IND vs AUS: चित्यासारखी झेप… विराट कोहलीने घेतला अप्रतिम झेल; पहा VIDEO
india vs australia world cup 2023 : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सामना सुरू होताच सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. मिचेल मार्शचा अप्रतिम झेल घेत विराटने सगळ्यांनाच अवाक् केलं.
ADVERTISEMENT
India vs Australia world cup 2023 : चेन्नईत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. विराट कोहलीने जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मिचेल मार्शचा अप्रतिम झेल घेतला त्यानंतर हे सर्व घडले. प्रथम गोलंदाजी करताना टीम इंडिया पहिल्या विकेटच्या शोधात होती आणि बुमराहने चमत्कार केला. पण, विराटने चित्यासारखी झेप घेत पकडलेल्या कॅचने सगळेच अवाक् झाले. बुमराहने उजव्या ओळीवर चेंडू टाकला आणि मार्शने बॅटची बाहेरची कड घेतली आणि कॅच थेट विराटच्या हातात गेला.
ADVERTISEMENT
अवघ्या काही क्षणातच हे घडलं. मार्शच्या बॅटला चेंडू लागल्यानंतर चेंडू वेगाने स्लिपमधून जात होता. त्याचवेळी विराट कोहली झेपावला आणि हवेतच चेंडू पकडला. चिता शिकार करताना जसा उडी घेतो, तशी उडी विराटने घेतली होती. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लवकरच पहिला झटका बसला.
हेही वाचा >> Mohammed Siraj : हैदराबाद ते टीम इंडिया… असा घडला सिराज! संघर्षमय प्रवास…
What a catch by Virat Kohli😲
Dangerous #MitchellMarsh gone for duck 🦆
Well bowled #Bumrah#INDvsAUS pic.twitter.com/3jzEa1lau9
— Abhishek (@Abhik_world) October 8, 2023
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
विराटने केला नवा विक्रम
कोहलीने घेतलेल्या झेलबद्दल सांगायचं झालं, तर विराटने विरुद्ध बाजूने उडी मारून हा झेल घेतला. या झेलनंतर चेपॉक स्टेडियममधील भारतीय क्रिकेटप्रेमी पहिल्या विकेटच्या आनंदात नाचले. या झेलमुळे आता विश्वचषकात भारताकडून क्षेत्ररक्षण करताना सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर झाला आहे.
हेही वाचा >> Israel Palestine : धर्म अन् भूमी… इस्रायल-पॅलेस्टाईनमधील रक्तरंजित संघर्षाची कहाणी काय?
नॉन-विकेटकीपर म्हणून विराट वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षक बनला आहे. विराटच्या नावावर आता एकूण 15 झेल आहेत आणि त्याने अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. याआधी कपिल देवने फक्त 12 झेल घेतले होते तर सचिन तेंडुलकरनेही फक्त 12 झेल घेतले होते.
विराट कोहली चपळाईने क्षेत्ररक्षण करतो. त्यामुळे विश्वचषकातील 45 दिवसांत कोहली आणखी अनेक शानदार झेल घेताना दिसू शकतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT