Ind vs Nz: मिचेल सँटनरच्या फिरकीनं टीम इंडियाला गुंडाळलं! न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदाच जिंकली 'Test Series'

मुंबई तक

ADVERTISEMENT

New Zealand won by 113 runs
India vs New Zealand 2nd Test Match Scorecard
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्याच्या एमसीएम मैदानात न्यूझीलंडने भारताचा केला दारुण पराभव

point

न्यूझीलंडने 113 धावांनी दुसरा कसोटी सामना जिंकला

point

मिचले सँटनर ठरला या सामन्याचा हिरो

India vs New Zealand Test series : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेच्या दुसरा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगला. या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा 113 धावांनी पराभव केला. भारताला विजयासाठी 359 धावांची आवश्यकता होती. परंतु, या धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 245 धावांवर गारद झाला आणि न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदाच कसोटी मालिकेत विजयाचा झेंडा फडकवला. मिचेल सँटनरच्या भेदक गोलंदाजीमुळं भारताचा संघाची दाणादाण उडाली आणि भारताला या पराभवामुळं कसोटी मालिकाही गमवावी लागली. 

ADVERTISEMENT

न्यूझीलंडचा स्टार फिरकीपटू मिचेल सँटनर या सामन्याचा हिरो ठरला. सँटनरने या सामन्यात एकूण 13 विकेट्स घेतल्या. सँटनरने पहिल्या इनिंगमध्ये 7 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 6 विकेट्स घेतल्या.न्यूझीलंडने  या मैदानात पहिलाच सामना खेळला. तर या मालिकेचा पहिला सामना बंगुळुरूत 16 ऑक्टोबरला खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाचा 8 धावांनी पराभव झाला होता. हा सामना जिंकून किवींनी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. आता पुणे कसोटी सामन्यातही विजय मिळवून न्यूझीलंडने इतिहास रचला आहे.

हे ही वाचा >>  Jayashree Thorat: "त्यांना सरळ करण्याचं काम...", वसंतराव देशमुखांच्या आक्षेपार्ह विधानानंतर जयश्री थोरात संतापल्या

भारत दुसऱ्या डावात 60.2 षटकांमध्ये सर्वबाद 245 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडचा या सामन्यात 113 धावांनी विजय झाला. भारतासाठी सलामीला उतरलेल्या यशस्वी जैस्वालने 65 चेंडूत 77 धावा कुटल्या. यामध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 8 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर रविंद्र जडेजा वगळता सर्वच फलंदाज स्वस्तात माघारी परतले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शुबमन गिलने (23), विराट कोहली (17), रिषभ पंत (0), वॉशिंग्टन सुंदर (21), सर्फराज खान (9), रविंद्र जडेजा (42), रविचंद्रन अश्विन (18), आकाशदीप (1), जसप्रीत बुमराह नाबाद 10 धावा करून पव्हेलियनमध्ये परतला. दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरने 6 विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली. तर अजाझ पटेलने 2 आणि ग्लेन फिलिप्सला एका विकेटवर समाधान मानावं लागंल. 

हे ही वाचा >> Diwali 2024 Date: 'इतक्या' तासांसाठी आहे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या सविस्तर माहिती

    follow whatsapp

    ADVERTISEMENT