IPL 2024 : रोहितला कॅप्टन्सीवरून काढल्यानंतर ‘हे’ तीन खेळाडू सोडणार मुंबई इंडियन्सची साथ?
रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याची चर्चा होती. त्यात आता रोहित पाठोपाठ सुर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि ईशान किशन देखील मुंबई इंडियन्सला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे. मात्र चर्चेमागचं खरं सत्य काय आहे?
ADVERTISEMENT
Suryakumar Yadav, Ishan kishan, Jasprit bumrah leave Mumbai indians : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवून हार्दीक पंड्याच्या हाती संघाची धुरा दिली आहे. मुंबईच्या संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय़ चाहत्यांसह खेळाडूंना पटलेला दिसत नाही.कारण काहीच दिवसापूर्वी रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याची चर्चा होती. त्यात आता रोहित पाठोपाठ सुर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि ईशान किशन देखील मुंबई इंडियन्सला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे. मात्र चर्चेमागचं खरं सत्य काय आहे? हे जाणून घेऊयात. (ipl auction 2024 suryakumar yadav ishan kishan jasprit bumrah leave mumbai indians speculation rohit sharma captaincy)
ADVERTISEMENT
रोहित शर्माने गेली 10 वर्ष मुंबई इडियन्स संघाचे नेतृत्व केले होते. या 10 वर्षाच्या कार्यकाळात त्याने मुंबई इंडियन्स संघाला 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी उंचावून दिली होती. त्यामुळे मुंबई संघासाठी इतकं मोठं योगदान देऊन देखील त्याला कर्णधार पदावरून पायउतार व्हावे लागल्याने चाहत्यांकडून नाराजी व्यक्त होत होती. सोशल मीडियावर रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवरून वादळ उठलं आहे. इतकंच नाही तर नेटकरी रोहित बाजून संघ व्यवस्थापनावर टीका करतायत.
हे ही वाचा : विरोधी पक्षांच्या 143 खासदारांचं निलंबन, शरद पवार म्हणाले, ‘संसदेच्या इतिहासात…’
एकीकडे त्याला कर्णधार पदावरून पायउतार व्हावे लागले असताना, दुसरीकडे तो मुंबई इंडियन्स संघ सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्याच्या पाठोपाठ आता सु्र्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि ईशान किशन हे खेळाडू दखील मुंबई इडियन्सची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेमागे काय तथ्य आहे आणि यामागचं खरं कारण जाणून घेऊयात.
हे वाचलं का?
या चर्चेवर आता मुंबई इंडियन्सच्या एका अधिकाऱ्याने ‘क्रिकबझ’ला प्रतिक्रिया दिली आहे. ‘ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. मुंबई इंडियन्सचा कोणताही खेळाडू आम्हाला सोडत नाही आणि आमच्यासोबत कोणताही ट्रेड केला जाणार नाही. तसेच हा अधिकारी पुढे म्हणाला, ‘निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक खेळाडूला विश्वासात घेण्यात आले होते. रोहितला देखील माहिती देण्यात आली होती आणि तो निर्णय प्रक्रियेचा भाग होता.’ मात्र, नंतर मुंबईतून रोहितबाबत स्पष्टीकरण आले की तो संघातच राहणार आह, असे दखील त्याने सांगितले.
हे ही वाचा : Mla Disqualification : खरी शिवसेना कुणाची, कसं ठरणार? नार्वेकरांनी दिलं उत्तर
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT