 12, 2023
हे वाचलं का?
तिलक वर्मा बाद झाल्यानंतर रिंकू सिंहची मैदानात एन्ट्री झाली होती. आणि मैदानात उतरताच रिंकू सिंहने तुफानी खेळी करायला सुरूवात केली. रिंकू सिंहने 39 बॉलमध्ये 68 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकार लावले आहेत. या षटकारांपैकी रिंकूने एक षटकार इतक्या जोराचा मारला होता की, थेट मीडिया बॉक्सची काचच फुटली होती. मीडिया बॉक्सच्या काचेला क्रॅक पडल्याचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे ही वाचा : BHC : भुजबळांसह कुटुंबीयांना मिळाला मोठा दिलासा, कारवाईच ठरवली रद्दबातल
रिंकूसोबत सुर्यानेही दमदार खेळी केली. सुर्याने 56 धावा ठोकल्या. या खेळीच्या बळावर टीम इंडियाने 19.3 बॉलमध्ये 7 विकेट गमावून 180 धावा ठोकल्या.भारताने 180 धावा केल्या असल्या तरी डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी 152 धावांचे टार्गेट देण्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 5 विकेट आणि 7 बॉल राखून पूर्ण केले आणि या सामन्यात विजय मिळवला. या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT