Avinash Sable : महाराष्ट्राच्या सुपुत्राची Asian Games मध्ये ‘सुवर्ण’ कामगिरी! 3000 मीटरमध्ये…
चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील बीडचा सुपुत्र अविनाश साबळेने इतिहास रचला आहे. अविनाश साबळेने 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे.
ADVERTISEMENT
Avinash Sable Won Gold Medal Steeplechase : चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील बीडचा सुपुत्र अविनाश साबळेने इतिहास रचला आहे. अविनाश साबळेने 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. अविशान साबळेने ही शर्यत 8:19:53 च्या वेळेत पूर्ण करत ही कामगिरी केली आहे. भारताचे या आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे 12वे सुवर्णपदक आहे आणि अॅथलेटिक्स स्पर्धेतील तिसरे पदक आहे. अविशान साबळेच्या या सुवर्ण कामगिरीवर आता देशभरातून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी देखील अविनाश साबळेचे तोंडभरून कौतुक केले आहे. (avinash sable win gold medal in 3000 meter steeplechase event asian game 2023)
ADVERTISEMENT
AVINASH SABLE – Remember the name
Won the race with the style 🤩🙌#AsianGames2022 #IndiaAtAsianGames pic.twitter.com/lWW17k01yf
— The Khel India (@TheKhelIndia) October 1, 2023
आशियाई स्पर्धेतील अविनाश साबळेच्या या कामगिरीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कौतुक केले आहे. भारतीय धावपटू अविनाश साबळेने चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस विभागात स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.अविनाश, तुझ्या ऐतिहासिक विजयाचा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला सार्थ अभिमान आहे,असे ट्विट करत मुख्यमंत्री शिंदे यांनी अविनाश कौतुक केले आहे, त्याचसोबत त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
भारतीय धावपटू अविनाश साबळेने चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस विभागात स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
अविनाश, तुझ्या ऐतिहासिक विजयाचा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला सार्थ अभिमान आहे. मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.… pic.twitter.com/9uALMOZfxn
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 1, 2023
अॅथलेटिक्समध्ये भारताला पहिले सुवर्ण आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण 12वे सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल ‘आमच्या महाराष्ट्रचा मुलगा’ अविनाश साबळे यांचे अभिनंदन, असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत अविनाश साबळेचे कौतुक केले आहे. तसेच #CWG2022 मध्ये तुमच्या विक्रमी विजयासाठी 22 ऑगस्ट 2022 रोजी झालेली आपली भेट मला स्पष्टपणे आठवत असल्याचे देखील फडणवीसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
आता तुम्ही आशियाई क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेस सुवर्ण जिंकणारे पहिले भारतीय बनला आहात. तुमचा प्रवास अभिमानास्पद आहे आणि मी तुम्हाला जीवनातील अडथळ्यांवर मात करत नवीन उंची गाठण्यासाठी प्रोत्साहित करतो. तसेच महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे, तू स्टार आहेस, नेहमी चमकत राहा, असा सल्ला फडणवीसांनी शेवटी दिला आहे.
ADVERTISEMENT
Congratulations to ‘Our Maharashtra cha Mulga’ Avinash Sable for bagging Bharat’s 1st-ever Gold in Athletics and 12th Gold medal overall at the Asian Games! 🥇
I distinctly remember our meet on 22 Aug 2022 for your record-breaking win in #CWG2022 and now you have become the… pic.twitter.com/I9Wk2ioSTl
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 1, 2023
चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस क्रीडा प्रकारात विक्रम नोंदवित सुवर्णपदक आपल्या नावी केलं. अथक परिश्रम करून इथवर पोहोचलेल्या मराठमोळ्या या धावपटूचा संपूर्ण देशाला सार्थ अभिमान आहे. अविनाशचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा असे ट्वीट करत अजित पवारांनी अविनाश साबळेचं कौतुक केले आहे.
महाराष्ट्राच्या सुपुत्राची ऐतिहासिक कामगिरी.. अतिशय अभिमानाची बाब!
लांब पल्ल्याचा भारतीय धावपटू अविनाश साबळे (@avinash3000m) यानं चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस क्रीडा प्रकारात विक्रम नोंदवित सुवर्णपदक आपल्या नावी केलं. अथक परिश्रम… pic.twitter.com/kVExronDIJ
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 1, 2023
भारताचा धावपटू अविनाश साबळे याने एशियन गेम्स स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेस या क्रिडाप्रकारात सुवर्णपदक जिंकले. या क्रिडाप्रकारात सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याचे हे यश प्रेरणादायी व अभिमानास्पद आहे. याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असे ट्वीट करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अविनाश साबळेचे कौतुक केले आहे.
Heartiest Congratulations to Avinash Sable, as he becomes the first Indian Athlete to win a Gold🥇Medal in 3000m Men’s Steeplechase event at the #AsianGames2023. His extraordinary performance also shattered the Games record with a remarkable time of 8:19:50s! India 🇮🇳 is proud… pic.twitter.com/HDFQXemi7t
— Supriya Sule (@supriya_sule) October 1, 2023
ADVERTISEMENT