Sikander Shaikh : सिकंदर शेख ठरला ‘महाराष्ट्र केसरी’! अवघ्या 30 सेकंदात प्रतिस्पर्ध्याला केलं चितपट
सिकंदर शेख हा 66 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. सिकंदर मानाची चांदीची गदा पटकावली आहे.सिकंदर शेखने अवघ्या 30 सेकंदात प्रतिस्पर्ध्याला चितपट करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे.
ADVERTISEMENT
Sikander Shaikh win Maharashtra Kesari : कुस्तीपट्टू सिकंदर शेख (Sikander Shaikh) महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) ठरला आहे. सिकंदर शेखने अवघ्या 30 सेकंदात प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेचा चितपट करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे. कुस्तीपट्टू सिकंदर शेख हा 66 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. सिकंदर मानाची चांदीची गदा पटकावली आहे.(Sikander Shaikh won maharashtra kesari 2023 competition)
ADVERTISEMENT
अंतिम सामन्यात शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख आमने सामने आले होते. यावेळी सिकंदर शेखने अवघ्या 30 सेकंदात शिवराज राक्षेला अस्मान दाखवत 66 वा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे. सिकंदर शेखच्या या विजयानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
हे ही वाचा : चार पाय, तीन हात… जन्माला आलं असं बाळ की बघून डॉक्टरांनाही बसला धक्का
अभिनंदन… महाराष्ट्र केसरी 2023 : पै. सिकंदर शेख pic.twitter.com/rk3u2dITWm
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) November 10, 2023
हे वाचलं का?
आज मी महाराष्ट्र केसरी झालोय. फक्त इतकचं सांगतो विश्वास दादा, उत्तम दादा,उस्ताद चंदु काळे आणि माझ्या आई वडिलांच खुप मोठं स्वप्न होतं, असे सिकंदर शेख महाराष्ट्र केसरीच किताब पटकावल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाला आहे.
हे ही वाचा : MNS : ”मी नास्तिक, पण प्रभू रामाचा…”, जावेद अख्तर काय म्हणाले?
अखेर #महाराष्ट्र_केसरीची मानाची गदा #सिकंदर_शेख च्या खांद्यावर!!!
सिकंदर शेखचं मनःपूर्वक अभिनंदन!💐💐 pic.twitter.com/1sVUsfvaKP
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 10, 2023
ADVERTISEMENT
दरम्यान सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी ठरल्यानंतर भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सिकंदर शेखचा फोटो पोस्ट करत अभिनंदन महाराष्ट्र केसरी 2023 असे कॅप्शन मुरलीधर मोहोळ यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अखेर महाराष्ट्र केसरीची मानाची गदा सिकंदर शेखच्या खांद्यावर. सिकंदर शेखचे मन:पूर्वक अभिनंदन, असे आशयाचे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT