Team India च्या व्हिक्ट्री परेडमध्ये घडलं तरी काय? 10 जण रूग्णालयात दाखल

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : Team India's victory parade : T20 विश्वचषक (T20 World Cup) जिंकल्यानंतर  टीम इंडियाचे (Team India) मुंबईत जल्लोषात स्वागत झाले. मरीन ड्राइव्ह परिसरात स्वागतासाठी व्हिक्ट्री परेडचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये लाखोंच्या संख्येने चाहते हजर होते. पण या विजयाच्या सेलिब्रेशनमधअये काही चाहत्यांना त्रासही झाला. भारतीय क्रिकेट संघाला पाहण्यासाठी आणि खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी मरीन ड्राईव्हवर जमलेल्या क्रिकेट चाहत्यांच्या गर्दीत अनेकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागले. काही क्रिकेट चाहते जखमी झाले तर काहींना श्वास घेण्यास त्रास झाला. (what happened to the fans at Team India's victory parade 10 people admitted to hospital)

ADVERTISEMENT

जवळपास 10 जणांना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मुंबई पोलिसांनी सांगितले की, 'ज्या चाहत्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले त्यांच्यापैकी अनेकांना फ्रॅक्चर झाले होते आणि काहींना श्वास घेण्यास त्रास होत होता. या क्रिकेट चाहत्यांना जवळच्या सरकारी रुग्णालयात (जीटी हॉस्पिटल) उपचारासाठी नेण्यात आले. 10 पैकी 8 जणांना काही वेळातच घरी सोडण्यात आले. तर दोन जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : मुंबई स्पिरीट! अलोट गर्दीत रुग्णवाहिकेला करून दिली वाट मोकळी, Video Viral

मरीन ड्राइव्हवर गुरूवारी (4 जुलै) दूरदूरपर्यंत जमीनच दिसत नव्हती. क्रिकेट चाहत्यांचा फक्त निळा महासागर दिसत होता, कारण प्रत्येकाने भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घातली होती. व्हिक्ट्री परेडनंतर भारतीय क्रिकेट संघ वानखेडे स्टेडियमवर पोहोचला तेव्हा चाहत्यांनी खेळाडूंचे दणक्यात स्वागत केले. मुंबई क्रिकेट असोसिएशननेही वानखेडेमध्ये क्रिकेट चाहत्यांना मोफत प्रवेश दिला होता.

हे वाचलं का?

हेही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana App: माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज थेट App वरून करा!

मुंबई पोलीस अधिकाऱ्यांना आयुक्तांकडून कौतुकाची थाप

मरीन ड्राईव्हवरील गर्दीचे व्यवस्थापन केल्याबद्दल मुंबई पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक केले. आयुक्तांनी मुंबईतील लोकांचे त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले आणि सांगितले की, 'मुंबई पोलीस आणि संघासाठी तसेच त्यांच्या चाहत्यांसाठी हा एक विशेष क्षण राहील याची खात्री केली. गर्दीत अनेक मुलं पालकांपासून विभक्त झाली, मात्र मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे ते पुन्हा त्यांच्या पालकांना भेटू शकले.

हेही वाचा : ''शिंदे सरकार गुजरातधार्जिणे'', बसवरून राजकारण तापलं!

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मरिन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियम दरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चर्चगेट स्थानकावर गर्दीच्या व्यवस्थापनासाठी आरपीएफ आणि जीआरपीएफचे 400 हून अधिक जवान तैनात करण्यात आले होते. मरीन ड्राईव्हच्या दक्षिणेकडील टोकाला NCPA जवळ संध्याकाळी 7.45 च्या सुमारास व्हिक्ट्री परेड सुरू झाली. येथून शेकडो पोलिसांच्या सुरक्षेत टीम इंडियाची बस वानखेडे स्टेडियमवर पोहोचली.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT