Mohammed Shami : “देशाचा जबाबदार माणूस…”, मोदींसोबत त्या भेटीबद्दल शमी काय म्हणाला?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Mohammed Shami made a big statement when PM Modi came to Team India's dressing room
Mohammed Shami made a big statement when PM Modi came to Team India's dressing room
social share
google news

Mohammed Shami On PM Modi : भारताचा विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभव झाला. एका पराजयामुळे टीम इंडियाचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न भंगलं. या मोठ्या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंची ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भेट घेतली. या भेटीबद्दल आता मोहम्मद शमीने त्याच्या भावना व्यक्त केल्या. (Mohammed Shami has reacted to Prime Minister Narendra Modi coming to Team India’s dressing room after the World Cup 2023 final)

ADVERTISEMENT

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पंतप्रधान नरेंद्र मोदी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये येऊन खेळाडूंशी केलेल्या संवादाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. शमी म्हणाला की, “पंतप्रधानांसारखी व्यक्ती संघाला पाठिंबा देण्यासाठी येणे ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो.”

हेही वाचा >> IPL Auction 2024 : दिल्ली कॅपिटल्सचा 2 भारतीय क्रिकेटपटूंना झटका! दाखवला बाहेरचा रस्ता

वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. त्यानंतर पीएम मोदी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले आणि त्यांनी सर्व खेळाडूंना धीर दिला. त्यांच्या या भेटीवर विरोधकांनी टीका केली. पंतप्रधान मोदींनी ड्रेसिंग रूममध्ये जायला नको होते, अशी टीका त्यांच्यावर झाली.

हे वाचलं का?

मोहम्मद शमी काय म्हणाला?

शमी गावी केला आहे. स्थानिक पत्रकारांनी त्याला मोदींच्या ड्रेसिंग रुममधील भेटीबद्दल प्रश्न विचारले. शमी म्हणाला, ‘आम्ही सामना हरल्यानंतर हे खूप महत्त्वाचे होते. पराभवानंतर पंतप्रधान तिथे येतात आणि तुम्हाला प्रोत्साहन देतात, त्यामुळे वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. देशाचा जबाबदार माणूस तुमच्यासोबत आला आहे आणि सहानुभूती देतोय. ते फार महत्वाचे आहे. त्यावेळी मनोबल कमी असते आणि अशा वेळी जेव्हा पंतप्रधानांसारखी व्यक्ती समोर उभी असते, आपल्याशी बोलते, आत्मविश्वास देत असते, ती वेगळीच गोष्ट असते. यामुळे आत्मविश्वास वाढतो. माझ्या मते हा खूप मोठा पॉईंट आहे.”

हेही वाचा >> ICC New Rule : आता संघाला होणार 5 धावांचा दंड, ICC चा 60 सेकंदाचा नवा नियम काय?

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांनी पंतप्रधानांसोबत ड्रेसिंग रूममध्ये घालवलेले क्षण ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केले होते. शमीने मोदींसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले होते की, ‘दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता. संपूर्ण स्पर्धेत आमच्या संघाला आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व भारतीयांचे आभार मानतो. ड्रेसिंग रूममध्ये येऊन आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मी विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे. आम्ही प्रयत्न करू.”

ADVERTISEMENT

टीम इंडियाच्या कामगिरीबद्दल काय म्हणाले होते मोदी?

वर्ल्ड कपमधील कामगिरीबद्दल मोदींनी भारतीय संघाचे कौतुक केले होते आणि देश संघाच्या पाठीशी उभा आहे आणि नेहमीच पाठीशी उभा राहील, असे म्हटले होते. पंतप्रधान मोदींनी लिहिले होते की, ‘प्रिय टीम इंडिया, विश्वचषकातील तुमची प्रतिभा आणि जिद्द उल्लेखनीय होती. तुम्ही मोठ्या जिद्दीने खेळून देशाचा गौरव केला. आम्ही आज आणि सदैव तुमच्या पाठीशी उभे असू.”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT