IND vs ENG : वानखेडे मैदानात घोंगावलं अभिषेक शर्माचं वादळ! 37 चेंडूत ठोकल्या 100, 'हा' कारनामा करून रचला इतिहास
Abhishek Sharma Fastest Century Video : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा धडाकेबाज फलंदाज अभिषेक शर्माने वानखेडे मैदानात इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अभिषेक शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला

अभिषेकने 37 चेंडूत ठोकलं वेगवान शतक

'हा' कारनामा करणारा ठरला भारताचा दुसरा फलंदाज
Abhishek Sharma Fastest Century Video : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा धडाकेबाज फलंदाज अभिषेक शर्माने वानखेडे मैदानात इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील शेवटच्या पाचव्या टी-20 सामन्यात अभिषेकने फक्त 37 चेंडूत 100 धावांची शतकी खेळी केली. विशेष म्हणजे अभिषेक टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 चेंडूत 50 धावांची सर्वात वेगवान अर्धशतकी खेळी करणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. अभिषेकने हा कारनामा करून के एल राहुलला मागे टाकलं आहे. राहुलने 2021 मध्ये स्कॉटलँड विरोधात 18 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. अभिषेकने इंग्लंडविरुद्ध 54 चेंडूत 135 धावांची तुफानी खेळी करून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. अभिषेकच्या या आक्रमक इनिंगमध्ये 13 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश आहे.
वानखेडे मैदानात अभिषेक शर्माची वादळी खेळी
इंग्लंडने नाणेफेक जिंकून या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. संजू सॅमसनने जोफ्रा आर्चरच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून दमदार सुरुवात केली. परंतु, संजू 16 धावा करून बाद झाला. परंतु, त्यानंतर अभिषेकने आक्रमक फलंदाजी करून मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. अभिषेकने 17 चेंडूत 50 धावा कुटल्या.अभिषेकचा टी-20 आंतरराष्ट्रीय करीअरमधील तिसरा आणि या सीरिजचा दुसरा अर्धशतक आहे. भारतासाठी सर्वात वेगवान पन्नास धावा ठोकण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर आहे. युवराजने 2007 मध्ये टी-20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरोधात 12 चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती.
हे ही वाचा >> 'बुरखा पोरीच घालतात..कॉपी काय फक्त पोरीच करतात? उद्या साड्यांवर..', जितेंद्र आव्हाडांचा नितेश राणेंवर हल्लाबोल
भारतासाठी संजू सॅमसनने (16), अभिषेक शर्मा (135), तिलक वर्मा (24), कर्णधार सूर्यकुमार यादव (2), शिवम दुबे (30), हार्दिक पंड्या (9), रिंकू सिंग (9), अक्षर पटेलने (15) धावांची खेळी केली. या धावांच्या जोरावर टीम इंडियाने 20 षटकांत 9 विकेट्स गमावून 247 धावांचा डोंगर रचला. त्यामुळे इंग्लंडल्या हा सामना जिंकण्यासाठी 248 धावांचं तगडं आव्हान असणार आहे.