भारताच्या 13 वर्षाच्या फलंदाजाने इतिहास रचला! 'असा' कारनामा करणारा जगातील सर्वात युवा फलंदाज, सचिनचा विक्रमही...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Cricketer Vaibhav Suryavansh Latest News
Vaibhav Suryavanshi Breaks Sachin Tendulkar Record
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोण आहे भारताचा धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी?

point

भारताच्या सर्वात युवा फलंदाजाने केली ऐतिहासिक कामगिरी

point

12 वर्षांचा असताना सचिन तेंडुलकर, युवराज सिंगचा विक्रम मोडला

Vaibhav Suryavanshi Record: भारताचा 13 वर्षांचा अंडर-19 टीमचा फलंदाज वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला आहे. भारत अंडर-19 आणि ऑस्ट्रेलिया अंडर-19 (India U19 vs Australia U19, 1st Youth Test) या संघांमध्ये यूथ टेस्ट मॅच खेळवली जात आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 58 चेंडूत शतक ठोकलं आहे. सूर्यवंशी सर्वात कमी वयात क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानात खेळवण्यात येणाऱ्या यूथ टेस्ट सामन्यात वैभवने तुफानी खेळी केली. (India's 13-year-old Under-19 team batsman Vaibhav Suryavanshi has created history. Youth test matches are played between India Under-19 and Australia Under-19)

ADVERTISEMENT

सर्वात कमी वयात क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा फलंदाज

 

  • 13 वर्ष 188 दिवस - वैभव सूर्यवंशी vs AUS,U-19, चेन्नई, 2024 (यूथ टेस्ट)
  • 14 वर्ष 241 दिवस - नजमुल हुसैन शांतो vs SL,U-19, सिलहट, 2013 यूथ वनडे
  • 15 वर्ष 48 दिवस - बाबर आझम vs SL, U-19, दांबुला, 2009 (यूथ वनडे)


वैभव सूर्यवंशीने जेव्हा अर्थशतक पूर्ण केलं होतं, त्यावेळी वैभव विश्व क्रिकेटमध्ये कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्धशतक ठोकणारा सर्वात युवा खेळाडू बनला होता. परंतु, त्याने आता आपल्या अर्शतकी खेळीला शतकात रुपांतर केलं आहे. चेन्नईच्या चेपॉकमध्ये खेळवण्यात येणाऱ्या यूथ टेस्टमध्ये सूर्यवंशीने आतापर्यंत त्याच्या इनिंगमध्ये 14 चौकार आणि 4 षटकार ठोकले.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> IND vs BAN: संपूर्ण क्रिकेटविश्वात फक्त रोहित शर्माचीच चर्चा! 'असा' वर्ल्ड रेकॉर्ड करणारा जगातील एकमेव फलंदाज

कोण आहे वैभव सूर्यवंशी?

वैभव सूर्यवंशीने रणजी ट्रॉफी 2023-24 मध्ये बिहारसाठी पदार्पण केलं. त्याने मुंबई विरोधात झालेल्या सामन्यात पदार्पण केलं होतं. यादरम्यान मुंबईचा कर्णधार  अजिंक्य रहाणेनेही वैभवचं खूप कौतुक केलं होतं. त्यानंतर त्याने छत्तीसगढच्या विरोधात रणजी सामना खेळला होता. दोन्ही इनिंगमध्ये त्याला खातं उघडता आलं नाही. वैभवने आतापर्यंत खेळलेल्या दोन रणजी सामन्यात 31 धावा केल्या होत्या.

वैभव सूर्यवंशीने मोडला होता सचिन तेंडुलकरचा विक्रम

वैभव सूर्यवंशी वर्ष 2024 च्या सुरुवातीलाच सर्वात कमी वयात रणजी ट्रॉफीत पदार्पण करणारा खेळाडू ठरला होता. डावखुऱ्या फलंदाजाने सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंगचा विक्रम मोडला होता. वैभव फक्त 12 वर्षांचा असताना मुंबई विरोधात बिहारसाठी रणजी ट्रॉफीत पदार्पण करून इतिहास रचला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Video: 'स्पायडर मॅन'! रोहित शर्माने घेतला क्रिकेट इतिहासातील सर्वात कठीण झेल, कोहली-सिराज पाहतच राहिला

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT