Vinesh Phogat Retirement: 'आई... मी हरले'; ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटची मोठी घोषणा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कुस्तीपटू विनेश फोगाट हिने कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

point

'पराभव झाला नाही, पराभूत केलं गेलं...'

point

100 ग्रॅम वजनामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आले

Paris Olympics 2024 Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फायनलपूर्वी केवळ काही ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरल्यानंतर आता भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तिने याबाबतची माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. विनेश फोगाट हिने  पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आई कुस्ती माझ्याविरूद्ध जिंकली. तुमचं स्वप्न माझी हिंमत तुटली आहे. आता जास्त माझ्यात ताकद नाही. अलविदा कुस्ती' अशी भावूक पोस्ट लिहित तिने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे." (Vinesh Phogat's big announcement of retirement from wrestling after being disqualified in the paris olympics 2024)

ADVERTISEMENT

विनेश फोगटने तिच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना 5-0 च्या फरकाने जिंकला आणि ऑलिम्पिक अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. विनेश 50 किलो वजनी गटात खेळत होती. पहिल्या दिवशी विनेशचे वजन 49.5 इतके भरले. मात्र, उपांत्य फेरीची लढत संपली, तेव्हा बाहेर पडल्यावर विनेशचे वजन 52 किलोपर्यंत वाढले होते. या वाढलेल्या वजनाने घात केला आणि तिची ऑलिम्पिक पदकाची कहाणी पुन्हा अपूर्ण राहिली.

हेही वाचा : MNS: भाजपसोबत युती नाहीच, राज ठाकरेंनी चौथा उमेदवार केला जाहीर!

'पराभव झाला नाही, पराभूत केलं गेलं...'

आता विनेशच्या या घोषणेनंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले, "विनेश, तुझा पराभव झाला नाही तुला पराभूत केलं गेलं, आमच्यासाठी तू नेहमीच विजेता राहशील, तू भारत कन्या आहेस तसेच भारताचा अभिमान आहेस."

हे वाचलं का?

विनेश फोगटला जास्त वजनामुळे अंतिम सामन्यातून अपात्र ठरवण्यात आले, त्यानंतर तिने कोर्ट ऑफ एब्रीट्रेशन फॉर स्पोर्टच्या (CAS) न्यायालयात अपील केले होते. या स्पर्धेसाठी तिला रौप्य पदक देण्यात यावे, असे विनेशने सांगितले होते.

हेही वाचा : Maharashtra Weather: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा! पहा IMD चा अंदाज

 

100 ग्रॅम वजनामुळे विनेशला ठरवण्यात आले होते अपात्र

कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिकमध्ये अपात्र घोषित करण्यात आले. 50 किलो वजनी गटात तिचे वजन सुमारे 100 ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आले. विनेशला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, पण वजन जास्त असल्याने अंतिम सामन्याच्या काही तास आधी तिला अपात्र ठरवण्यात आले. अशा परिस्थितीत नियमांमुळे उपांत्य फेरीत विजय मिळवूनही तिचे पदक हुकले.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Mhada Lottery 2024: मुंबईतील घराचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून मोठी लॉटरी जाहीर

 

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर ती सुवर्णपदक जिंकेल अशी आशा सर्व भारतीयांना होती. तिने मंगळवारी (6 ऑगस्ट) महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमनचा 5-0 असा पराभव केला. विनेशची फायनल बुधवारी (7 ऑगस्ट) अमेरिकेच्या ॲन सारा हिल्डब्रँडशी होणार होता. यापूर्वी तिने प्री-क्वार्टर फायनलमध्ये ऑलिम्पिक चॅम्पियन आणि चार वेळा विश्वविजेती युई सुसाकीचा 50 किलोमध्ये पराभव केला होता.
    

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT