Video: 'स्पायडर मॅन'! रोहित शर्माने घेतला क्रिकेट इतिहासातील सर्वात कठीण झेल, कोहली-सिराज पाहतच राहिला

मुंबई तक

Rohit Sharma Catch Viral Video: भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना कानपूरच्या मैदानात रंगत आहे. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माचा जलवा पाहायला मिळाला. रोहितने बांगलादेशचा फलंदाज लिटन दासचा एका हाता झेल पकडून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

ADVERTISEMENT

Rohit Sharma Catch Video Viral
Rohit Sharma Takes Liton Das Catch
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रोहित शर्माने एका हातात घेतलेल्या झेलचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

point

रोहित शर्माने हवेत उडी मारून घेतला झेल! कोहली-सिराजही थक्क झाला

point

रोहितने लिटन दासचा घेतलेला झेल पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या

Rohit Sharma Catch Viral Video: भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना कानपूरच्या मैदानात रंगत आहे. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माचा जलवा पाहायला मिळाला. रोहितने बांगलादेशचा फलंदाज लिटन दासचा एका हाता झेल पकडून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. रोहितने घेतलेल्या या झेलची संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चा होत आहे. रोहितने घेतलेला झेल क्रिकेट इतिहासातील सर्वात कठीण झेल असल्याचं बोललं जात आहे. रोहितने हवेती उडी मारून एका हातात झेल घेतल्यानंतर लिटन दासच्याही भुवया उंचावल्या. रोहितने अशाप्रकारचा जबरदस्त झेल घेतला आहे, लिटनलाही विश्वास बसला नाही. लिटन दास बाद झाल्यानंतर रोहितकडे पाहतच राहिला. हा झेल घेतल्यानंतर रोहितन मैदानात जल्लोष केला. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर लिटन दास झेलबाद झाला.

लिटन दास 'असा' झाला झेलबाद, रोहितने घेतला भन्नाट झेल

लिटनने सिराजच्या चेंडूवर स्टेप आऊट करून इनफिल्ड क्लियर करण्याचा प्रयत्न केला, पण शॉर्ट ऑफ फुलर चेंडूला मिडऑफ वरून मारण्याच्या प्रयत्नात लिटन झेलबाद झाला. रोहितने हवेत उडी घेत एका हातात झेल घेऊन लिटनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. लिटनचा झेल घेतल्यानंतर रोहितही काही वेळ थक्कच झाल्याचं मैदानात पाहायला मिळालं.

हे ही वाचा >> Viral Video: भर पावसात मुंबईच्या 'या' सोसायटीत घुसला सर्वात खतरनाक प्राणी! लोकांची बोबडी वळली

 

रोहित शर्माच्या या रणनीतीचा झाला फायदा

रोहित शर्माने या चेंडूआधी रणनीती बनवली होती. त्याने बांगलादेशी फलंदाजाला बाद करण्यासाठी कोहलीला एक्स्ट्रा कव्हरवर उभा केला. त्यानंतर लिटन दास रोहितच्या रणनीतीपुढं फोल ठरला. लिटन दास फक्त 13 धावा करून  तंबुत परतला. रोहित शर्माने झेल घेतल्यानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानात जल्लोष केला.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! '...तरच मिळतील 4500 किंवा 1500 रुपये?' सरकारचा नियम एकदा वाचाच

सिराजच्या आनंदाला पारावरच उरला नव्हता. कोहलीनेही रोहितची गळाभेट केली. लिटनमुळे बांगलादेशला पाचवा धक्का बसला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ रखडला होता. पहिल्या दिवशी फक्त 35 षटकांचीच इनिंग झाली.

हे वाचलं का?

    follow whatsapp