Ind vs Pak : 36 धावांत झाला ‘गेम’! 31 वर्षांनंतरही पाकचं ‘ते’ स्वप्न अधुरेच

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

ICC World Cup 2023, ind vs pak : India defeated Pakistan badly by 7 wickets due to the stormy innings of captain Rohit Sharma.
ICC World Cup 2023, ind vs pak : India defeated Pakistan badly by 7 wickets due to the stormy innings of captain Rohit Sharma.
social share
google news

India vs Pakistan World Cup 2003 : रोहित शर्माच्या (८६ धावा) झंझावाती खेळी… त्याआधी भारतीय गोलंदाजांनी केलेला भेदक मारा… अशा दुहेरी कामगिरीमुळे टीम इंडियाने (Ind vs Pak) विश्वचषक २०२३ स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यात सामन्यात पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयाबरोबर टीम इंडियाने विश्वचषक 2023 मध्ये विजयाची हॅट्ट्रिक केली. भारताने पाकिस्तानपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला पराभूत केले आहे. (India defeated Pakistan by 7 wickets in the great match of the World Cup 2023)

ADVERTISEMENT

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुमारे 90 हजार क्रिकेट प्रेमींच्या उपस्थितीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या या पाच भारतीय गोलंदाज (प्रत्येकी दोन बळी) पाकिस्तानवर तुटून पडले. त्यामुळे पाकिस्तान संघाच्या 8 विकेट अवघ्या 36 धावांतच गेल्या. पाकिस्तानचा अवघा संघ 191 धावांत ऑलआऊट झाला.

दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने दिल्लीत शतक झळकावल्यानंतर अहमदाबादमध्येही तुफानी शैलीतील खेळी कायम ठेवली. रोहितने फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाईच केली. रोहितने 86 धावांच्या खेळीत 6 षटकार ठोकले. त्यामुळे भारताने 30.3 षटकांत 3 गडी गमावून 192 धावांचे लक्ष्य गाठले आणि पाकिस्तानचा सहज पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत भारताला पराभूत करण्याचे स्वप्न पाकिस्तानचे पुन्हा एकदा अधुरेच राहिले. 1992 पासून विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत करण्याची परंपरा टीम इंडियाने कायम ठेवत हा विक्रम 8-0 असा वाढवला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Ind vs Pak : बुमराह-कुलदीपने 12 चेंडूतच मोडलं पाकिस्तानचं कंबरडे! पाहा VIDEO

192 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी शुभमन गिल रोहित शर्मासह सलामीला आला. गिलने सुरुवातीच्या क्षणांमध्ये उत्कृष्ट चौकार मारले, पण तो खेळपट्टीवर जास्त काळ टिकू शकला नाही. डावाच्या तिसऱ्या षटकात शाहीनच्या चेंडूवर गिलने पॉईंटच्या दिशेने जोरदार फटका मारला. मात्र शादाब खानने उत्कृष्ट झेल घेतला. त्यामुळे गिलला विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात 11 चेंडूत चार चौकारांसह केवळ 16 धावा करता आल्या.

दुसऱ्या बाजूला रोहितने सामन्याची सूत्रं हाती घेतली आणि पाकिस्तान गोलंदाजांची चांगलीच धुलाई सुरु केली. गेल्या सामन्यात षटकारांचा विश्वविक्रम करणाऱ्या रोहित शर्माने यावेळी षटकार ठोकत मोठा पराक्रम केला. रोहितने डावातील तिसरा षटकार मारताच, तो वनडे क्रिकेटमध्ये 300 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा तिसरा फलंदाज ठरला.

ADVERTISEMENT

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज

1) शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) – 351 षटकार
2) ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – 331 षटकार
3) रोहित शर्मा (भारत) – 300 षटकार

ADVERTISEMENT

रोहित आणि अय्यरने ठोकले अर्धशतक

रोहितने खेळपट्टीवर जम बसवला आणि फटकेबाजी सुरूच केली. त्याचवेळी विराट कोहली शॉट पिच बॉलवर हसन अलीचा बळी ठरला. कोहलीने 18 चेंडूत तीन चौकारांसह 16 धावा केल्या. रोहितने 36 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांसह 50 धावा पूर्ण केल्या. रोहितच्या वनडे कारकिर्दीतील हे 53 वे अर्धशतक ठरले.

चौथ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरनेही रोहितला साथ दिली. मात्र, शतकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या रोहित शर्माला शाहीन आफ्रिदीने बाद केले. त्याने 63 चेंडूंत 6 चौकार आणि 6 षटकारांसह 86 धावा केल्या. पण तोपर्यंत टीम इंडिया सामना पूर्णपणे आपल्या बाजूने वळवला होता. विजयासाठी 36 धावांची गरज होती. त्यानंतर मैदानात आलेला केएल राहुल आणि आधीच खेळपट्टीवर असलेल्या अय्यर या दोघांनी मिळून टीम इंडियाला सात विकेट्सने विजय मिळवून दिला.

हेही वाचा >> IND vs AFG : रोहित शर्माची तुफान आतशबाजी! भारताने पाडला रेकॉर्डसचा पाऊस

भारताने 30.3 षटकात तीन विकेट गमावत 192 धावा केल्या आणि पाकिस्तानचा 117 चेंडूत आणि सात विकेट राखून पराभव केला. भारताकडून श्रेयस अय्यर (62 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह 53 धावा) आणि केएल राहुल (19 धावा) नाबाद राहिले. पाकिस्तानकडून शाहीनला सर्वाधिक दोन विकेट घेता आल्या, तर हसन अलीला एक विकेट घेता आली.

73 धावांपर्यंत पडल्या होत्या केवळ दोन विकेट

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात, पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही आणि 73 धावांच्या आतच त्यांचे दोन्ही सलामीवीर अब्दुल्ला शफीक (20 धावा) आणि इमाम उल हक (36 धावा) पॅव्हेलियनमध्ये गेले. त्यानंतर बाबर आझम आणि रिझवानने डाव सांभाळला.

बाबर आणि रिझवान डाव सांभाळला, पण…

बाबर आझम आणि रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. त्यामुळे पाकिस्तान 300 च्या आसपास धावा करेल असे वाटत होते. मात्र भारताविरुद्ध वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावताच बाबर आझमला सिराजने तंब्बूचा रस्ता दाखवला. बाबर आझमने 58 चेंडूंत सात चौकारांसह ५० धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानला 155 धावांवर तिसरा धक्का बसला. यानंतर कुलदीप, बुमराह आणि जडेजा यांनी पाकिस्तानचा डाव संपवण्यास वेळ दिला नाही.

पाकिस्तानने 36 धावांत 8 विकेट गमावल्या

डावाच्या 33व्या षटकात कुलदीपने प्रथम सौद शकील (6 धावा) आणि नंतर त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर इफ्तिखार अहमद (4 धावा) यांना बाद केले. यानंतर 34व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बुमराहने रिझवानला क्लीन बोल्ड केले. रिझवान 69 चेंडूत सात चौकारांसह 49 धावा करून बाद झाला.

हेही वाचा >> Mohammed Siraj : हैदराबाद ते टीम इंडिया… असा घडला सिराज! कशी आहे स्ट्रगल स्टोरी?

बुमराहने त्याच्या पुढच्याच षटकात शादाब खानला (2 धावा) क्लीन बोल्ड केले. तर जडेजाने हसन अली (12 धावा) आणि हरिस रौफ (दोन धावा) यांना बाद करून पाकिस्तानचा डाव 42.5 षटकात 191 धावांवर गुंडाळला. भारतातर्फे 5 गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. अशाप्रकारे 155 धावांवर बाबर आझम बाद झाल्या. बाबर आझमच्या विकेटसह पाकिस्तानचे 8 फलंदाज 36 धावांतच बाद झाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT