IND vs PAK : भारताचा 'विराट' विजय! नाबाद शतक ठोकून कोहलीने पाकिस्तानला चारली पराभवाची धूळ

मुंबई तक

India vs Pakistan, ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पाचवा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात रंगला. या महामुकाबल्यात टीम इंडियाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली.

ADVERTISEMENT

Virat Kohli, India vs Pakistan
Virat Kohli, India vs Pakistan
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीचं दमदार शतक

point

भारताने पाकिस्तानचा केला दारुण पराभव

point

विराट कोहलीने ठोकल्या नाबाद 100 धावा

India vs Pakistan, ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पाचवा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात रंगला. या महामुकाबल्यात टीम इंडियाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. विराट कोहलीने दमदार शतकी खेळी करून पाकिस्तानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. विराटने 111 चेंडूत नाबाद 100 धावांची शतकी खेळी केली. भारताला विजयासाठी दोन धावांची आवश्यकता असताना विराटने चौकार ठोकून विजयाचा झेंडा फडकवला. पाकिस्तानचा पराभव करत भारताना चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दोन विजय संपादन केले. पाकिस्तानने दिलेलं 242 धावांचं लक्ष्य भारताने 42.3 षटकात (244) गाठलं. 

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानने 49.4 षटकात सर्वबाद 241 धावा केल्या. पाकिस्तानने दिलेल्या या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिलने भारताला दमदार सुरुवात मिळवून दिली. रोहित (20), तर शुबमन गिल (46) धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने धावांचा डोंगर उभा करून भारतीय संघाला विजयाच्या दिशेनं नेलं. श्रेयस अय्यरने 67 चेंडूत 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि पाच चौकारांचा समावेश आहे.

हे ही वाचा >> Jitendra Awhad : "मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून...", माणिकराव कोकाटेंवर हल्लाबोल करत आव्हाड काय म्हणाले?

भारतीय संघासाठी फिरकीपटू कुलदीप यादवने अप्रतिम गोलंदाजी करून 3 विकेट्स घेतल्या. हार्दिक पंड्याने दोन विकेट्स घेतल्या. तर हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजाला प्रत्येकी एक विकेट मिळाली. तर पाकिस्तानसाठी सऊद शकीलने सर्वाधिक 62 आणि मोहम्मद रिझवानने 46 धावा केल्या. तसच अब्रार अहमद आणि खुशदीलने एक विटेक घेतली. तर शाहिनशाहा अफ्रिदाला दोन विकेट्स मिळवण्यात यश आलं.

हे ही वाचा >> IND vs PAK : अक्षर पटेलचा परफेक्ट थ्रो अन् इमामचा खेळ खल्लास! रनआऊटचा Video पाहून थक्कच व्हाल

दरम्यान, भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने परफेक्ट थ्रो करून इमामला रनआऊट केलं. इमामने मिड ऑनला फटका मारून एक धाव काढण्याचा प्रयत्न केला. परंतु,  मिड ऑनला क्षेत्ररक्षण करणाऱ्या अक्षर पटेलने अचूक थ्रो करून इमामला रनआऊट केलं आणि पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अक्षरने अप्रतिम फिल्डिंग करून इमामला बाद केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp