महाराष्ट्र केसरी: शिवराज राक्षेने थेट पंचाला का मारली लाथ? कुस्तीनंतर तुफान राडा
Shivraj Rakshe Video: महाराष्ट्रातील मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवान शिवराज राक्षे याने पंचांच्या निर्णयावर नाराज होऊन त्यांनाच लाथ मारल्याची घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

अहिल्यानगर: अहिल्यानगर येथे राज्य कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या (Maharahstra Kesari) उपांत्य फेरी सामन्यात तुफान राडा पाहायला मिळाला. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने थेट पंचाची कॉलर धरून त्यांना लाथेने मारल्याची धक्कादायक घटना काल (2 फेब्रुवारी) भर मैदानात झाली. मॅट विभागातील उपांत्य सामना हा पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे (Prithviraj Mohol vs Shivraj Raksh) यांच्यात झाला. पण याच सामन्याचा निकालानंतर शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारणारं अशोभनीय कृत्य केलं.
महाराष्ट्र केसरीचा उपांत्य सामना हा अत्यंत अटीतटीचा झाला. ज्यामध्ये अगदी शेवटच्या क्षणी . पृथ्वीराज मोहोळ याने शिवराज राक्षेला पाठीवर आणलं. ज्यानंतर पंचांनी पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित केलं. तेव्हा शिवराज राक्षे हा फारच संतापला. कारण आपली पाठ पूर्णपणे टेकलेली नसतानाही पंचांनी बाद ठरवला. तसंच त्यांचं फेर अपील मागणी देखील ऐकण्यात आली नाही. त्यामुळे शिवराज राक्षे प्रचंड संतापला.
हे ही वाचा>> Ankit Chatterjee : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मोडला सौरव गांगुलीचा विक्रम! अंकित चॅटर्जी आहे तरी कोण?
यावेळी शिवराजने पंचांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. पण अचानक शिवराजने एका पंचाची कॉलरच धरली. त्यानंतर तेथील उपस्थित आयोजकांनी मध्यस्थी करून त्याला दूर लोटलं. पण शिवराजला राग एवढा अनावर झाला की, त्याने थेट त्या पंचाला लाथच मारली. ज्यामुळे मैदानात बराच राडा झाला. अखेर आयोजकांनी आणि पोलिसांनी शिवराजला तेथून बाजूला नेलं.
हे ही वाचा>> IND vs ENG : वानखेडे मैदानात घोंगावलं अभिषेक शर्माचं वादळ! 37 चेंडूत ठोकल्या 100, 'हा' कारनामा करून रचला इतिहास
पंचांना मारहाण केल्यानंतर शिवराज राक्षे काय म्हणाला?
'स्पर्धकाचे दोन्ही खांदे टेकले तर कुस्ती जिंकली असा निर्णय दिला जातो. तुम्ही आम्हाला रिमो दाखवा.. रिमोमध्ये जर माझे दोन्ही खांदे टेकले असतील तर मी हार मानायला तयार आहे. पंचांनी माझ्यावर अन्याय केला आहे. अन्याय माझ्यावर झालाय ना तर देव त्याच्याकडे बघून घेईल. 100 टक्के ज्याच्या त्याच्या कर्माची फळं त्यांना भेटणार आहे.'
'पुणे जिल्ह्याचा व्यक्ती ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल म्हणून तर माझ्यावर अन्याय झाला.'
'त्यांनी निर्णयच खोटा दिला. आक्षेप घेतल्यानंतर पंचांचं काम आहे काम आहे की, रिमो बघून निर्णय घ्यायचा पण रिमो तुम्ही बघितला नाही आणि थेट विजयी घोषित करून टाकलं. हे 100 टक्के जाणूनबुजून केलं आहे.' असा थेट आरोपच शिवराज राक्षे याने यावेळी केला आहे.