Odi world cup 2023: वनडे वर्ल्ड कपसाठी स्टार क्रिकेटरकडून निवृत्ती जाहीर

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

one day world cup 2023 wanindu hasaranga retirement from test ben stokes u turn
one day world cup 2023 wanindu hasaranga retirement from test ben stokes u turn
social share
google news

येत्या 5 ऑक्टोंबरपासून भारतात हा वनडे वर्ल्ड कपला सुरूवात होत आहेत. तत्पुर्वीच क्रिकेट वर्तुळात मोठे उलटफेर पाहायला मिळत आहे.हे उलटफेर म्हणजेच अनेक क्रिकेटपटू क्रिकेटच्या इतर फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करत आहेत. तर काही खेळाडू निवृत्ती घेतल्यानंतर देखील पुन्हा मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. श्रीलंकेचा स्टार स्पिनर गोलंदाज वानिंदू हसरंगाने (wanindu hasaranga) वनडे वर्ल्ड कपसाठी (Odi world cup) टेस्टमधून निवृ्त्ती घेतली आहे. तर इंग्लंडचा बेन स्टोक्स आपल्या संघाला पुन्हा चॅम्पियन बनवण्यासाठी वनडेतून निवृत्तीचा निर्णय बदलू शकतो, आणि वनडे वर्ल्ड कप खेळताना दिसू शकतो. (one day world cup 2023 wanindu hasaranga retirement from test ben stokes u turn)

ADVERTISEMENT

टी20 क्रिकेट फॉरमॅटमधील एक नंबरला स्पिनर गोलंदाज असलेल्या वानिंदू हसरंगाने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आयसीसीने ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. वानिंदू हसरंगाने आपल्या निवृत्तीबाबतच्या निर्णयाची श्रीलंका क्रिकेट बोर्डाला माहिती दिली होती. वनडे आणि टी20 फॉरमॅटवर लक्ष देण्यासाठी वानिंदू हसरंगाने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. हसरंगाने आतापर्यंत 4 टेस्ट सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 4 विकेट घेतल्या आहेत आणि 196 धावा केल्या आहेत.

हे ही वाचा : World Cup 2023: अवघे काही दिवसच शिल्लक, टीम इंडियासमोर आव्हानांचा डोंगर?

इंलंडचा स्टार ऑलराऊंडर ब्रेक स्टोक्सने वनडेमधून निवृत्ती घेतली होती.मात्र इग्लंड संघाला पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी तो पुन्हा मैदानात वापसी करण्याची शक्यता आहे. इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलरलने स्टोक्स आता विश्वचषक खेळण्यासाठी सज्ज होऊ शकतो असे देखील म्हटले होते.

हे वाचलं का?

बेन स्टोक्सने 2019 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये इग्लंडला चॅम्पियन बनवले होते. यानंतर, गेल्या वर्षी जुलै 2022 मध्ये, त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. नुकत्याच संपलेल्या अ‍ॅशेस मालिकेनंतर त्याला विश्वचषकात खेळण्याबाबत विचारण्यात आले तेव्हा स्टोक्स म्हणाला, आता त्याला मोठ्या सुट्टीवर जायचे आहे आणि तशी कोणतीही योजना नाही. पण आता स्टोक्सने इंग्लंडकडून खेळण्यास होकार दिला आहे. स्टोक्सने आतापर्यंत इंग्लंडकडून 105 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2924 धावा केल्या आहेत.

हे ही वाचा : Ind vs WI :सूर्यकुमार यादव चमकला!खणखणीत अर्धशतकाच्या बळावर WI समोर इतक्या धांवाचे आव्हान

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT