Divya Deshmukh : ‘माझे कपडे, केस आणि…’, नागपूरची बुद्धिबळपटू दिव्यासोबत काय घडलं?
”मला खूप दिवसांपासून हे सांगायचं होतं. पण, मी स्पर्धा संपण्याची वाट पाहत होते. प्रेक्षक माझ्या खेळापेक्षा इतर गोष्टींकडे अधिक लक्ष देत आहेत जसे की माझे केस, माझे कपडे, माझे बोलणे या इतर गोष्टीवर त्यांचे लक्ष होते.”
ADVERTISEMENT
Divya Deshmukh Alleged sexism : नागपूरची बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिला एका बुद्धिबळाच्या स्पर्धेत वाईट अनुभव आल्याची घटना घडली आहे. दिव्या देशमुख (Divya Deshmukh) नुकतीच नेदरलँडमधील (Netherland) टाटा स्टील मास्टर्स (Tata Steel Master) या स्पर्धेत सहभागी झाली होती. या स्पर्धेत दिव्या देशमुखने प्रेक्षकांवर लिगंभेदी असल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे दिव्याने या संदर्भात सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्टही लिहली आहे. या पोस्टमध्ये तिने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. नेमके तिचे आरोप काय आहेत? आणि नेदरलँडमध्ये तिच्यासोबत काय घडलंय? हे जाणून घेऊयात. (divya deshmukh alleged sexism and misogyny they focus cloths face and hair tata steel master chess netherland)
ADVERTISEMENT
दिव्या देशमुखची पोस्ट जशीच्या तशी
”मला खूप दिवसांपासून हे सांगायचं होतं. पण, मी स्पर्धा संपण्याची वाट पाहत होते. बुद्धिबळ स्पर्धेतील प्रेक्षक महिलांशी कसा भेदभाव करतात, ही गोष्टी मला काही प्रेक्षकांनी सांगितली होती आणि मलाही ती गोष्ट जाणवली. या स्पर्धेत खुप लोकांनी मला सांगितले की, प्रेक्षक माझ्या खेळापेक्षा इतर गोष्टींकडे अधिक लक्ष देत आहेत जसे की माझे केस, माझे कपडे, माझे बोलणे या इतर गोष्टीवर त्यांचे लक्ष होते.”
हे ही वाचा : Chhagan Bhujbal : अशोक सराफांसोबत भुजबळांनी ‘या’ चित्रपटात केलंय काम
”मी या स्पर्धेत अनेक सामने खेळले आहेत आणि त्यातील काही सामने मला खूपच आवडले आणि मला त्यांचा अभिमान आहे. पण माझ्या मुलाखतींमध्ये (प्रेक्षकांद्वारे) माझ्या खेळांव्यतिरिक्त सर्व गोष्टींबद्दल कशा प्रकारे चर्चा केली गेली हे पाहून मी खूप निराश झालो, फार कमी लोकांनी त्याकडे लक्ष दिले आणि ही खूप दुःखाची गोष्ट आहे.”
हे वाचलं का?
” पुरुष खेळाडूंना त्यांच्या खेळासाठी स्पॉटलाइट मिळते. पण जेव्हा एखादी स्त्री बुद्धिबळ खेळते, तेव्हा ती खरोखरच किती चांगली खेळते. हे न पाहता तिच्या खेळाकडे दुर्लक्ष केले जाते. वेतनश्रेणीच्या बाबतीत महिलांच्या खेळांमध्ये प्रगती झाली असली तरीही, महिला खेळाडूंना अजूनही लिंगभेदाचा सामना करावा लागतो, त्यांना त्यांच्या पोशाखांबद्दल विचारले जाते.”
View this post on Instagram
ADVERTISEMENT
हे ही वाचा : MSC bank scam मधून अजित पवारांबरोबर रोहित पवारही सुटणार? मुंबई पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट
”महिला खेळाडूंचे सर्वसाधारणपणे कमी कौतुक केले जाते आणि अनेकदा द्वेष सहन करावा लागतो. मला असे वाटते की महिलांना दररोज याचा सामना करावा लागतो आणि मी जेमतेम 18 वर्षांची आहे. मला काही महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींबद्दल तिरस्कारासह अनेक वर्षांचा सामना करावा लागला आहे. मला वाटते महिलांना समान सन्मान मिळायला हवा”, असे ती या पोस्टमध्ये म्हणते आहे.
ADVERTISEMENT
कोण आहे दिव्या देशमुख?
दिव्या देशमुख ही महाराष्ट्रातली मुळची नागपूरची आहे. तिचे वय 18 वर्ष आहे. तिच्याकडे बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय मास्टर ही पदवी आहे. 2022 मध्ये तिने महिला भारतीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती. 2022 चेस ऑलिम्पियाडमध्ये वैयक्तिक कांस्यपदक देखील जिंकले. ती सुवर्णपदक विजेत्या FIDE ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2020 संघाचा देखील भाग होती. तसेच 2023 मध्ये, अल्माटीमध्ये तिने आशियाई महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT