Kohli-Gambhir Interview Video: 'तुमच्याशी माझे सर्वात जास्त वादविवाद...', गौतमने कोहलीला विचारले 'गंभीर' प्रश्न!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Gautam Gambhir And Virat Kohli Latest News
Gautam Gambhir And Virat Kohli Interview Video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गौतम गंभीरने मुलाखतीत घेतली विराट कोहलीची शाळा

point

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल

point

कोहली-गंभीर वादाबाबत मुलाखतीत झाली चर्चा

Virat Kohli-Gautam Gambhir Interview : विराट कोहली आणि गौतम गंभीर पुन्हा एकदा एकमेकांच्या आमनेसामने आले आहेत. यावेळी दोन्ही दिग्गजांनी एकमेकांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. दोघांनीही एकमेकांच्या करिअरबद्दल चर्चा केली आहे. इटंरनेटवर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. दोघांनीही भारतीय क्रिकेटबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. तसच गोलंदाजांबाबतही आपले विचार मांडले आहेत. गंभीरने कोहलीच्या सर्वात बेस्ट इनिंगबद्दल मत व्यक्त केलं आहे. मुलाखतीत दोघेही एकमेकांशी मस्ती करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. (Virat Kohli and Gautam Gambhir are once again facing each other. This time both the giants have met each other. The video of the interview has been shared by BCCI on social media)

विराट कोहली : तुम्ही जेव्हा फलंदाजी करता आणि प्रतिस्पर्धी संघासोबत तुमची थोडीफार चर्चा होते, त्यावेळी तुम्ही बाद होऊ शकता, असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला यामुळे अधिक प्रेरणा मिळते?

गौतम गंभीर : तुमच्याशी माझे सर्वात जास्त वादविवाद झाले आहेत. मला वाटतं की, तुम्हा या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा चांगलं देऊ शकता. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विराट कोहली (हसत) : मला असं वाटतंय की, कुणीतरी माझ्याशी सहमत व्हावं. हे चुकीचं आहे, असं मला म्हणायचं नाही. कुणीतरी बोल, हा हेच होतं..तर आपण इथे आहोत. आपण एक मोठा प्रवास पाहिला आहे आणि सर्व वादविवाद संपवले आहेत.

गौतम गंभीर (हसत) : चर्चा आणि सर्व विवादांची ही एक चांगली सुरुवात आहे.

ADVERTISEMENT

आशिया चषकात पाकिस्तान विरुद्ध 183 धावांची आतापर्यंतची सर्वात बेस्ट खेळी - गौतम गंभीर

विराट कोहलीने आशिया चषकात खेळलेली 183 धावांची खेळी भारतीय क्रिकेटमधील सर्वात बेस्ट खेळी आहे. आशिया चषकात पाकिस्तानविरोधात खेळलेली इनिंग एखाद्या भारतीय खेळाडूनं खेळलेली बेस्ट खेळी आहे. मी तुम्हाला पदार्पण करताना पाहिलं आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत वेस्ट इंडिज विरोधात अवघड पिचवर एक अप्रतिम खेळी केली होती. आशिया चषकातील 183 धावांची खेळी मी पाहिलेली सर्वश्रेष्ठ खेळी आहे. कारण विरोधी संघाकडे शानदार गोलंदाज होते. भेदक गोलंदाजी करत होते. पाकिस्तान विरुद्ध 300 हून अधिक धावांचा पाठलाग करणं...यासाठी तुम्ही एक मोठा प्रवास केला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, भारतीय क्रिकेटला ज्या प्रकारे पुढे नेलं आहे, पुढच्या पिढीसाठी जे काही केलं आहे, ते अप्रतिम आहे.

ADVERTISEMENT

गंभीर : रोहित शर्मा पुढचा गेस्ट असणार आहे. मी रोहितला पहिला प्रश्न काय विचारावा? तुम्हाला काय वाटतं?

कोहली :  सकाळी भिजलेले बादाम खातो की नाही?, मला वाटतं हा रोहितसाठी एक सरळ प्रश्न आहे.

गंभीर : सकाळी अकरा वाजेच्याऐवजी रातत्री 11 वाजता?

कोहली : हा बघा, AM चा PM व्हायला नको. 

चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत विराट कोहलीनं दिली प्रतिक्रिया

"10 टेस्ट मॅच, चॅम्पियन्स ट्रॉफी येणार आहे. ते रोमांचक होईल. खूप साऱ्या आठवणी निर्माण होतील. एक टीम म्हणून आम्हाला यश मिळेल, याची अपेक्षा आहे.

कोहलीने बुमराह, शमी आणि इशांत शर्माला तयार केलं -गौतम गंभीर

प्रशिक्षक गौतम गंभीरने विराट कोहलीला भारताच्या वेगवान गोलंदाजांना प्रेरणा देण्याचं श्रेय दिलं आहे. गंभीरने मुलाखती दरम्यान म्हटलं, तुम्ही तुमच्या कॅप्टन्सीत वेगवान गोलंदांची अशी एक फौज निर्माण केली, जे विरोधी फलंदाजांना त्यांच्याच मैदानात धूळ चारायचे. मोहम्मद शमी आणि इशांत शर्मासारखे गोलंदाज जगातील बेस्ट गोलंदाज बनले. जसप्रीत बुमराह आल्यानंतर भारताच्या वेगवान गोलंदाज जगातील सर्वात बेस्ट गोलंदाज बनले. 
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT