Ind vs Pak : बुमराह-कुलदीपने 12 चेंडूतच मोडलं पाकिस्तानचं कंबरडे! पाहा VIDEO

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

eam India's bowlers wreaked havoc in the great match between India and Pakistan in the ICC World Cup 2023.
eam India's bowlers wreaked havoc in the great match between India and Pakistan in the ICC World Cup 2023.
social share
google news

Ind vs Pak world cup 2023 : आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शानदार सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. बाबर आझम आणि रिझवान यांनी पाकिस्तानकडून मधल्या फळीत चमकदार फलंदाजी केली, पण बाबर आझमने भारताविरुद्ध वनडे क्रिकेटमधील कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावताच. त्यानंतर विकेट्सची गळती लागली. सिराजने बाबर आझमला क्लीन बोल्ड केले. यानंतर कुलदीप यादवने चार चेंडूंत दोन विकेट घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि बुमराहने आठ चेंडूंत दोन बळी घेतले. त्यामुळे पाकिस्तानला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारणं अशक्य झालं. तर दुसरीकडे भारताने या सामन्यावरील पकड आणखी घट्ट केली.

ADVERTISEMENT

कुलदीपने 4 चेंडूत घेतले दोन बळी

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला डावाच्या 30व्या षटकात बाबर आझमच्या रूपाने 155 धावांवर तिसरा धक्का बसला. यानंतर डावाच्या 33व्या षटकात कुलदीप यादव गोलंदाजीला आला आणि त्याच्या दुसऱ्या चेंडूवर सौद शकील (6 धावा) एलबीडब्ल्यू झाला. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर कुलदीपने पाकिस्तानचा स्फोटक फलंदाज इफ्तिखार अहमदला (4 धावा) क्लीन बोल्ड केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

बुमराहनेही घेतल्या दोन विकेट

कुलदीपनंतर डावाच्या 34व्या षटकात जसप्रीत बुमराहने फॉर्मात असलेल्या मोहम्मद रिझवानच्या रूपाने टीम इंडियाला मोठी विकेट मिळवून दिली. बुमराहच्या शेवटच्या इनकमिंग बॉलवर तो क्लीन बोल्ड झाला. रिजवानने 69 चेंडूंत सात चौकारांसह 49 धावा केल्या.

ADVERTISEMENT

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

ADVERTISEMENT

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

यानंतर डावाच्या 36व्या षटकात बुमराह पुन्हा गोलंदाजीसाठी आला आणि त्याच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने मोहम्मद नवाजला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे पाकिस्तानच्या 36व्या षटकात 171 धावांवर 7 विकेट पडल्या होत्या. अशाप्रकारे बुमराह आणि कुलदीप यांच्या षटकात एकूण 12 चेंडूत 4 विकेट घेत भारताने पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT